Bluepad | Bluepad
Bluepad
शब्दाची पालवी.
anjali bhalshankar
anjali bhalshankar
5th Aug, 2022

Share

फुटत नसते पालवी शब्दांना शब्दांना ठरवुन लिहायचे तर !!
काहूर उठावे लागते मनात कविताच करायची तर!!
प्रियजनांच्या आठवणी डोळे भरून आलयास,
खडतर आयुष्याच्या वाटेवर एकाकी पडल्यास
सोबत नाही कोणी मनात भीती असल्यास
.नकळत आयुष्य सरताना परीस्थितीचे चटके सोसताना पाय मनं सोलवटून दुखून रक्त बंबाळ होताना
चिऊ कालचा घास भरवून आपणच पंखात बळ दिलेली पिले पंख पसरून दूर उडून गेल्यावर
त्याच्या आठवणीने जेव्हा हृदयाचा आक्रमण सुरू केले तर त्याचवेळी कुणी हळव्या मनाने मायेची फुंकर घालून वेदना सुसह्य करीत असेल ना !
तरच येते कविता मनाच्या स्पंदनातून. बाहेर पडते अलगत उमलते ओठातून कधी नकळत वाहत राहते डोळ्यातल्या पाण्यातून.
अंजली भालशंकर पाऊस वेचताना.काव्यसंग्रह.

189 

Share


anjali bhalshankar
Written by
anjali bhalshankar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad