एखादा व्यक्ति वर होणारी कारवाई ED च्या मध्ये राजकारण आहे की नाही हा भाग वेगळा पण जेव्हा कारवाई मध्ये एखादा व्यक्ती दोषी आढळतो म्हणजे तो जनतेचा लुटारू सिद्ध होतो. आणि कार्यकर्ते त्यांच्यासाठी रस्त्यावर आंदोलन करतात ही बाब खूप गंभीर आहे.
समजा तुमच्या आमच्या घरातून चोरी करणाऱ्याला पोलिसांनी अटक करू नये का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या भिकाऱ्याने भुकेपोटी जर हॉटेल मधून वडापाव चोरला तर आपण त्याला बेदम मारतो आणि पोलिसांच्या ताब्यात देतो मग एवढे मोठे घोटाळे करून जनतेचा पैसा, जमिनी, मालमत्ता लुबाडणार्यांना समर्थन देताना लाज कशी वाटत नसावी लोकांना?*
*जेव्हा तो व्यक्ती न्यायव्यवस्थेमध्ये गुन्ह्यातून निर्दोष जाहीर केला जाईल तेव्हा नक्कीच त्याच समर्थन करा पण, भ्रष्टचारी भाजप चा असो अथवा सेनेचा असो किंवा इतर कोणत्याही पक्षाचा असो तो जनतेच्या नजरेत चोर च असला पाहिजे. आपण सामान्य जीवनात पण जर आपल्या आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल झाला तरी त्याला आरोपीच्या नजरेने पाहतो मग नेत्यांवर गुन्हा दाखल झाल्यावर कार्यकर्ते नी नेत्यांकडे पण आरोपी म्हणूनच पाहावे.*
*नेत्यांचे झोल लपवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यापेक्षा सगळ्याच राजकीय पक्ष्याच्या नेत्यांचे झोल बाहेर काढण्यासाठी रस्त्यावर उतरा तर भारत देश प्रगती करेल. अर्थव्यवस्था यांनीच सर्वात जास्त लुटलीये आणि मूर्खासारखे त्यांना समर्थन देताय याची लाज बाळगा. नेत्याबद्दल एवढं आंधळं प्रेम देशाच्या भवितव्यासाठी घातक ठरणार हे नक्की.*