Bluepad | Bluepad
Bluepad
शुभ ....
विश्वास बीडकर
5th Aug, 2022

Share

शुभ शुक्रवार .
रिमोट कंट्रोलशी खेळतं होतो . अचानक एक कलाकृती अशी गवसली की तो रिमोट कंट्रोल मग पाच - सहा तास लांबच राहिला .
' पंचायत ' नावाची ती कलाकृती .
अमेझॉन च्या प्राईम व्हिडिओ वर ती दोन सिझन मध्ये आठ - आठ भागांत आहे .
बघितली असेल तर , आधी मी तुमच्यावर रागविन . एवढे दिवस का सांगितलं नाहीत बघ म्हणुन ...
फुलेरा नावाचं खेडं .जिल्हा बलिया उत्तर प्रदेश . त्यातलं पंचायत कचेरी . त्या खेड्यात या सोळा भागात आपण शब्दशः जगतो . दिग्दर्शक दिपक कुमार मिश्रा हे ३२ वर्षाचे आहेत . अनुभव मात्र ६४ वर्षा सारखा आहे . अतिशय सरळ साधं रोजचं जगणं हेच दिग्दर्शन . कथाच मुळात अतिशय समृद्ध . घडणारया घटना एकापेक्षा एक वेगळ्या आणि शहरी जीवनापेक्षा खूप दूरच्या . मध्येच आठवण होईल ती द .मा .मिरासदारांच्या काही गोष्टींची तर कधी शंकर पाटील यांच्या कथा - कथनाची .
भुमिकेत दम असला की त्या कोण करतं आहे हे महत्वाचं ठरतं नाही . तसं या सिरियल चं आहे . रघुवीर यादव आणि निना गुप्ता हीच नाव ओळखीची . इतर कलावंत अनोखे पण पहिल्या भागानंतर ते एवढे आपले आणि जवळचे वाटू लागतात की दुसरा भाग आपण क्षणात बघायला उत्सुक होतो .
खरं म्हणलं तर , अशा खेड्यातल्या जीवनावर एक एवढी मोठी कलाकृती निर्माण करणं हेच धाडस . आजकाल हा विचार तरूण मंडळी करत नाहीत यातचं कलेचं यश आहे .
शुध्द हिंदी ऐकणं हा एक अनुभव आपल्याला मिळतो तो अजून एक आनंद .
तुम्ही जर नोकरी निमित्त कधी खेड्यात राहिला असाल तर ती अनुभूती परत एकदा मिळेल . नसाल कधी खेड्यात गेलात तरीही हे आयुष्य तुम्हाला नक्की आवडेल ही खात्री .
एवढं लवकरात लवकर करा .
आपल्या सगळ्या पंचायती सोडून द्या .
आणि ,
ह्या , ' पंचायत ' ला भेट द्या .
विश्वास बीडकर .
५ ऑगस्ट २०२२ .

188 

Share


Written by
विश्वास बीडकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad