Bluepad | Bluepad
Bluepad
श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान पिठापूर
Shrikrishna Savargaonkar
Shrikrishna Savargaonkar
5th Aug, 2022

Share

🙏🚩॥अमृतवाणी॥🚩🙏 श्रीपादांचे श्रीक्षेत्र पिठापूर आंध्रप्रदेश येथे आहे . प.पू . सज्जनगड रामास्वामी यांनी या स्थानाचा शोध त्याचे सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी यांचे आज्ञेने घेऊन त्याठिकाणी मंदिर बांधले . श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान ते हेच आहे . श्रीपादांचे समकालिन शंकर भट हे कन्नड ब्राह्मण , त्यांनी श्रीपादांचे आज्ञेनेने श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहला त्यानंतर तो तेलगू भाषेत लिहला . हा ग्रंथ अनेक भाषांत अनुवादीत झाला . त्याचे पारायण भक्तांचे अभिष्ट करते . सिद्ध मंगल स्तोत्र हे श्रीपादांचे अत्यंत प्रिय स्तोत्र आहे . याचे नित्य पठणाने अनेक सत्पुरुषांचे दर्शन घडते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात . राखी पौर्णिमा हा पिठापूर मधील महत्वाचा उत्सव आहे . जे भक्त या दिवशी श्रीपादांच्या सानिध्यात येतात , त्यांना राखी बांधतात . अशा भक्तांचे भाग्यवर्धन करतात . श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो . 🙏 श्रीकृष्ण सावरगांवकर ०४/०८/२०२२ 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान पिठापूर

183 

Share


Shrikrishna Savargaonkar
Written by
Shrikrishna Savargaonkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad