"जगा इतके की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके जरा की परमेश्वराला ही देणे भाग पडेल."
जीवन म्हणले की संघर्ष आलाच तडजोड आली ते म्हणतात ना कण रगडीता वाळूचे तेलही गळे वाळूचे कण रगडल्याने तेल गळत नही पण आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत असू तर आपल्याला यश नक्कीच मिळते हे यश मिळवण्यासाठी जिद्द सातत्य व संयम आपल्या अंगी असावे लागते जिद्द आपल्याला प्रेरणा देते तर सातत्याने आपल्याला एखादी गोष्ट आपन व्यवस्थित करू शकतो व संयम ठेवल्याने धरसोड वृत्ती कमी होते