Bluepad | Bluepad
Bluepad
हसणे हसवणे
प्रतिभा
5th Aug, 2022

Share

चेहऱ्यावर नेहमी हास्य असणाऱ्या व्यक्तिला काहीजण माघारी नावेही ठेवतात. अरे वा बघावं तेव्हा हसत असतो सगळ्यात मस्त चालले वाटते नाहीतर मोठी लॉटरी लबाड लागलं असेल.
. परंतु, हसण्याचे विविध फायदे आहेत. त्यामुळे आजरांनाही दूर ठेवता येऊन, शरीर स्वास्थासाठी हसणे हे आरोग्यवर्धक आहे. अलीकडे तणावाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, हा तणाव घालविण्यासाठीही हसणे हा एक परिपक्क उपाय आहे
पण हसण्याचा क्लब किंवा हसण्यासाठी मुद्दामून केलेली थेरेपी ही काही माझ्या पचनी पडत नाही मनापासून हासू आलं तर ते हसू नाहीतर काय. डोळ्यात आसू आणि तोंडावर खोटं खोटं हसू.
हसणारी व्यक्ति ही मनमोकळे बोलणारी असते. तसेच समारेच्या व्यक्तिचा ताणही कमी होतो. त्याकरिता सर्वचदृष्ट्या हसणे हे खूप फायद्याचे आहे. कोणतेही काम करण्यासाठी नकारात्मकाऐवजी सकारात्मक विचार मनात येतात. स्वत: बरोबरच इतरांनाही आनंदी ठेवता येते.
विविध प्रकारचे कॉमेडी शो किंवा कॉमेडी चित्रपट पाहणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून खूप फायदेशीर आहेत. अशा कार्यक्रमातून मनमुरादपणे हसता येते. त्यामुळे अलीकडे विविध वाहिन्यावर कॉमेडी शो चे कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतात.हसण्यामुळे होणारे विविध फायदेमेंदूचा व्यायामहसण्यामुळे शरीराला एकप्रकारे ऊर्जा मिळते. त्यामुळे आयुष्य वाढते. शरीरात नव्या स्फूर्तीचा संचार होतो. ब्लेड प्रेशर कमी होऊन, दुख दूर करण्याचे कामही या हसण्यामुळे होते.
शरीरासोबत मेंदूचाही व्यायाम होतो.
चेहऱ्यावर नेहमी उत्साह दिसतो. चेहऱ्यावरवरील स्नायू सक्षम ठेवणे आणि रक्तसंचार वाढवण्यात हसण्याची भूमिका महत्त्वाची असते. यामुळे चेहºयावरील टवटवीतपणा कायम राहतो. प्रतिकार क्षमता वाढते. हसण्याने शरीराची प्रतिकार क्षमता व संसर्गासोबत लढणारी प्रणाली सक्षम होते. त्यामुळे संसर्ग आणि अ‍ॅलर्जीच्या प्रभावात येण्यापासून संरक्षण होते. तसेच आजारही दूर ठेवता येतात.संतुलन राखण्यासाठी हसणे हे फार उपयुक्त आहे. त्याकरिता एकटे राहण्यापेक्षा सदैव मित्रांसोबत वेळ घालविणे आवश्यक आहे. त्यामुळेही आपल्याला संतुलन राखता येते. हृदयासाठी उत्तम ज्यांना ह्दयांचा आजार आहे, अशांसाठी हसणे हे फार उपयुक्त आहे. १० मिनिटे व्यायाम केल्याने जेवढी ह्दयगती तीव्र होते. तितक्या ह्दयगतीसाठी एक मिनिट हसणे पुरेसे आहे.
हसणे ही ईश्वराने दिलेली आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हसल्याने आयुष्य वाढते असे मानले जाते.
हसण्यासाठी १७ स्नायुंचा वापर होतो तर रागावण्यासाठी ४३ स्नायुंचा वापर होतो.
हसणे हसवणे
म्हणूनच मनमुराद हसा हसा हसा हसा
प्रतिभा बोर्डे

186 

Share


Written by
प्रतिभा

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad