पत्नीशी सेक्स करून देखील माझे मन भरत नाही. मी हस्तमैथुन करतो. ही सवय कशी घालवू ?
Dr Rahul Patil Kolhapur
5th Aug, 2022
Share
आजचा स
जोडीदारामधे सतत सेक्स भूक सारखीच असते असे नाही. एकाला जास्त असेल, एकाला कमी असेल. पुरुष विवाहित असेल तर हस्तमैथुन करत नसतात असे नाही. त्यामुळे त्यात काही गैर नाही. पुढचा पार्टनर तयार नाही, उपलब्ध नाही, वेगवेगळी लैंगिक आवड, भूक असेल तर हस्तमैथुन करणे नॉर्मल आहे. साहजिकच ही सवय नाही आणि वाईटही नाही. इतर काही मानसिक आजारात लैंगिक क्रिया केल्या की बरे वाटते म्हणूनही हस्तमैथुन केले जाते. मूळ कारण शोधून काढण्यासाठी योग्य डॉक्टरचा सल्ला घ्यावा.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)