... वाळलेलं झाडं.....
फळं फुलं देणाऱ्या झाडानं
दुसऱ्यासाठीच जगायचं असतं
किती फुलं फळं गेली तरी
सगळं विसरुन जायचं असतं...1
कुणी दगडं मारलं कुणी काठी मारलं
मुकेपणानं सगळं सोसायचं असतं
जरा शांत निवांत विचार करुन बघा
बापाचं जगणं याहून काय वेगळं असतं..2
हळू हळू एकेक फांदी वाळू लागते
तेव्हा मुळांना काळाची चाहूल लागते
काय करावं बिचाऱ्या झाडानं तेव्हा
एखाद्या वादळाची वाट पहायच असतं..3
झाडं कोलमडून पडलेलं असतं
त्यावर ही कुराडीच घाव बसतं
वाळलेलं झाडं हसतं असतं
गपगुमान चुलीत जळत बसलेलं असतं...4
...... कवि अटलविलास.....