Bluepad | Bluepad
Bluepad
पावसाळा आणि शाळेतील आठवणीत रमताना
Nidhi sanjay sabale
Nidhi sanjay sabale
5th Aug, 2022

Share

पावसाळा आणि शाळेच्या आठवणीत रमताना 🌧🌧
पाऊस म्हटलं की,"रिमझिम गिरे सावन, सुलग, सुलग जाये मन" या गाण्याची धून मनात वाजू लागते .पावसाचं आकर्षण हे बालपणापासूनच . चेहऱ्यावर हास्य फुलवणारा, वृक्षवेलींनाह पावसाची असलेली आतुरता, अंगावर शहारे आणणारा तो गारवा ,बरसणाऱ्या सरींनी स्वतःला भिजवताना अंग चिंब चिंब होऊनी मणी गाणे गुणगुणत जावे. असे काहीसे होत असते. तो म्हणजे पावसाळा.
पावसाळा येताच आठवण होते त्या शाळेतील दिवसांची. आठवतं ते बालपण. प्राथमिक शाळेत शिकत असताना पाऊस असला की, छत्री दिसली नाही तर घरून घोंगडी दिली जायची. काही दिवसांचाच प्रश्न आहे म्हणून छत्री घेणं दूर राहायचं .आणि छत्री असल्या तरी त्या लपक्यालुपक्या झालेल्या असायच्या. नवीन छत्री घ्यायला वेळेवर पैसे हाती नसायचे. घोंगडी न्यायची म्हटलं तर लाज यायची.मग दोन्ही हातांनी डोक्यावर पाटी किंवा दप्तर घेऊन पळत सुटायचं घरून. पाणी भरलेलं डब्कं दिसलं की त्यात मैत्रिणी मिळून उड्या मारायचो.तसेच कागदाची नाव बनवून ती पाण्यात सोडली जायची.
माध्यमिक शिक्षणाकरीता बाहेरगावी जावं लागायचं. मग तर अजूनच मजा असायची. गावाशेजारीच असणाऱ्या गावातून मुली यायच्या. काही मुली ह्या माझ्या गावातील असायच्या. सर्व सोबत आम्ही एक किलोमीटर अंतरावर असलेल्या विरखंडी (धापार्ला) या गावी शिक्षणाकरता जायचो. एक प्रसंग आठवतो आणि आज हसू येतं.आठव्या इयत्तेत प्रवेश घेतला असताना नवीन शाळा, सर्व काही नवीन होत. आणि शाळेचा तो पहिला दिवस पावसाळ्याला सुरुवातही होते ती याच महिन्यात. धावपळ करत लगबगिने घरून सर्वजण निघाले. शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे फर्स्ट बेंच पकडायची धावपळ. नाहीतर दुसरा व तिसरा आणि त्यात मैत्रिणी पण सहवासातीलच अशी मनाची इच्छा असायची.त्या दिवशी पावसाचं बरसनं पण सुरूच होतं .सर्व मैत्रिणी सोबत पाण्याचा आनंद घेत शाळा गाठली. त्या दिवशी शाळेचं पहिल्यांदा दर्शन घेतलेलं. शाळा कवेलू व मातीच्या भिंतींनी मढवलेली. आतील भागी सिमेंट काँक्रीटच्या भिंती व छताला वेळूंच्या ताट्यांचं आवरण आणि एका भिंतीला दोन चौकोनी खिडक्या. खिडकीकडे बघायचं म्हटलं तर हिरवळ आणि त्यासोबत वरून येणारा पाऊस दिसायचा .काही वेळेस तर पाण्याने भिजलेलं असताना वर्गात बसलेलो व पावसाच्या दिवसात खिडकीमध्ये वाऱ्याची झुळूक यायची. त्यामुळे शरीरात थंडी गारठलेली. सोबत शिक्षकांचं शिकवण सुरू असायचं.उत्तर माहिती नसताना ओला हात छडी घ्यायला नाइलाजास्तव समोर करावा लागायचा. दोन्ही बाजूंनी लांबीने मोठे असणारे डेस्क बेंच असायचे.खाली शेणानी सारवलेलं छप्पर व वर एक मजला होता. मातीने लिपलेल्या लाकडी पाट्यांच्या पायऱ्यांनी वर जावं लागायचं. वरून बाहेरील दृश्य नजरेने बघता यायचं. असे त्या इमारतीत तीन वर्ग भरायचे.शाळा होती ती फार जुनी. पण मनामध्ये घर केलेली.माझ्या मामा, मावश्यांचही शिक्षण तिथेच झालेलं. पहिल्या दिवशी संपूर्ण दिवस न्याहाळण्यात गेला. शाळेला सुट्टी झाली व तीच घरी जाण्याची घाई होती. पोटात भुकेने कावर घातलेला. घाईगडबडीने जायला निघाले असताना शाळेच्या प्रवेश दारात उतार असलेल्या फरशीवरून पाय घसरून समोरील दिशेने पडले. हाता पायाला थोडे ओरबडलं. गणवेश मातीने खराब झाला. हसणारे काहीजण हसले. मी मात्र गोंधळलेला अवस्थेत स्वतःला सावरतं करत घराची वाट धरली.
उच्च माध्यमिक शिक्षणाकरता नगर असलेल्या ठिकाणी जावं लागलं. तिथल्या पण पावसाळ्यासोबतच्या शाळेतील आठवणी काही निराळ्याच. ऑटोरिक्षातील प्रवास आणि पावसाळ्याच्या दिवसात हवेचा तो थंडगार गारवा.सोबतच केसांचं चेहऱ्यावरील रूळनं .तसेच निसर्गाचं दृश्य बघत, ऑटोरिक्षात सुरू असलेल्या गाण्यांचा आस्वाद घेत स्वतःला त्यात रमून घेताना फार आवडायचं.रोज नवनवीन गाणी कानावर पडायची.प्रवासासोबत संगीत हा माझ्या जीवनाचा एक भागच. जवळपास सर्वच गाणी आवडतात. पण त्यात जुन्या गाण्यांचं आकर्षण थोडं जास्तच. किशोर कुमार, जगजीत सिंग, लता मंगेशकर ,आशा भोसले, मोहम्मद रफी शाळेतील आठवणी यांनी गायलेली गाणी. आवडण्याचा विषय म्हणजे त्या गाण्यातील लिरिक्स माझ्याकरता जास्त महत्त्वाचं. काही वेळेस हवेच्या प्रवाहाबरोबर आटोतून हात बाहेर काढत हवेबरोबर हातांची हालचाल करायला आवडायचं. अशा न विस्मरण होणाऱ्या त्या पावसातील आठवणी. आजही स्मरणात आहेत. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.😇

183 

Share


Nidhi sanjay sabale
Written by
Nidhi sanjay sabale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad