Bluepad | Bluepad
Bluepad
शेवटच मोकळं हसल्याच आठवत नाही..
प्रशांत तिडके  (रूहदार)
प्रशांत तिडके (रूहदार)
4th Aug, 2022

Share

काल सहज मोबाईल मध्ये जुना डाटा पाहत असतांना एक फोटो बघितला. फार हसरा फोटो होता तो. विषेश म्हणजे फोटो माझाच होता. साधारण तिन वर्ष जुना हा फोटो असावा. फोटो बघितल्यावर जानवलं की आपण बरेच दिवस झाले असे हसलोच नाही आहोत. कसलच दडपण न बाळगता एकदम चिंता मुक्त हसल्याच एवढ्यात तरी आठवत नाही.
एखादा लाकडाचा बारीक तूकडा नखात रुतून बसला म्हणून आपली दिनचर्या थांबत नाही. आपण आपली कामे ही करतच असतो. पण राहून राहून लक्ष त्या नखाकडेच जात. ती वेदना दिसत नसली किंवा ती शरीराच फार अस मोठ कसल नूकसान करणारी जरी नसली तरीही ती आपल समाधान हिरावून घ्यायला पुरेशी असते. तूकडा रूतल्या नंतर करत असलेल्या कामात तो बिनधास्त स्वभाव आणि मोकळेपणा नसतो.
आजच्या हासण्याऱ्या माझ्यात आणि त्या फोटोत हसणारऱ्या माझ्यात हाच फरक असावा.
आयुष्यात तेंव्हा चिंताच न्हवती अस नाही. पण ती अगदी लाकडाची बारीक फास बनून ठसठसत रहावी अशीही न्हवती. कदाचित त्या फोटोने मला काहीतरी रूतलय याची जानिव करून दिली असावी.
- प्रशांत तिडके (रूहदार )

175 

Share


प्रशांत तिडके  (रूहदार)
Written by
प्रशांत तिडके (रूहदार)

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad