Bluepad | Bluepad
Bluepad
कर्म -गीतारहस्य -१
Girish
Girish
5th Aug, 2022

Share

" कर्म ". गीता रहस्य.
हे अर्जुना, कर्मे न सोडताही तू कर्मबंध सोडशील अशी ही कर्मयोगातील बुद्धि म्हणजे ज्ञान तुला सांगतो.
ज्ञानप्राप्ती नंतर निष्काम बुद्धीने कर्म करीत राहणे हाच पुरुषार्थ.
कर्मयोग मार्गात एका जन्मात सिद्धि मिळाली नाही तरी ते कर्म पुढील जन्मात उपयोगी पडते व अखेर सदगती मिळते.
बुद्धि हा शब्द ज्ञान, समजूत, हेतू, वासना या अर्थाने वापरला गेला आहे. तसाचं व्यवसाय म्हणजेच कार्याचा निश्चय करणारे बुद्धिंद्रिय असा अर्थ होतो. बुद्धि स्थिर नसल्याने निरनिराळ्या वासनांनी मन व्यापले जाऊन, स्वर्गप्राप्तीसाठी अमुक कर्म, पुत्र प्राप्ती साठी अमुक कर्म असे मनुष्य करू लागतो.
परमेश्वराचे ज्ञान प्राप्त करून न घेता कर्म करणाऱ्यास, कर्माचे फल मिळाले तरी मोक्ष मिळत नाही. मोक्ष मिळवण्यासाठी बुद्धिंद्रिय स्थिर असले पाहिजे. गीतेमध्ये कर्माचा नव्हे तर काम्यबुद्धिचा दोष दाखवला आहे. काम्यबुद्धि सोडून यज्ञ तसेच इतर कर्मे करावी.
कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे, फल मिळणे तुझ्या अधिकारात नाही.
वेदांचा उपयोग ज्ञानी पुरुषास त्याच्या ज्ञानाने होतो. कर्माचे फल ज्ञानी पुरुषास नको असले तरी, फलाशेने नसले तरी यज्ञयागादिक कर्मे शास्रविहीत असल्याने त्याला करावीच लागतात.
कर्म कर असे सांगताना फलाशा कर असे सांगितले असे नाही आणि फलाशा सोड म्हणजे कर्म सोड असा होत नाही.
फलाशा सोडून‌ कर्तव्य कर्म केलेच पाहिजे. कर्मे करताना बुद्धि स्थिर, पवित्र, सम, व शुद्ध ठेवणे हीच युकती असून‌ यालाच योग म्हणतात.
कर्मयोग्याची बुद्धि स्थिर झाली की तो स्थितप्रज्ञ मानला जातो. स्थितप्रज्ञाला जी‌ शांती लाभते ती कर्मत्यागाने नसून फलाच्या त्यागाने मिळते.

191 

Share


Girish
Written by
Girish

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad