Bluepad | Bluepad
Bluepad
ओढ प्रेमाची भाग--- 10
Ashok Ingole
Ashok Ingole
5th Aug, 2022

Share

दोन दिवस मजेत गेले. स्नेहल आता आधाराविना चालायला लागली होती. सूज पण पूर्णपणे गेली होती. दोन दिवसात तिची व पायलची छान मैत्री जमली होती .आणि शीतल ------ति --तर स्नेहल ला सोडतच नव्हती .आज मुक्कामाचा शेवटचा दिवस होता व उद्या सर्व नागपूरला व नेहा जावरा ला परत जाणार होते .परवा आशीशला पण मुंबई ला जॉईन व्हायचे होते .सर्वांचे जेवण आटोपले होते .सुभाष दीक्षित व प्रमोद रानडे सहकुटुंब निलेश सोबत मोहदाच्या साईट्स बघायला गेले होते .शशांक व आशिष कॅरम खेळत होते .स्नेहल किचनमध्ये शीतल करिता मॅगी बनवत होती .तशी नेहा व पायलची पण मॅगी खाण्याची इच्छा होतीच त्या दोघी टीव्ही बघत होत्या .शीतल स्नेहल जवळ उभी होती . तेवढ्यात डोअरबेल वाजली नेहाने हॉलचे दार उघडले तर समोर डॉक्टर भटनागर उभे होते.
"अंकल आप ?आइये ना " नेहा म्हणाली.
"नही बेटे मे जरा जल्दी मे हूं मै स्नेहल को लेने आया हूं .एक इमर्जन्सी डिलिव्हरी का केस आया है बाजू के गाव की महिला है बच्चा फंसा हुआ है ओर मेटरनिटी वॉर्ड की हेड डॉक्टर आज बाहर गई है-----स्नेहल ठीक है ना?आ सकती है ना ?"भटनागर म्हणाले तो पर्यंत पायल पण तिथे पोहोचली होती.
"अंकल यह डॉक्टर पायल रानडे है एमडी गायनिक है मेयो अस्पताल नागपुर मे है. स्नेहल के साथ इसे ले गये तो मदत ही होगी .अगर सीजर करना पडा तो यह काम आयेगी अगर आपके डीन परमिशन दे तो " नेहा म्हणाली.
"हे काय नेहा त्यांच्याकडे एक्सपर्ट असतील ना" पायल म्हणाली "अगं इमर्जन्सी आहे त्या आदिवासी महिलेचा जीव धोक्यात आहे म्हणून म्हटले" नेहा म्हणाली.
"बेटा यह तो बडी खुशी की बात है .आप दोनो चलो .---मै डीन साहब से बात करूँगा. ऐसे समय मे किसी की जान का बचना जरुरी होता है-" भटनागर म्हणाले . स्नेहल पण हॉलमध्ये आली . नेहा ने व डॉक्टर भटनागर ने तिला सर्व सांगितले .पायल ने स्नेहल चा हात धरला ."चल जाऊ या त्यांना मदत करु " ती म्हणाली.थोड्याच वेळात डॉक्टर भटनागर दोघींना घेऊन निघून गेले. शशांक व आशिष हे सर्व बघत होते. नेहा शितलला मॅगी खाऊ घालत होती .
"नेहा आपलं काही चुकलं तर नाही ना पायल ला पाठविण्यात " शशांकने विचारले.
" नाही रे " आशीष म्हणाला," एखाद्याचा जीव धोक्यात असेल तर रिस्क घ्यायलाच हवी ,पायल बरोबर करेल ,तिचा अशा केसेसचा चांगला अनुभव आहे, सोबत हॉस्पिटलची टीम पण असेलच ना" तो म्हणाला.
"काळजी करू नको भैय्या स्नेहल पण अशा केसेस च्या वेळेस ओटी मध्ये असते त्यामुळे सर्व व्यवस्थित होईल. माझा दोघींवर पूर्ण विश्वास आहे " नेहा म्हणाली . सायंकाळचे पाच वाजले निलेश आई-बाबा व काका काकू सोबत परत आला होता .सर्वांना आशिषने इथे घडलेला प्रसंग सांगितला.-----पहिले तर निलेश थोडा नाराज झाला पण नंतर प्रमोद रानडे ने त्याला त्यातली गंभीरता सांगितली तेव्हा तो पण नॉर्मल झाला .
"डॉक्टर म्हटलं की असे प्रसंग येतातंच त्यातून तावून-सुलाखून जो निघतो तोच तर खरा डॉक्टर असतो नाहीतर प्रोफेशनल डॉक्टर तर सर्वच असतात पण ज्याला प्रसंग समजता येतो तोच तर खरा डॉक्टर " सुभाष म्हणाला.
"आपण सर्व इंजिनियर आहोत आपल्याला एकदम हे फील्ड समजणार नाही " प्रमोद म्हणाला.
"सॉरी अंकल मी एकदम रिॲक्ट व्हायला नको होतं " निलेश म्हणाला.
"अरे तसं काही नाही तू काळजीपोटी नाराज झाला ना म्हणून पप्पांनी म्हटलं " आशिष म्हणाला.
बरोबर साडे सहा वाजता डॉक्टर भटनागर आले. स्नेहल व पायल पण हसत आल्या सर्व हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले .नेहाने पाण्याचे ग्लास आणले .
"थँक्स बेटा इस की बडी जरुरत थी" डॉक्टर भटनागर म्हणाले . "और थँक्स इस बात के लिए की तुमने मुझे डॉक्टर पायल को ले जाने की सलाह दी ,क्योंकी उनकी मदत से ही उस महिला की डिलिव्हरी आसानी से हुई ,उन्होने ही सिजर किया .सिजर के एक घंटे बाद हमारी डॉक्टर भी पहुंच गई .मगर असली काम इन्होने ही किया .आय ऍम प्राऊड ऑफ यू पायल " डॉक्टर भटनागर म्हणाले.
"थँक्स सर आप सब की हिम्मत से ही यह सब हो गया वरना जगह नई थी नये नये लोग पर सब कुछ ठीक हो गया .बच्चा उलटा हो गया था ना इसी कारण थोडा प्रॉब्लेम हो गया था "पायल म्हणाली.
"हमारे डीन सर तो काफी तारीफ कर रहे थे आपकी ,कह रहे थे मैने गौर किया इन का हाथ बहुत साफ है, आगे ब्राईट फ्युचर है. तो बेटा एक बार फिरसे धन्यवाद" म्हणत भटनागर उठले व बाहेर निघून गेले.
प्रमोद ,अलका ,सुभाष व वंदना कौतुकाने पायल कडे बघत होते पायल निलेश कडे बघत होती .त्याने स्मित करत तिच्याकडे बघितले "नवीन जागी येऊन तू आपल्या कामाची चुणूक दाखवली आम्हाला फार अभिमान आहे " निलेश म्हणाला.ती लाजली "थँक्स " ती हळूच म्हणाली.स्नेहल दोघांकडे बघत होती तिच्या लक्षात आलं प्रेमाचं अंकुर दोन्हीकडे वाढत होतं .संध्याकाळी अलका नी मस्त वांगे बटाट्याची भाजी बनवली होती .रमण ला सांगून आशीष ने रान गोवर्या मागवल्या होत्या.त्याची भट्टी पेटवून त्याने मस्त वऱ्हाडी रोडगे बनवले होते .
ओढ प्रेमाची भाग--- 10
फॉर्म हाऊस मधलं हे सर्वांचं शेवटचं सामूहिक जेवण या मुक्कामात लं होतं .त्याचा सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला.
दुसऱ्या दिवशी सकाळी सुभाष प्रमोद अलका वंदना व आशिष सेंट्रो कार ने नागपूरकडे रवाना झाले .शीतल स्नेहल ला धरून फार रडली व लगेच परत येईन म्हणत निघून गेली. पायल, निलेश शशांक व नेहा सोबत जिप्सीने निघाली.तिथे स्नेहलच्या एक गोष्ट पण लक्षात आली की नेहा व शशांक मधे पण कुठेतरी आलबेल दिसत होतं पण अजून कोणीही हिंट दिली नव्हती .पायल स्नेहलच्या काटेज पर्यंत तिच्यासोबत आली व नंतर निलेश ला जॉईन झाली. काटेजचे दार उघडे बघून स्नेहलला आश्चर्य वाटले तिने कार पार्क केली व आत गेली तर साने काका-काकू टीव्ही बघत होते.त्यांच्याकडे काटेजची एक चावी नेहमी राहायची.
"अरे काका तुम्ही कधी आले ?" तिने आश्चर्याने विचारले.
"आज सकाळीच आलो बेटा " रवींद्र साने म्हणाला "डॉक्टर भटनागर यांनी तुझ्या तब्येतीबद्दल सांगितले आणि आम्ही तेव्हाच येणार होतो पण तिथे ऑलरेडी भरपूर मंडळी होती ती गेल्यावर तुला एकटे पडू नये म्हणून हिने आज यायचं ठरवलं " त्याने उषा कडे बोट केले.
"आता पाय कसा आहे ग?" उषा ने विचारले.
" आता पुष्कळ बरा आहे काकू पण या पाया मुळे खूप लोकांना त्रास झाला पण एका दृष्टीने सर्वांचं त्या निमित्ताने आउटींग झाले" स्नेहल म्हणाली.
"हेच ,प्रत्येक गोष्टीतून चांगलं शोधायचं असतं नेहमी ,आणि ते तुला जमू लागलं आहे " रवींद्र म्हणाला .
"उद्या शनिवार व नंतर रविवार असल्यामुळे आम्ही इकडे निघून आलो " उषा म्हणाली.स्नेहल ने बॅग वगैरे आपल्या रूम मध्ये ठेवली .उषा काकूंनी तिला चहा आणून दिला. सोबत गरमागरम पोहे पण ब्रेकफास्टला होते. स्नेहल ला अश्रू अनावर झाले. तिच्या डोळ्यात पाणी बघून उषा ने तिच्या डोक्यावर हात ठेवला .
"काय झालं स्नेहा"? तिने विचारले.
"काकू किती प्रेम करतात सर्व माझ्यावर, मम्मी-पप्पा नसल्याचा भास पण होऊ देत नाहीत" स्नेहल म्हणाली .दोन थेम्ब अश्रु गालावर ओघळले ."नो स्नेहा ,रडायचं नाही ----एका पोलीस कमिशनर ची मुलगी आहेस तू ----जे घडलं ते विसरून आपल्याला समोर जायचं आहे ----आणि बेटा तू आहेसच इतकी गोड की सर्व तुझ्यावर प्रेम करतात", साने तिला समजावत म्हणाला.
"हेच तर कळत नाही काका ,मी ज्याच्यावर प्रेम केलं त्याला माझं काहीच वाटत नाही" ती हळू स्वरात म्हणाली.
"तू राहुल बद्दल बोलतेस ,तो तर फारच स्वार्थी निघाला .परवा पुण्याहून एसपी भारद्वाज यांचा फोन होता त्यांनी सांगितलं की प्रभाकर पवारला पॅरॅलिसिस चा अटॅक आला आहे व ते दोघं एकटेच पडले आहेत,राहुल त्यांना सोडून पत्नीसोबत मुंबईला निघून गेला आहे .तो सासर्याच्या मेहेरबानीने जसलोक ला लागला आहे .अशा घातक माणसाचा विचार करू नको बेटा त्याने तुला पण नंतर त्रास दिला असता." साने गंभीरतेने म्हणाला.
"हे पटतय काका मला ,कारण जेव्हा संकट आलं होतं तेव्हा तुम्ही छिंदवाडा हून आले. पण पवार काका पुण्यात असून कधीच आले नाही किंवा त्यांच्याकडून साधा फोन पण नाही आला .हळूहळू प्रयत्न करत आहे त्यांना विसरायचा " स्नेहल स्मित करत म्हणाली तरीही डोळे पाणावलेले होते.उषाने तिचे डोळे पुसले.
"आता यांना डोळ्यात स्थान द्यायचं नाही ,आम्ही आहोत ना, तुझं सगळं बघू, तुझं पालकत्व आम्ही घेतलेलं आहे मागे हटणार नाही जे बोलायचं सगळं मोकळं बोल पण एकटी पडू नकोस बेटा " उषा म्हणाली. रवींद्र थोडा भाऊक झाला "स्नेहल आम्हालाही तुझ्या शिवाय जवळच सध्यातरी कोणीच नाही" तो म्हणाला. स्नेहल ते प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघितले.
"हो बेटा उषा म्हणाली "आमचा एकुलता एक मुलगा सारंग हा आयआयटी इंजिनियर होऊन कॅलिफोर्नियाला गेला तो कायमचा ---तिकडे लग्न करुन स्थाई पण झाला ,---कधी फोन नाही की संभाषण नाही ,---आम्हाला नात झाली हे सुद्धा यांच्या तिथल्या मित्रांनी सांगितले . पण त्याने साधी तसदी सुद्धा घेतली नाही" उषाचे डोळे भरून आले.
"नाही काकू आता आपण सर्व विसरू, मला हे माहीत नव्हते .मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. मी तुमची मुलगी आहे व यापुढे तुम्हाला दुःख होऊ देणार नाही" स्नेहल म्हणाली तिने उषाला मिठी मारली. सानेच्या डोळ्यातून अश्रु वाहत होते पण ते आनंदाचे होते.स्नेहल ला दोघांमध्ये मम्मी पप्पा चा भास झाला.
"डोळे पूस व आता नव्याने सुरुवात करू " उषा म्हणाली .दोघींनी छान स्वयंपाक केला.
ओढ प्रेमाची भाग--- 10
जेवण वगैरे आटोपल्यावर स्नेहलने निवांत बसून त्यांना फार्महाऊसवर घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या विशेष कर शितल बद्दल तिने फारच आपुलकीने सांगितले .
"काकू ती तर मला सोडायलाच तयार नव्हती फार लळा लावला तिने,कसं काय तिच्या आईने तिला सोडलं याचेच नवल वाटते " स्नेहल म्हणाली.
"बेटा काही स्त्रिया पण स्वतः पुरताच विचार करतात बाकी त्यांना संबंध नाते यांच्याशी काही घेणेदेणे नसते मग स्वतःचं पोर पण त्यांना नकोसं वाटते " उषा म्हणाली.
"फारच गोड मुलगी आहे ग काकू ती" स्नेहल म्हणाली.
"तिचे आजी-आजोबा तिला आई पेक्षा जास्त माया देतील बघ " उषा म्हणाली .
"हो ते तर फारच जीव लावतात त्या छकुली वर" स्नेहल म्हणाली "बेटा या जगात सर्वांनाच सर्व काही मिळत नसते पण जे मिळालं त्यात खुश कसे राहता येईल हेच बघणे महत्त्वाचे आहे " रवींद्र म्हणाला .
"हो काका मलाही हे पटत आहे" स्नेहल म्हणाली.
दोन दिवस डॉक्टर रवींद्र साने व उषा स्नेहल सोबत मोहदाला च होते .संध्याकाळच्या जेवणाला डॉक्टर भटनागर पण त्यांना कंपनी द्यायला यायचे.सोमवारी सकाळी रवींद्र साने व उषा छिंदवाडा ला निघून गेले .दोन दिवसात स्नेहल ला मायेची ऊब काय असते हे जाणवलं होतं .एरवी फार कमी बोलणारी उषा फारच जिव्हाळ्याने बोलत होती .दोघेही गेल्यावर स्नेहल ला मम्मी पप्पा ची आठवण आली व मंद स्मित करून तिने स्वतःलाच धीर दिला .आजपासून ती हॉस्पिटलला जाणार होती.
---------------*----------------*---------------*---------------
नागपूरला गोकुळ पेठ मध्ये आपल्या बंगल्याच्या पोर्चमध्ये इझी चेअरवर प्रमोद निवांत बसून पेपर वाचत होता .सकाळचे आठ वाजले होते .त्याचा व अलका चा सकाळचा चहा सहा वाजताच आटोपला होता .आता आठ ची कॉफी यायची वाट होती . रिटायरमेंट जीवन असंच सुरू होतं .सकाळी पाच साडेपाचला उठून तो मॉर्निंग वाकला रविनगर पर्यंत जायचा व नंतर चहा वगैरे घेऊन पेपर वाचन करायचा.आजही तेच चालू होते. अचानक शितल धावत आली .
"आजोबा आजोबा मला स्नेहल अँटी ला फोन लावून द्या ,तिची खूप आठवण येत आहे मी बोलते ना" ती लाडीगोडीने म्हणाली.प्रमोद ने तिच्याकडे बघितले ती उत्सुकतेने फोन लावायची वाट बघत होती.
"बेटा माझ्याकडे स्नेहल चा नंबर नाहीये मी आत्याला सांगतो पायल " त्यांनी आत बघून आवाज दिला.
" आली पप्पा " म्हणत पायल आली.
"हिला स्नेहल चा नंबर लावून दे तिला बोलायचं आहे" प्रमोद ने तिला सांगितले.
"शितल मला सांगायचं ना बेटा चल लावून देते " म्हणत पायल शीतलला आत घेऊन गेली.
"काहो शीतलची स्नेहल शि फारच गट्टी जमली आहे" आतून येत अलका म्हणाली "दिवसातून पाच-सहा वेळा तरी तिची आठवण काढते व आल्या पासून रोज फोन लावून मागते".
"हो ना हे माझ्या पण लक्षात आलं आहे मोहदाला असताना ती स्नेहल जवळ झोपायची आणि ती पण तिला जेवण भरवायची व तिची आपल्या मुलीसारखी काळजी घ्यायची" प्रमोद म्हणाला.
"मी काय म्हणते ?-----सून करायची का आपण तिला " अलका हळू स्वरात म्हणाली.
"आता बोललीस ---पुन्हा बोलू नको ,----या मुलांची ती मैत्रीण आहे आपल्या आशीषचा घटस्फोट झाला आहे हे माहीत असून---- आपण तिच्या लाचारीचा फायदा घ्यायचा नाही. आई-वडील नसले तर काय ,आपण तिच्यामागे खंबीरपणे उभं राहायला हवं आणि हे कदाचित आशिष ला पण पटणार नाही .त्याला तिची फार काळजी आहे म्हणून सांगतो. परत असले विचार मनात आणू नको " प्रमोद थोडा कडक स्वरात म्हणाला.
"तसं नाही हो मला ती फार आवडली म्हणून मनातलं बोलली आता नाही बोलणार" अलका सांभाळून बोलली .तेवढ्यात पायल मोबाईल घेऊन आली.
"मम्मी स्नेहल ला तुझ्याशी बोलायचं आहे बोल " तिने फोन अलका कडे दिला.
"हॅलो काकू कशा आहात?"पलीकडून स्नेहल चा आवाज आला.
"बरी आहे गं तुझं सांग"
"काकू सर्व निघून गेल्यावर एकदम सुनंसुनं वाटत होतं खास कर आपल्या छकुलीची फार आठवण यायची " स्नेहल म्हणाली.
"अगं ती तर रोज तुझ्या नावाचा जप करत असते आपण कधी जाऊ असे विचारत असते" अलका म्हणाली.
"फारच गोड आहे हो काकू ती ,मी नागपूरला आली की येईल तिला भेटायला असं मधून मधून आम्ही फोनवर बोलत असतोच " स्नेहल म्हणाली.
"तुझा पाय चांगला झाला ना आता"
"हो काकू आता काहीच त्रास नाही" स्नेहल म्हणाली. पायल ने फोन घेतला व ती बोलत बोलत आत निघून गेली.
प्रमोद अलका कडे बघत होता ती फार उदास झाली होती. " कसं नशीब आहे हो या मुलीचं",
"हे तर त्यालाच माहित" प्रमोद मी बोट वर केले.
अचानक आतून पायल चा आवाज आला. ती शीतलला आवाज देत होती ."शितल शितल काय झालं ग? मम्मी पप्पा इकडे या" ती जोरात ओरडली .प्रमोद व अलका दोघेही धावतच गेले .शितल बेडवर पडली होती तिचे डोळे बंद होते.
" काय झालं ग हिला" घाबऱ्या स्वरात अलका म्हणाली.
"तू थांब इथे मी बघते " म्हणत पायल आपल्या रूममध्ये पळाली ती येताना स्टेथेस्कोप व बीपी मोजायचे यंत्र घेऊन आली .स्टेथेस्कोप लावून तिने तपासले हार्टबीट थोडे वाढले होते तिने बीपी मोजला तो नॉर्मल होता .
"अग ही एकदम घेरी येऊन पडली, मी उचलून तिला बेडवर ठेवले" पायल म्हणाली.
"शितल --बेटा ----शितल " प्रमोद तिला हलवत आवाज देत होता पायल ने तिचे तळहात चोळले थोड्या वेळात तिने हळूहळू डोळे उघडले ."आत्या " ती म्हणाली ,
"बोल बेटा काय झालं " पायल तिच्या जवळ बसून म्हणाली .
"मला एकदम झोप आली ग " तिला काय झालं नेमकं सांगता येत नव्हतं. पायल समजून गेली तिला घेरी आली होती. ती उठून बसली. "अग हिने आज दूध पण नाही घेतले " अलका म्हणाली "मी आणते " अलका किचनमधून दूध बिस्किट घेऊन आली. पायल ने तिला दूध पाजले व बिस्कीट खायला दिले.
"काय झालं असेल पायल हिला " प्रमोद चिंतेने म्हणाला.
"पप्पा मला वाटते आपण काही टेस्ट करून घेऊ , मी डॉक्टर सहानी सोबत बोलते ,ते चिल्ड्रन स्पेशालिस्ट आहे हिला दाखवून देऊ जास्त अंगावर काढणं बरं नाही" पायल म्हणाली."मी दादाला पण कळवते तो असला तर बरं राहील",
" ठीक आहे बेटा " प्रमोद म्हणाला.
पायल ने आशिष ला फोन करून सर्व सांगितले .आशिष दुसऱ्या दिवशी नागपूरला आला .शीतलला पायल सोबत तो डॉक्टर सहानी कडे घेऊन गेला.शितल दोन दिवस तिथे ॲडमिट होती . बऱ्याच टेस्ट केल्या नंतर तिला काही औषधे देण्यात आली. डॉक्टर साहनीची ट्रीटमेंट दोन महिने घेतल्यावर एक दिवस शीतलला पुन्हा तसाच त्रास झाला .त्यामुळे पायलचं टेन्शन वाढलं.------शितल पण पूर्वीसारखी मोकळी राहत नव्हती. तेव्हा पायलने स्नेहल ला फोन करून काही दिवस नागपूरला बोलावले.स्नेहल सुट्टी टाकून नेहा सोबत नागपूरला आली .शीतल तिला बघून खूपच आनंदीत झाली पायलने स्नेहल ला आपल्या बेडरुम मध्येच शेअर केले . शितल पूर्वीसारखी आनंदी राहत होती ..हे बघून प्रमोद व अलका ला पण बरं वाटलं .आशीष मुंबईला निघून गेला होता .नंतर शीतलला आठ दिवस तरी पूर्वीसारखं झालं नाही .त्यामुळे स्नेहल परत निघून गेली.नेहा पण जावरा ला निघून गेली शितल , स्नेहल जाताना खूप रडली ,स्नेहल ला पण फार वाईट वाटत होते.फारच जीव जडला होता तिच्यावर शीतलचा.प्रोटिन्स वगैरे घेतल्यानंतर शीतल ची तब्येत पूर्ववत झाली होती .डॉक्टरांनी औषधे बंद केली . प्रमोद व अलका रोज दिला जवळच्या बागेत फिरायला न्यायचे व आई नसलेल्या आपल्या नातीला आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचे.
ओढ प्रेमाची भाग--- 10
-----------*--------------*----------------*---------------*-------------
(क्रमशः) गोड प्रेमाची भाग--- 10 पूर्ण.

164 

Share


Ashok Ingole
Written by
Ashok Ingole

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad