नाव वाचून चिंतेत पडला असाल कोण हा प्राणी. आर्यन खान च्या ड्रग प्रकरणं वरुन मी सहज मुलांशी बोलत होते तेंव्हा त्यानी मला Narcos ही सिरियल बघायला सांगितली. ही पूर्ण ड्रग माफिया वर आधारित आहे. हे सगळं कसं चालू झालं त्यापासून अजूनपर्यंत. माझ्या लेकीने सांगितल 'आई त्यात काही nude सीन आहेत तर सांभाळून बघ'. मी सांगितल 'आता आम्हीं अठरा वर्षाच्या वर आहोत, बघू शकतो, तू काळजी करू नकोस'
कोलंबिया मधला पाब्लो एस्कॉबर हा माणूस आईच्या पैशाच्या महत्त्वाकाक्षेमुळे सगळ्या वाईट धंद्यात स्वतःला गुरफटून घेतो. त्याची बायको आणि मुलं ह्यांच्यावर प्रचंड प्रेम असणारा, आईला मनापासून आदर देणारा पण बाहेरच्या जगात खुनशी, अशी ही भूमिका ज्या कलाकाराने 'वाग्नेर मौरा' ह्याने निभावली आहे ती छानच. हे सत्यात घडताना त्याच्याकडे ड्रग माफिया म्हणुन एवढे पैसे येतात की कुठे ठेवायचे हेच कळत नाहि त्याला. शेतात, घराघरातील उश्या पासून सगळीकडे. मग वाढत चाललेली हाव आणि जगावर राज्य करायचं हे स्वप्न घेऊन तो अजून त्यात गुरफटत जातो. Netflix वर आहे.
तुम्ही बघाच. एका सिन मध्ये मुलांना थंडी वाजत असते म्हणुन तो शेकोटी पेटवायला लाकड नाहि मिळत, तर पैशाची बंडल टाकतो जाळायला.
माझ्या मुलांनी ही २०१५ ल आलेली सिरीज पुर्ण बघितली हे मला २०२१ ल कळलं. (हे पण कमी नाही.) आपली मुलं ही पुढची पिढी nude सीन ला पण बिनधास्त असतात जिथे आपल्याला अजून कसतरी वाटतं, शेवटी काय जनरेशन गॅप.
शेवटी त्याच्या मृत्यू नंतर मला त्याच्या बायको मुलांचं काय झालं ह्याची उत्सुकता होती मग यूट्यूब वर search केलं तेव्हा कळलं की त्यांना एकाही देशाने थारा दिला नाही. त्यांनी आपली नाव बदलून पुढच आयुष्य व्यतीत केलं. त्याचा 'वाल्या कोळी' व्हायच्या आधीच त्याला पोलिसांनी मारलं.
अमेरिकेतल्या अश्या कितीतरी पिढ्या ड्रग्स ने बरबाद केल्या ह्याचं वास्तव दाखवलय. हे लोण सगळीकडेच पसरलंय. किती politician ह्यात गुरफटले देव जाणे. पण तुम्ही ही सिरीज बघाच. भले एकट्याने बघा पण बघा.
🙏 वंदना ❤️