Bluepad | Bluepad
Bluepad
फक्त गोड खाणं सोडून फायदा नाही; डायबेटिज रुग्णांनी 'हे' पदार्थही खाऊ नयेत
रवि जवंजाळ सर  , सांगोला. जि.सोलापूर.
रवि जवंजाळ सर , सांगोला. जि.सोलापूर.
5th Aug, 2022

Share

फक्त गोड खाणं सोडून फायदा नाही; डायबेटिज रुग्णांनी 'हे' पदार्थही खाऊ नयेत
https://www.bluepad.in/profile?id=245034
https://ravindrajavanjal1968.wordpress.com
फक्त  गोड खाणं सोडून फायदा नाही; डायबेटिज रुग्णांनी 'हे' पदार्थही खाऊ नयेत
डायबेटिसच्या रुग्णांसाठी आहाराचे (Diet) नियोजन आवश्यक असतं. डायबेटिसच्या रुग्णांनी नेमके कोणते पदार्थ आहारातून वगळावेत,
: डायबेटिस अर्थात मधुमेह (Diabetes) हा काहीसा चिवट आणि दीर्घकाळ टिकणारा आजार मानला जातो. मधुमेही रुग्णाला हृदयविकार, किडनी विकार, मज्जातंतू किंवा डोळ्यांशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. वारंवार संसर्ग होणं, जखमा लवकर भरून न येणं या समस्यादेखील निर्माण होऊ शकतात. डायबेटिस हा पूर्णतः बरा होत नसला तरी योग्य व्यवस्थापनाच्या (Management) माध्यमातून नियंत्रणात ठेवल्यास वयापरत्वे निर्माण होणाऱ्या समस्या रोखता येऊ शकतात. चयापचय क्रियेत बिघाड निर्माण झाल्याने डायबेटिस होतो. डायबेटिस नेमका कशामुळे होतो, याचं ठोस कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी अनुवंशिकता, धावपळीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव, ताण-तणाव आणि अनियमित, चुकीचा आहार, लठ्ठपणा यासाठी कारणीभूत मानले जातात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात म्हणजेच प्री-डायबेटिक (Pre-Diabetic) स्तरावर योग्य उपाययोजना केल्या तर डायबेटिस गंभीर स्वरुप धारण करत नाही.
डायबेटिस हा क्रोनिक डिसीज (Chronic Disease) आहे. आज जगभरात मधुमेहग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे ही संख्या दिवसेंदिवस लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. डायबेटिसचे दुष्परिणाम पाहता, रुग्णांनी वेळीच काही उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे. दररोज पुरेसा आणि योग्य आहार घेतल्यास, व्यायाम केल्यास आणि वेळीच वैद्यकिय उपचार घेतल्यास ब्लड शुगर (Blood Sugar) नियंत्रणात ठेवता येते. तसेच संभाव्य आजारही दूर ठेवता येतात. डायबेटिसच्या रुग्णांसाठी ग्लुकोज, कॅलरीज (Calories) या बाबी देखील महत्त्वपूर्ण असतात. कारण या दोन्ही गोष्टी इन्शुलिनवर (Insulin) परिणाम करत असतात. त्यामुळे डायबेटिसच्या रुग्णांसाठी आहाराचे (Diet) नियोजन आवश्यक असतं. डायबेटिस असणाऱ्या रुग्णांनी दैनंदिन आहारात काही पदार्थांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. डायबेटिस असणाऱ्या रुग्णाला गोड पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. अर्थात तो योग्य आहे. डायबेटिसच्या रुग्णांनी नेमके कोणते पदार्थ आहारातून वगळावेत, याविषयीची माहिती
डायबेटिसमुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो, तसेच त्या कठीण होतात. त्यामुळे डायबेटिस असलेल्या रुग्णांनी याबाबींचा विचार करून तज्ज्ञ डॉक्टर किंवा डाएटिशियनच्या सल्ल्यानं दैनंदिन आहाराचं व्यवस्थापन करावं. डायबेटिसच्या रुग्णांनी प्राधान्यानं मध्यम स्वरुपाचा आहार घ्यावा. आहारात पोषक पदार्थांचा समावेश असावा आणि ठरलेल्या वेळी जेवण करावं असं तज्ज्ञ सांगतात. आहारात कमी फॅटस (Fats) आणि कॅलरीज असलेले पदार्थ असावेत. तसेच अशा रुग्णांनी दैनंदिन आहारात फळे, भाजीपाला आणि कडधान्यांचा प्रामुख्याने समावेश करावा. कार्बोहायड्रेटस (Carbohydrates) रक्तातील साखरेवर जास्त परिणाम करतात, त्यामुळे आहारात कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांचं प्रमाण नगण्य असावं.
डायबेटिसच्या रुग्णांनी टाळावं या पदार्थांचं सेवन
- गोड पेय (Sugary Drinks) : कोणत्याही प्रकारच्या कोल्ड ड्रिंक्स किंवा अन्य पेयांमध्ये फ्रुक्टोज हे अधिक प्रमाणात असते. याचा थेट संबंध इन्शुलिन रेसिसस्टंस आणि डायबेटिसशी असतो. या गोड पेयांमुळे फॅटी लिव्हर किंवा डायबेटिसशी संबंधित गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते, असं एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे डायबेटिस असलेल्या रुग्णानं कोला सारख्या पेयांऐवजी पाणी, क्लब सोडा, नारळपाणी घ्यावं.
- ब्रेड, भात आणि पास्ता (Bread, Rice, Pasta): ब्रेड, मैद्याचे पदार्थ खाल्ल्यानं डायबेटिस टाइप -1 आणि डायबेटिस टाइप -2 असलेल्या रुग्णांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी लक्षणीय वाढते. तसेच ग्लुटेन फ्री पास्ता खाल्ल्यानं देखील ब्लड शुगर लेव्हल वाढतात. त्यामुळे दैनंदिन आहारात असे पदार्थ वर्ज्य करावेत.
- फळे मिश्रित योगर्ट (Fruit Flavored Yogurt): डायबेटिसच्या रुग्णांसाठी खरंतर योगार्ट हा उत्तम पर्याय समजला जातो. फ्रुट फ्लेवर्ड योगार्ट हे कमी फॅटच्या दुधापासून तयार केलं जातं. मात्र त्यात साखरेचं प्रमाण लक्षणीय असतं. हे योगार्ट सेवन केल्यास रुग्णाच्या ब्लड शुगर आणि इन्शुलिनवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे केवळ दुधापासून बनवलेलं योगार्ट हे डायबेटिस रुग्णांसाठी उत्तम
- प्रक्रिया केलेलं मांस (Processed Meat): हॅम, सलामी, बीफ यात घातक रसायनं असतात. तसेच हे मांस ताजं नसतं. त्यामुळे कर्करोग किंवा हृदयविकार होण्याची शक्यता असते. हे पदार्थ डायबेटिसच्या रुग्णासाठी अपायकारक ठरु शकतात. त्यामुळे हे पदार्थ टाळून त्याऐवजी चिकन, उकडलेली अंडी यांचा आहारात समावेश करावा.
- फुल फॅट दुग्धजन्य पदार्थ (Full Fat Dairy Products): फुल फॅट असलेल्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅटस असतात. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. तसेच यात कॅलरीज मोठ्या प्रमाणात असल्यानं वजन देखील वाढू शकते. त्यामुळे डायबेटिस रुग्णांनी असे पदार्थ वर्ज्य करावेत. त्याऐवजी लो-फॅट असलेले म्हणजेच सोया मिल्क सारखे पदार्थ सेवन करण्यावर भर द्यावा.
- पॅकेज्ड स्नॅक्स आणि प्रक्रिया केलेले बेकरी पदार्थ (Packaged Snacks And Bakery Product) : पेस्ट्रीज, कुकीज आणि केकमध्ये प्रक्रिया केलेली साखर, मैदा तसेच आरोग्यासाठी अपायकारक असलेले फॅटस असतात. तसेच या पदार्थांमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह आणि रंगाचा वापर केलेला असतो. या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेटस मुबलक असल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढतात. त्यामुळे डायबेटिसच्या रुग्णांनी हे पदार्थ न खाणं योग्य ठरते.
- सुका मेवा (Dried Fruits): बेदाणे (Raisin), सुकवलेले अंजीर आदी पदार्थ खरंतर आरोग्यासाठी श्रेयस्कर मानले जातात. परंतु, यात साखरेचं प्रमाण अधिक असतं. 43 ग्रॅम बेदाण्यात 25 ग्रॅम साखर असते. 50 ग्रॅम खजुरात 25 ग्रॅम साखर असते. हे पदार्थ सेवन केल्यास ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. याऐवजी डायबेटिस असलेल्या रुग्णानं ताजी फळं खाणं फायदेशीर ठरतं.
याशिवाय डायबेटिसच्या रुग्णांनी फ्रेंच फ्राईज, फळांचे ज्यूस, मध, मॅपल सायरप, फ्लेवर्ड कॉफी, चॉकलेट आदी पदार्थ खाणं कटाक्षानं टाळावं. बटर, बीफ, सॉसेस या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स (Saturated Fats) असतात. त्यामुळे हे पदार्थ खाऊ नयेत. ट्रान्स फॅट्स (Trans Fats), सोडियमयुक्त (Sodium) पदार्थांचं सेवन हे देखील डायबेटिसच्या रुग्णांसाठी घातक ठरु शकतं. त्यामुळे असे पदार्थ टाळणं हे केव्हाही श्रेयस्कर असतं.
एकूणच डायबेटिस असलेल्या रुग्णांनी अपायकारक फॅटस, गोड किंवा साखरयुक्त, प्रक्रिया केलेले आणि जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेटस असलेल्या पदार्थांचं सेवन टाळलं तर ब्लड शुगर आणि पर्यायानं डायबेटिस नियंत्रणात ठेवणं सहज शक्य होतं.

181 

Share


रवि जवंजाळ सर  , सांगोला. जि.सोलापूर.
Written by
रवि जवंजाळ सर , सांगोला. जि.सोलापूर.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad