Bluepad | Bluepad
Bluepad
खरे खोटे
S
Shashikant Harisangam
5th Aug, 2022

Share

खरे खोटं देव जाणे.... 😄
........................................
ते दिल्लीला गेले
पुन्हा आले.
येऊन पुन्हा गेले.
रात्री आले सकाळी गेले.
उठल्यावर पहिले.
काय दिसलें?
पुन्हा दिल्लीला गेले!
ते येतात आणि....
जातात.
जाताना......
' यादी पक्की करण्याची '
हवा करतात.
येताना
' यादी लांबणीवर टाकल्याची '
बातमी आणतात.
त्यांचे...
हे येणे जाणे
त्यांच्यासाठी
सामान्यांना काय
सोयरसुतक त्याचे?
सामान्यांना काय फरक पडला.?🤔
तो जेल मध्ये गेला.
त्यांना जामीन मिळाला.
त्याने त्यात एवढा पैसा खाल्ला
कुठला तरी राष्ट्रीय पक्ष
सर्वात श्रीमंत पक्ष झाला😄😄
ऐकून जीव कंटाळला.
सामान्यांना काय दिलासा मिळाला.
खरे काय खोटे काय
पाहण्यात वेळ गेला.
पोटे भरावीत स्वतःची
म्हणून खेळ सारा.😄
.... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर 🙏🙏

174 

Share


S
Written by
Shashikant Harisangam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad