Bluepad | Bluepad
Bluepad
साहेब
S
Shashikant Harisangam
5th Aug, 2022

Share

वाचलेले काही.......🙏
............................
' साहेब, इंग्लिशमध्ये समजले कीं मराठीत पुन्हा सांगू...?
............................................................................ 😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄
नुकतेच ' लोकमत ' दैनिकात वाचलं. खूप भावले. सरकारी बाबू इंग्रजीच्या खोट्या रुबाबात आन्नदात्या शेतकऱ्याच्या शेतावर आले. पुरात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करायला.चार सदस्य पथकात आणि शेतकऱ्यात मराठी इंग्रजी असा संवाद चालला असावा
शेतकऱ्यानेही कमाल केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करणारे अधिकाऱ्या बरोबर तो अडाणी शेतकरीराजा मोडक्या तोडक्या पण अर्थपूर्ण संवाद आधी इंग्रजीत भाषेतून नंतर त्याचे हिंदीतून भाषांतर करून संवाद साधत होता. अधून मधून मराठीची मदत घेतं होता.सारे काही सांगून झाल्यावर शेतकरी म्हणाला,
' इंग्रजी हिंदी मराठीत मिसळून सांगितले मी समजले का ? का पुन्हा मराठीत सांगू सगळे? '
या अशिक्षित बळीराजाच्या,अनोख्या शैलीतल्या संवाद साधण्याच्या अनोख्या शैलीने आलेल्या सरकारी ' बाबू 'ना काही क्षण बुचकाळ्यात पाडलेच खेरीज त्यांच्या
धाडसाचे कौतुक ही!
झाले काय, देवळी तालुक्यातील बोरगावात अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईचे सर्वेक्षण करण्यासाठी एक सरकारी पथक या शेतकऱ्याच्या बांधावर आले. वर्ध्याच्या ज़िल्हाधिकारी प्रेरणा देवभ्रतार त्या पथकात होत्या.
अधिकारी दिल्लीचे आहेत म्हणल्यावर त्यांना कदाचित मराठी कळणार नाहीं असे वाटल्याने नुकसानग्रस्त शेतकरी प्रशांत निमसडकर यांनी आलेल्या सरकारी बाबू ना थेट इंग्रजीतून माहिती सांगायला सुरु केली.
नदीला पूर कसा आला, पाणी शेतात कसे घुसले.आला सोसाट्याचा वारा, पावूस धावत आला वाहवून जगण्याला गेला. हे सारे सारे आपल्या मोडक्या तोडक्या पण अर्थवाही इंग्रजी मधून सांगितले. ऐकणाऱ्या अधिकाऱ्यातील चुळबुळ पाहून त्याने ट्रॅक बदलत माहिती पुढे हिंदीतून सांगण्यास सुरवात केली. दोन चार वाक्य बोलून झाल्यावर समोरच्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावरील रेषा किंचितही हालत नाहीं असे पाहून तो शेतकरीच म्हणाला,
' साहेब, इंग्रजीत सांगितले. समजले का? का पुन्हा सारे मराठीत सांगू.? '
तालुका - जिल्हा प्रशासनाला अश्या दक्ष शेतकरी नागरिकांमुळे ' लॉस ऑफ लाईफ ' टाळण्यात यश आल्याचे वर्धा जिल्हाधिकाऱ्याची प्रतिकिया त्यावेळी चेहऱ्यावर हसरी रेषा रेखून गेली.
हम भी कुछ कम नहीं सांगणारा हा किस्सा.
.... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर
( दैनिक ' लोकमत ' न्युज नेटवर्क चे प्रतिनिधी श्री महेश सायखेडे यांच्या बातमीवर आधारित ही पोस्ट करण्याचा ममोह आवरता आला नाहीं.साभार .)

180 

Share


S
Written by
Shashikant Harisangam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad