आपल्या देशाची न्यायव्यवस्था इतकी चांगली आहे की निर्दोष व्यक्ती हा गुन्हा केला नसेल तर त्याला शिक्षा होऊ नये . अशा प्रकारची संविधानात तरतूद केली आहे . परंतु देशात एक वेगळीच प्रतिष्ठा प्रवाहाला समर्थन करण्याची स्पर्धा लागलेली आहे . चोर असेल तरी समर्थन . चोरी करणाऱ्या ला समर्थन . माणसाला लाज त्याच्या दुर्गुणांची वाटावी . गरीबी दारिद्र्याची लाज वाटू नये . चोर हा कोणताही असो गुन्हा सिद्ध होत असेल तर तो चोरच अन्यथा नाही. साधं घरात समाजात देशात चुकीचं बोलणं सुध्दा गुन्हा ठरतो . तो मानभंग ठरतो . व्यक्तीस्वातंत्र्याला बंधने आहेत . घरात पाच पन्नास शंभर रूपयांची चोरी झाली असेल तर घरातील नौकरावर संशय घेतला जातो. आरोप केला जातो . गुन्हा केला नसेल तरी केव्हा केव्हा मारहाण केली जाते . चोर नजरेने त्याला बघीतले जाते .एखादा भिकारी भुकेपोटी हाँटेलमध्ये खाण्याचे पदार्थ घेतला तरी त्याला चोर संबोधले जाते . गरीबीच्या खातर औषधांसाठी पैसा नसणारा पाॅकेट मारला तरी त्याला चोर म्हटल्या जाते . परंतु देशाची मालमत्ता संपत्ती पैसा लुटणार्यांना मान सन्मान प्रतिष्ठीत समजले जाते . अधिक संपत्ती गैरमार्गाने जमा करणं हा गुन्हा समजला जातो . मग तो अधिकारी असो पदाधिकारी असो की लोकप्रतिनिधी असो की देशाच्या सर्वोच्च पदावर काम करणारे सेवक असो .जेव्हा यांच्या संदर्भात अधिक मालमत्ता देशाची संपत्ती लुटली आहे . याकरिता देशातील यंत्रणा सक्षम आहे. गुन्हा केला आहे किंवा नाही यासाठी चौकशी केली जाते .तेव्हा देशातील जनता चुकीचे समर्थन आंदोलन करतात. निदर्शने करतात रस्त्यावर उतरतात . राष्ट्रीय संपत्ती मालमत्तेचे नुकसान करतात .तेव्हा हे समर्थन योग्य कि अयोग्य याचा विचार गंभीरपणे व्हायला पाहिजे .आज देश आहे म्हणून आपण सुरक्षीत आहे . देशात काही प्रामाणिक आहेत . त्यांचा तसा प्रयत्न देशाला संपन्न करण्यासाठी करीत आहेत. आपण कोणत्या लोकांना पाठीशी घालतो . जो गुन्हेगार आहे किंवा नाही हे तपास यंत्रणा सिध्द करेलच. जर तो निर्दोष ठरत असेल तर त्याचा सन्मान करा . हार तुरे घालून स्वागत करा. अन्यथा शिक्षा द्यायला न्यायव्यवस्था सक्षम आहे. जर अमाप संपत्ती मालमत्ता जमविणारा गुन्हा केलाच आहे . गुन्हेगार आहे हे सिध्द झाले तरी कोणता फरक पडतोय . जास्तीत जास्त दोन सहा महिने दोन चार पाच वर्षे जेल ची शिक्षा .यांना फाशीची शिक्षा तर नाही. जास्तीत जास्त काय तर दोन पाच वर्ष जेल मध्ये काढून पुन्हा बाहेर येऊ. हात वर करून अभिवादन करणार. जनताही विसरून माफ करणार .फरक काय पडतो . काही हिस्सा भरपाई किंवा जप्त असते .न्याय प्रक्रिया चालू असतं. काही संपत्ती कायमची प्राप्त होते . पुढील वारस मालक बनतात . पाचशे हजार दहा हजार पन्नास हजार कोटींचे मालक बनतात. पुन्हा बाहेर पडतात . सन्मानीत होतात . सन्मानाने प्रतिष्ठेचे जिवन जगतात. नुकसान कोणाचं झाले . कुणाचेच नाही . पुर्ण सेवा करुन सेवानिवृत्ती नंतर एक कोटी जमा होत नाहीत .गरीब मेहनत करुन ही लाख रुपये मिळत नाहीत. व्यापारी व्यवसाय करूनही एक दोन कोटी कमववित नाही. हि विसंगती विचारात घेतले तर समर्थन कि निशेध हे सहजच समजेल.आम्हाला थोडीही लाज वाटत नाही. आम्हि कुणाला साथ देतोय . कुणाला समर्थन देतोय. जो पर्यन्त देशात हा तमाशा चालू असणार तोपर्यंत देश आर्थीक महासत्ता बनणार नाही. अन्यथा ते दिवस दुर नाही. जे आज पाकिस्तान श्रिलंका मध्ये चालू आहे . भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच असतो. तो विचाराचा असो संपत्तीचा असो किंवा वर्तनाचा असो .चोरी ही चोरीच असते ते गरीबी मुळे केलेली असो. अथवा प्रतिष्ठा मालमत्ता वाढविण्यासाठी श्रीमंती साठी केलेली असो . चोरी करणाऱ्या ला साथ देणाराही चोर ठरतो . मग गैरकृत्याला समर्थ़न करणारे ,प्रवाह वाढविणारे निदर्शने करणारे हे चोरांचेच साथीदार नाहीत का . आपल्याला देशाला विश्वगुरू महासत्ता बनवायचे आहे. मग कोणत्या गोष्टींचे समर्थन करायला हवे हे कळायला नको का .हीच आम्हची संस्कृती का .हेच आम्हचे संस्कार का .आजही या देशात अशी माणसं आहेत. होऊन गेलीत त्यांच्याकडे कोणीही बोट दाखविण्याची ताकद नाही. हिम्मत नाही .असे मोजकेच व्यक्तीमत्व जन्मला आलेत जे आमचे आदर्श आहेत .ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज .देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे झटणारे ज्यांनी देशाच्या संपत्ती वर नाही .तर देशावर प्रेम केले. ज्यांनी देश विकासाची स्वपन पाहीले . देशातील गरीब दिनदलीत सुखी संपन्न झाला पाहिजे. शेतकरी शेतमजूर सुखी संपन्न झाला पाहिजे. परंतु आज देशात वेगळाच प्रवाह निर्माण होतो आहे. वेळीच सावधानता बाळगणे रोखणे थांबविणे गरजेचे आहे.याऊलट अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी रोखण्यासाठी विरोध करण्याची गरज आहे . समर्थन करण्याऐवजी निवेदन विरोध निदर्शने करण्याची गरज आहे. परंतु पुन्हा अशा व्यक्तीमत्त्वाबाबत समर्थन करणं म्हणजे प्रोत्साहन देणेच आहे. यामुळे भ्रष्टाचार वाढणार कि कमी होणार .अशा लोकांसाठी समर्थन करताना कसं थोडीही लाज वाटत नाही. देशात महापुरुष जन्माला आलेत. क्रांतीकारक होऊन गेले. द़ेशाला स्वतंत्र करण्याकरिता आपल्या प्राणांचे बलिदान दिले. ते केवळ हे दिवस बघण्यासाठीच का .नेत्याबाबतच एवढं आंधळं प्रेम.हे देशाला नक्किच भविष्यात विघातक ठरणार आहे. यामुळे भांडवलशाही चा पुन्हा जन्म होईल. गरीब शेतकरी शेतमजूर यांच्या जमिनी शेती संपुष्टात येईल. तुमच्या आमच्या सर्व जमिनीचे मालक हेच संपत्ती लुटणारे बनणार यात शंका नाही. याच जमिनीवर मोठ मोठे फ्लॅट्स बननार. आणि आपणालाच विकत घ्यावी लागेल. देशावर आंतरराष्ट्रीय स्तरावर सत्तर लाख कोटींचे कर्ज आहे. यात प्रत्त्येक राज्यांवर लाखो कोटींचे कर्ज घेतलेले आहे. हे कशासाठी.देशात जन्माला येणाऱ्या नवजात बालक कर्ज घेऊन च जन्मला येतात. माता पिता कर्जातच निधन पावतात. कोणाला मोठे करण्यासाठी.मतदार विकला जातो. मोफत अन्नधान्य विज देण्याचं आश्र्वासन दिलं जातं. निवडणूका आलेत करोड रुपयांची आयात निर्यात केली जाते. कोठून आला हा पैसा. यांचा जाॅब विचारणा करण्याचा मतदारांचा अधिकार नाही का. माणूस कोणताही असो तो देशापेक्षा मोठा नाही . लोकप्रतिनिधी हे पक्षांचे असले तरी ते लोकांसाठी आहेत . लोकांची फसवणूक ही क्षमा करण्यासाठी नाही. तो देशातील नागरिंकाप्रती केलेला विश्र्वासघात आहे .माणसाचा विश्वासघात हा गुन्हाच आहे . या देशात वन्यप्राण्यांची शिकार सुध्दा गुन्हाच आहे. त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. इथे तर माणसाचीच शिकार होते आहे. हा पैसा देशातील जनतेच्या परिश्रमाचा कष्टाचा मेहणतीचा गरीब शेतकरी शेतमजूरांचा कर्मचारी यांनी दिलेला महसूल करातुन प्राप्त झालेला आहे . तो देशहितासाठी विकासासाठी उपयोगात आणले पाहिजे. नेत्यांना मोठे करण्यासाठी नाही. आमची एकच जात माणूस मानव जन्म एकच धर्म माणुसकी आणि एकच राष्ट्रीय त्व भारतीय .तो कोणीही असो. अधिकारी पदाधिकारी नेते कार्यकर्ते पक्षप्रमुख पक्षातील लोक सारे माणसंच आहेत. कोणी लहान नाही. कोणी मोठा नाही . सर्वाँना समान न्याय . समान कायदे. लढा देऊ हक्कासाठी . नेत्यांसाठी नाही. आपल्यासाठी नेता आहे .आपण नेत्यांसाठी नाही. भारत माझा देश आहे. सारे भारतीय बांधव आहेत. आपली प्रतिज्ञा . आपले संविधान यांचा सन्मान करू या.
. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर , माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री .अशा व्यक्तीमत्वाना शतदा प्रणाम