Bluepad | Bluepad
Bluepad
पान सांगते तत्त्वज्ञान !
anjali bhalshankar
anjali bhalshankar
5th Aug, 2022

Share

गळून पडले झाडावरून पिवळे पान सांगून गेले जाताना जगण्याचे तत्वज्ञान.
क्षणभंगुर आयुष्य असे नको फुकाचा अभिमान .कुठून आला? आला कोठे जायचे? ना तुला ठावे .
मातीतून उगम साऱ्यांचा मातीत पुन्हा मिसळाया. प्राप्त जे जे ते सारे येथेच सोडून जाशील सारे.
उंच उडाने किती घेऊदे राखेने वाऱ्यावर भूगर्भातच विलिन व्हावे लागते.
सोडून जराशी हाव धनाची सोडून नाते मानवतेशी ध्यान ठेव मेल्यावर ही गरज लागते चार जणांची
.माझं तुझे तोड पिश मी पणाचे काय भरोसा देहातील आत्म्याचा बांध तोडून उडून जाईल पक्षी करून त्याग घरट्यांचा
. मुक्काम क्षणिक तुझा चार दिनाचा तू प्रवासी. निष्प्राण देह का होईल देईल सांग उत्तरे तुझ्या प्रश्नांची
भले बुरे जे कर्म करशील ते जाताना सोबत नेशील विचार करून वाग जरासा गाठ जोवरी श्वासाशी
सांग बर बसशील कुठवर नश्वर देहाला कुरवाळीत प्राण जाईल एक दिवस जळून जाशील धगधगत्या अगीत.
क्षण न क्षण घे जगून करुन सोहळा जगण्याचा जरासा हिरवीगर्द सावली देऊन गेलेल्या पानाचा घे वसा त्याचा.
वागुन बघ निस्वार्थीपणे कर वर्षाव आनंदाचा बघ सोहळा होईल तुझ्याही मरणाचा
.अंजली भालशंकर पाऊस वेचताना.काव्यसंग्रह.

171 

Share


anjali bhalshankar
Written by
anjali bhalshankar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad