Bluepad | Bluepad
Bluepad
विघ्नहर्ता -18
Radhika  Kulkarni
Radhika Kulkarni
5th Aug, 2022

Share

विघ्नहर्ता....18
©राधिका कुलकर्णी.
सकाळी नेहमीप्रमाणे आभा मुलांना गेटपर्यंत सोडायला गेली त्याचवेळी तेजसही पाठीमागून कारमधुन आला.मुलांना हसत हाय/बाय करत आभाला टाळुन तिकडून निघुनही गेला.त्याचे असे इग्नोअर करणे खूप जिव्हारी लागले आभाच्या.
रोजची कामे रूटीनप्रमाणे घडतच होती पण तरीही काहीतरी चुकतेय,काहीतरी सुटतेय अशी सल मनाला बोचत होती.
ऑफीसमधे असे पर्यंत सगळे ठिक असायचे पण घरी आल्यावरचा वेळ मात्र सतत तेजसच्या विचारांनी मनाला पोखरून काढायचा.
इतक्या कमी कालावधीत त्याचे आपल्या आयुष्यात येणे,मैत्रीच्या नात्यात बांधले जाणे आणि नंतर मैत्रीपलीकडचे असे काही बंध निर्माण होत असतानाच नात्यात हा दूरावा येणे सगळेच अनपेक्षित होते आभाला.
त्याच्या दूर जाण्यानंतरच त्याची कमी तिला जास्त जाणवत होती.
आपल्या आयुष्यात आजवर इतके महत्त्वाचे कोणीच नव्हते की ज्याच्या आठवणीत मी झुरावे पण आज पहिल्यांदाच आयुष्यात अशी स्थिती अनुभवत होती आभा.
इतक्या कमी वेळात आपल्या जीवनातली किती मोठी जागा तेजसने व्यापली होती ह्याची प्रचिती आज तो नसताना तिला जास्त तीव्रतेेने जाणवत होती.
त्याच्या नसण्याने एक मोठठी पोकळीच निर्माण झाली होती हे मनातल्या मनात का होईना पण आभाने कबुल केले..
"बाप्पा हे कोणते वादळ तू माझ्या आयुष्यात येवू घातले आहेस?"
"मी एकटी समर्थ होते माझे आयुष्य जगायला मग तू आता ह्या टप्प्यावर मला असे भावनिक अपंगत्व का आणू पाहतोएस?"
"आज तुझ्यापुढे खोटे नाही बोलणार...होऽऽ मी मिस करतेय तेजसला..पण का? ते नाही उमगत मला."
संथ नदीच्या प्रवाहात चाललेली माझी एकाकी नाव तु अचानक ह्या भावनांच्या भोवऱ्यात का अडकवली आहेस देवा?"
" ह्या भोवऱ्यातून माझी सुटका होणार आहे का त्यातच गुदमरून मरणार आहे मी?"
मला उत्तर हवेय देवा..तुझा कौल दे मला."
"वयाच्या अशा टप्प्यावर जिथे माझी मूलेच माझे सर्वस्व आहे,माझा भूत,वर्तमान आणि भविष्य आहेत तिकडे तू ही कोणती नविन खेळी खेळतोएस?"संसार अर्धा सरल्यावर कोणता नवा डाव मांडलाएस ह्या जीवनरूपी सारीपाटावर?"
रात्री उशीरा मूले झोपल्यावर मनातल्या विचारांचा बांध न आवरल्याने आभा देवघरात येऊन आपले मन मोकळे करत होती.
डोळ्यातून धारा वाहत होत्या.मन बंड करून उठले होते तर बुद्धी तारतम्य शिकवत होते.
एक मन आतला आवाज ऐक सांगत होते तर दुसरे मन जगरहाटीला सोडू नको हे सुचवत होते.
कितीतरी वेळा फोन उघडून मेसेज टाईप करायला हात सरसावले पण पुन्हा दुसऱ्या मनाने असे करण्यापासुन रोखले.
मन आणि बुद्धीचे यूद्ध सुरू होते.
अजुनतरी बुद्धीने मनावर विजय मिळवला होता पण किती वेळ ही स्थिती तग धरेल हे सांगणे अवघड होते.
कारण मन हे धरणासमान आहे.त्याचा बांध फुटल्यावर काय घडेल हे सांगणे अकल्पितच.....
तेजस समोरून गेला तरी इतका अनोळख्या सारखा वागायचा की आभाला खरच प्रश्न पडला की हा तोच आहे का जो दोन दिवसापूर्वी वेड्यासारखे पाचपाचशे मेसेजेस पाठवत होता.
त्याचे असे त्रयस्थासारखे वागणे आभाला सहन होत नव्हते.
दोन दिवस असेच गेले.
पण आज मात्र सकाळपासुन एकदाही तेजस कुठेच दिसला नाही.
आभाला काळजी वाटायला लागली.
"काय झाले असेल?"
"हा मुंबई सोडून तर गेला नसेल ना?"
"की जीवाचे काही बरे वाईट...?"
हा विचार येताच आभा प्रचंड अस्वस्थ झाली.हातपायात उगीचच कंप सुटायला लागला.
मन चिंती ते वैरी न चिंती अशी अवस्था झाली होती आभाची.साहजिकच होते ते कारण त्याच्या आयुष्यातील मागचे घटनाक्रम बघता तो असे काही करण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
तो खूप पोळलेला होता आधीच्या प्रसंगांनी आणि त्यात ही एक आणखी भर......
नुसत्या विचारांनीच आभाच्या अंगाला कापरं भरलं.असे काही घडले तर आपण स्वत:ला कसे माफ करू शकणार आहोत?
स्वत:च्या खोट्या अहंपायी एका निष्पाप जीवाचा जीव जाणे ह्याहून महाभयंकर काय असु शकते.
नाहीऽऽ.नाहीऽऽ.काही करून मला त्याची समजूत काढणे भाग आहे.नसता मी हे गिल्ट घेऊन जगू शकणार नाही की माझ्यामुळे कुणाच्यातरी आयुष्याची नासाडी झाली.
मला काहीतरी करायला हवे पण काय?
फोन करू...?
लगेच विचाराची अंमलबजावणी करत घाईघाईने आभाने त्याचा नंबर डायल केला.
रींग जात होती पण पलिकडून काहीच प्रतिसाद नव्हता.
दोन-चारदा करूनही तेच....
आता तर तिची खात्रीच पटली नक्कीच काहीतरी मेजर प्रॉब्लेम असणार.
काय करावे?
बराच उशीर झालेला.मुले जेऊन अभ्यास करत बसलेले.
अथर्वच्या प्रिलीम्स आणि सईच्या हाफ इय़रली टेस्ट्स चालू होत्या.
ते जागे असे पर्यंत आभाला कुठलीच हालचाल करणे शक्य नव्हते.मनातल्या मनात देवाचा धावा करत सगळे नीट असुदे एवढी प्रार्थना करतच ती हॉलमधे सोफ्यावर लवंडली.विचारांच्या नादात तिला डुलकी लागली.
जाग आली तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते.मुलांच्या रूमचे दिवे बंद झाले होते.
ती उठुन मुलांच्या रूममधे गेली.दोघेही गाढ झोपलेले होते.त्यांच्या डोक्यावरून हात फिरवून ती दार पुढे लोटून बाहेर आली.
काय करूऽऽ?जाऊन बघु का एकदा तेजस ठिक आहे का?"
जितका विचार करू तितका गुंता वाढत जाणार आणि मग तो सोडवणे आणखी कठिण होईल.
ते काही नाही जाऊन बघुन खात्री केलेलीच बरी.
जसा विचार आला तसा तिने तो अंमलात आणायचे ठरवले.पटकन दाराला बाहेरून बंद करून ती तेजसच्या दरवाजापाशी आली.
भीतभीतच डोअरबेल वाजवली.
पहिल्या वेळी काहीच हालचाल जाणवेना मग पुन्हा बेल वाजवली.
तीनचार वेळा बेल वाजवल्यावर आतुन दरवाजापाशी बारीकशी हालचाल जाणवली.
तेजसने दार उघडले आणि आभाला इतक्या रात्री तिकडे बघुन तो अचंबीत झाला.
तेजसला बघुन आभाही घाबरली कारण सर्वांगाला शालीने गुंडाळुन भूतासारखा अवतरला होता तो दारात.
"क्या हुआ,शाल क्यु ओढ रखी है?"
आश्चर्यानेच विचारले आभाने.त्याला तसे बघुन ती क्षणभराकरता कशासाठी तिकडे आली होती हे ही विसरून गेली.
तेजसचा चेहरा ओढल्यासारखा दिसत होता.नाकही लाल झाले होते.
"कल रात से बुखार है."
बॉडीपेन्स और थंड लग रही है."
"ओह् माय गॉड!फिर बताया क्यु नही."
"दवाँई वगैरा कुछ ली की नही?"
काळजीनेच चौकशी केली आभाने.
"सुबह से खडे नही हुँआ जा रहा है तो कैसे जाता दवाँई लाने."
"लेकिन तुम इतनी रात गये यहाँ क्या कर रही हो?"
तेजसने उत्सुकतेनेच विचारले.
"वो सब छोडो,पहले मुझे देखने दो कितना बुखार है."
आभा कपाळावर हात ठेवुन बघणार इतक्यात तेजस दूर झाला.
"दूर...दूऽऽऽर रहो मुझसे."
"मै अच्छा इन्सान नही हुँ.मत छुना मुझे."
हे वाक्य बोलता बोलता तेजसच्या डोळ्यातून अश्रु वहायला लागले.अंगात ताप त्यात अशक्तपणा त्यामुळे तेवढ्या ताणामुळेही त्याला गरगरायला झाले.तोल जाऊन तो पडणार तेवढ्यात आभाने त्याला सावरले.
आता आभालाही रडू आवरत नव्हते.तिच्याही डोळ्यातून पाणी ओघळायला लागले.
तेजसऽऽऽ प्लिज माफ करो मुझे.गलती हुई मुझसे.
त्याला हाताने आधार देत
बेडरूमकडे नेता नेताच आभा त्याच्याशी बोलली.
त्याचा हात तवा तापल्यागत गरम लागत होता.म्हणजे त्याला भरपूर टेंपरेचर आलेल दिसत होते.
त्याला बेडवर झोपवुन तिने
फ्रिजमधुन बर्फ काढून थंड पाण्याच्या पट्ट्या त्याच्या कपाळावर ठेवल्या.
"कुछ खाया तुमने?"आभाने पट्टी बदलता बदलता विचारले.
मानेनेच त्याने नाही म्हणुन सांगितले.
तिला खूप वाईट वाटले.इतके सगळे घडले पण एक शब्दाने त्याने कळवले नाही.
"जरा रूको मै अभी आयी."
म्हणतच ती पटकन घरी आली. रात्रीचा थोडा भात उरला होता तो आणि वरण गरम करून आणला.
घरात मुले-बाळे म्हणली की दुखणे बहाणे आलेच त्यामुळे एक मेडीकल कीट नेहमीच तयार असायचे तिच्याकडे.
त्यातलीच ताप आणि अंगदुखीची क्रोसिनची गोळी घेऊन ती पुन्हा तेजसकडे आली.
त्याला ऊन ऊन मऊ वरण भात खाऊ घातला.
गरम पाण्यासोबत गोळी दिली.
"अब तुम्हे अच्छी नींद आयेगी,सो जाओ.मै कल फिर आऊंगी."
तेजसचा निरोप घेत आभा जायला निघाली तसा तेजसने तिचा हात धरला.
"प्लिज आभा थोडी देर रूक जाओ ना."
"अकेले मे बहोत बुरे बुरे खयाल आ रहे है मन मे.
प्लिज मेरे साथ यही बैठो ना."
तेजस खूप गयावया करून विनवत होता.
त्याच्या हाताच्या कढत स्पर्शाने आभा शहारली.
त्याची अवस्था बघता नाही म्हणणे तिला जीवावर आले.
"अच्छा थोडी देर रूकती हुँ लेकिन तुम आँखे बंद करके सोने की कोशिश करो."
त्याने डोळे मिटले तरी तिचा हात मात्र हातातच घेऊन झोपला.
लहान मूलागत अवस्था झाली होती त्याची.
त्याला झोप लागली तशी त्याच्या हातातला आपला हात अलगद सोडवून घेत पांघरूण ठिक करून ती तिथुन हळुच सटकली.
~~~~~~~~~~~~~
कधी नव्हे ते उजेडायची वाट पहात होती आभा.
त्याची अवस्था बघुन रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता.
सकाळ झाली तसे मुलांचे डबे,ब्रेकफास्ट सगळे उरकुन ती दोघे शाळेत जाताच ती वर आली.
तेजस साठी चहा-नाष्टा,प्यायला गरम पाणी,औषध सगळी तयारी करून त्याच्याकडे गेली.
अजुनही तेजस झोपेतच होता.
हलकेच कपाळावर हात लावुन तिने ताप बघितला.
कालपेक्षा बराच उतरला होता आता.
तिच्या हाताच्या थंडगार स्पर्शाने तेजस जागा झाला.
आपल्या समोर आभाला बघुन आपण स्वप्नात आहोत की काय असेच वाटले तेजसला.
पण तिच्या हाताचा स्पर्श खराच होता अशी खात्री झाल्यावर मनोमन खुष झाला तेजस.
"गुड मॉर्निंगऽऽ! कैसा लग रहा है अब?"
"हम्मऽ थोडा बेटर फिल कर रहा हुँ."
"तुम जो पास हो तो बुखार भला कैसे रहेगा."वो भी तुम्हे डर कर भाग गया."
कसनुस हसतच तेजस बोलला.
आभाने चहा वगैरे किचन मधे ठेवले आणि त्याच्याजवळ आली.
"चलो ऊठकर फ्रेश हो जाओ.मै चाय लायी हुँ.जल्दी से पी लो तो अच्छा लगेगा."
तेजस अंथरूणातुन उठायला गेला पण अशक्तपणामुळे  पुन्हा चक्कर येवुन पडला.
मग आभाच्या आधारानेच तो वॉशरूम पर्यंत गेला.
फ्रेश होऊन तो बेडवरच टेकुन बसला.
आभाने त्याचा चेहरा नॅपकीनने पुसला.
त्याला चहा बिस्कीट खाऊ घातले.थर्मामिटरने त्याचे टेंपरेचर चेक केले.अजुनही ताप पूर्ण उतरला नव्हता पण काल पेक्षा कमी झाला होता .
तिला जरा हायसे वाटले.
कालच्या गोळीने बराच फरक पडला होता.
तिने पुन्हा तिच गोळी दिली आणि त्याला बिछान्यावर झोपवले.
"आभाऽऽ...."
तेजसच्या हाकेने तिने मागे वळुन बघितले.
डोळ्यांनीच तिने काय असे विचारले.
"क्यु कर रही हो ये सब मेरे लिए?"
त्याच्या अनपेक्षित प्रश्नाने आभा गडबडली.काय उत्तर द्यावे तिला समजत नव्हते.
ती काही न बोलता शांत राहीली.
तिच्या उत्तराच्या अपेक्षेत तेजसने पुन्हा तोच प्रश्न विचारला,"बताओ ना,क्यु कर रही हो ये सब मेरे लिए?"
"अभी ये वक्त नही है ऐसी बाते करने का.
चलो आराम करो.गोली से तुम्हे अच्छी निंद आयेगी.
मै बाद मे फिर आऊंगी."
विषय टाळायचा म्हणुन ती काहीतरी बोलुन त्याचे समाधान करत होती.
तो मात्र एकटक तिच्याकडेच बघत होता.
त्याच्या रोखलेल्या नजरेतले असंख्य प्रश्न आभाला भाल्यासारखे टोचत होते.ती नजर अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरेच जणू आभाच्या डोळ्यात शोधत होती.
आभाला त्याची नजर सहन होत नव्हती.
"तेजस यु घुरघुरके देखना बंद करो.चलो आँखे बंद करके सो जाओ.
अथर्व/सईला भरायची तसाच दम भरला तिने तेजसला.
आत्ता ह्या क्षणापुरती तरी ती त्याची आईच झाली होती.
गोळीच्या प्रभावाने त्याला थोड्याच वेळात झोप लागली.
त्याची परिस्थिती बघता त्याच्याजवळ कोणीतरी असण्याची गरज स्पष्ट दिसत होती.
जास्त विचार न करता आज वर्क फ्रॉम होम चा ऑप्शन तिने निवडला.
अशा अवस्थेत त्याला एकट्याला टाकुन ऑफीसला जाणे तिच्या मनाला अजिबात पटत नव्हते.
पण दुसरीकडे त्याचे ते जीवघेणे प्रश्न...
कसा सामना करणार होती ती ह्या सगळ्याचा..
तिच्या अंतर्मनातले द्वंद्व ती तेजस पुढे खरच उलगडू शकणार होती??"
~~~~~~~(क्रमश:)~~~~~~~~~~~~
विघ्नहर्ता.......18
©राधिका कुलकर्णी.
विघ्नहर्ता -18

181 

Share


Radhika  Kulkarni
Written by
Radhika Kulkarni

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad