Bluepad | Bluepad
Bluepad
टिकवण्याचे १०० मार्ग जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत तोडण्याचा एक मार्ग स्वीकारायचा नाही
Madhuri
Madhuri
4th Aug, 2022

Share

काल एका मित्राला भेटण्याचा योग आला साधारण अडीच वर्षांपूर्वी तेही एक कामासाठी भेटलो होतो आणि त्यानंतर काल भेटले मी ओळखत पण नव्हते त्याला तशी जुजबी माहिती फक्त जवळच्या मैत्रिणी कडे एक केस आली होती एक फॅमिली मॅटर आहे मुलीला नांदायला जायचा आहे मुलाला नकोय असा काहीसा मॅटर होता यात जरा मदत हवी म्हनुन माझ्या मैत्रिणी ने मला सांगितलं बघ काही करू शकतो का आणि याच कामासाठी मी याला काल भेटले
मी विषय सांगितल्यानंतर त्याच मत असा आले अग मधू आपण हे करू पण त्याला नकोय हे लग्न तर तिचा हट्ट म्हनुन तर हे सगळं नाही ना त्याच हे बोलणं ऐकून मला काय झालं माहित नाही मी सहज बोलले गेले
टिकवण्याचे १०० मार्ग जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत तोडण्याचा एक मार्ग स्वीकारायचा नाही
तोडतो आपण एकदाच आणि तुटण्याचा त्रास हा दोघांना हि होतो हा हे खरंय कधी कधी तुटण्याचा त्रास दोघांना एकच वेळी आणि तितकाच होतो तर कधी दोघांपैकी एकाला आधी कमी दुसऱ्या ला आधी जास्त होतो पण नंतर हे हि उलट होते ज्याला आधी कमी झाला त्याला नंतर जास्त होतो आणि तिसऱ्या परिस्थिती त एकाला खूप त्रास होतो दुसऱ्याला अजिबात नाही पण यात कालांतराने दुसऱ्याला चारपटीने जास्त त्रास होतोच हि नियती आहे
मग जर त्रास च होणार आहे तर हे थांबवता येत असेल तर प्रयन्त करू त्या मुलाला आपण नंतर समजावू ना कि ऍडजस्ट आणि कॉम्प्रोमाइझ हे करावंच लागत कोणताही नातं असो
मी हे बोलत असताना तो एकटक माझ्याकडे बघत होता माझ्या हे लक्षात नंतर आले आम्ही नंतर इकडच्या तिकडच्या गप्पा मारून एकमेकांचा निरोप हि घेतला आणि मी माझ्या कामात लागून गेले
तिकडे मात्र तो तिथेच अडकला होता त्याच ठिकाणी माझे वाक्य माझा चेहरा माझा आवाज त्याच्या समोर तेच तसाच चालू होत
सकाळी त्याचा कॉल च आला आणि मला बोलला मधू तू काल जे काही बोललीस ना ते तू माझ्या एक मित्राला बोलशील का प्लीझ मी बोलले अरे तू बोल कि तर तो बोलला मी बोलोलो तरी तुझ्यासारखं नाही जमणार तुझ्या आवाजातला तो खोलपणा तुझी ती तडप मला तुझ्यासारखं नाही बोलता येणार प्लीझ तू बोल ना मी हि ठीके बोलले आणि त्याने त्याच्या मित्राला कॉल वर घेतला सुरवातीला त्याचा मित्र कसाही काही हि बोलत होता मला काही जमेनाचं त्याच्याशी डील करायला पण बोलण्याच्या ओघात त्याच्या तोंडातून काही बिघडत नाही काही फरक पडत नाही या एक वाक्याने माझ्यातली मधू सटकली मग जे मी बोलले ते बोलले आणि इतकी बोलले कि त्याची बुद्धी जरा जागेवर आली जागेवर त्याचा कॉल तर आम्ही ठेवला
पुन्हा माझ्या मित्राचा कॉल आला संध्याकाळी कि त्याच्या मित्राने डिव्होर्स चा खूळ डोक्यातून काढला हा म्हणे मधू अंग वकील असल्यामुळे किती केस येतात जातात इतकी माणसं पहिली अनुभवली तू कुठे जन्मली
कसं जमत तुला इतक्या आत्मीयतेने बोलायला मी फक्त इतकंच बोलले ज्याने तुटण्याचा त्रास भोगलाय ना त्यालाच तो त्रास समजतो हा त्रास कोणाला कधीच होऊ नये माझ्या मुळे एकाचा हि हा त्रास जर कमी झाला किंवा टाळता आला ना मी ते करणार
काल ची केस आता त्याने मनावर घेतलीये स्वतः वकील आणि त्यात स्ट्रॉंग फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे वडील पोलीस खात्यात याचा काय ती ताकत लावून का होईना तो हि आज माझ्यासाठी हे नातं वाचवण्याचा पर्यन्तात लागलाय
बदल घडवण्याचा आमचा प्रवास चालू झालाय
थोडा तरी बदल आम्ही नक्की आणू

0 

Share


Madhuri
Written by
Madhuri

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad