Bluepad | Bluepad
Bluepad
आई
P
Pournima Gujar
5th Aug, 2022

Share

आज मन खूप भरून येतंय श्रावणातल्या सरी सारखं आई आज तुझी खूप आठवण येतेय तू स्वतः साठी कधी जगलीस नाहीस कायम दुसऱ्यासाठी दुसऱ्यांसाठी करण्यात तुला कायम आनंद मिळायचा कोणी घरी आल की तुला काय करू नी काय नको असायचं खुप कमी वाट्याला आलीस तु अजुन आम्हाला हवी होतीस ग श्रावण चालू झाला की तुझे उपवास चालू व्यायचे नक्की कोणता दिवस असा की तुला उपवास नाही हाच प्रश्न पडायचा पप्पा तर महिनाभर उपवास धरायचे तरी ती किती करायची त्यांच्या साठी कायम दाण्याचे लाडू आणि तळलेला चिवडा घरात असायचाच आम्हा बहिणींची तर मज्जाच असायची फराळ तुम्ही दोघं कमी आणि आम्हीच जास्त खायचो आमचे खुप लाड केलेस खुप केलंस आमच्या साठी या जन्मात तर तुझे ऋण फेडू शकत नाही कदाचित देवाने तिला आमच्या साठीच जन्माला घातले होते आमचं सगळं बालपण तरुणपण तुझ्या सानिध्यात गेलं लग्न मोठ्या कौतुकाने पार पडले नातवंडांचे पण खूप कौतुकाने केलंस आजही मुलांना तुझ्या हातचा पुरणपोळ्या नची आठवण येते ग एकही सण असा जात नाही की तुझी आठवण येत नाही प्रत्येक सण आला की तुझी आधी पासून तयारी असायची आता आम्हाला प्रत्येक वेळी सणाला तू काय काय करायची ते सगळं आठवत

0 

Share


P
Written by
Pournima Gujar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad