Bluepad | Bluepad
Bluepad
परिस्थिती बदलता येत नसेल .. तर मनस्थिती बदलावी माणसाने ...
p
pratiksha Dhanawale
4th Aug, 2022

Share

आपल्या आजूबाजूला पाहतो की एक बोलायला गेला की लगेच दुसरा भांडायला तयार थोडा ही संयम नाही ..थोडा विचार केला तर ? प्रत्येक ठिकाणी आपल्याला परिस्थिती बदलता येईलच असं नाही त्यामुळे आपली मनस्थिती बदलावी ..म्हणजे नक्की काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल बरोबर ना ? तर अगदी सोप आहे . आपण ते सहज करू शकतो . जर अर्धा ग्लास भरलेला आहे म्हणून सुख समाधान शोधावं की अर्धा रिकामा आहे म्हणून दुःख करावं हे आपणच ठरवायचं ..की अर्धा भरलेला आहे ना मग यातच समाधान मानावं . मला एक गोष्ट आठवते की परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदलावी माणसाने ... "गुरूंना शिष्य म्हणाला ,गुरुदेव !एका व्यक्तीने आश्रमाला गाय भेट दिली आहे . गुरु म्हणाले ,बर झाल दूध प्यायला मिळेल . एका आठवड्यानंतर शिष्याने गुरुला सांगितलं. ज्याने गाय दिली होती तो ती व्यक्ती आपली गाय परत घेऊन गेला . गुरु म्हणाले बर झाल शेण उचलण्याचा त्रास वाचला . परिस्थिती बदलली की , आपली मनस्थिती बदला ,त्यामुळे दुःख सुखात बदलेल . सुख , दुःख हा शेवटी हा मनाचाच खेळ आहे .. अगदी तसेच खूप सारे उदाहरण येतात ..आपल्या आयुष्यात जसे आपली जवळची व्यक्ती भेटायला येत असेल तर , आणि जर येयला उशीर होत असला तर , आपण आपला वेळ सत्कारणी लावला पाहिजे ना की आपली ऊर्जा वाया घालून त्याला काय बोलावं याची यादी तयार करावी की त्याला समजून घेऊन . . दुसरं काही काम करण्यात तो येईपर्यंत काहीतरी स्वतःचा छंद जोपासा वा ..मग स्वतःला वेळ ही देता येईल आणि की भेटणारी व्यक्ती ही खुश होईल आपल्यावर किती संयम आणि समजूतदार आहात असं कौतुक एकायला मिळेल आणि भेट ही छान होईल .. आणि त्या भेटीतून आनंद ही ओसंडून वाहेल .. आपला आनंद आपण शोधला पाहिजे ..कधीच कुणाच्या दुःखावर किंवा सुखावर कधी अवलंबून राहता कामा नये .. आपण आपलंच बदलायला हवं आपण दुसऱ्याच्या दुःखात न विचारता जायला हवं आणि आनंदात ना आमत्रणा शिवाय जावं हेच तर जीवन जगण्याची कला आहे .. माणुसकी माणसात पहावी आणि ती माणसात असते ...आपण जसे पाहतो आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे तो तसाच दिसणार आहे त्यामुळे आपला आयुष्याला पाहण्याचा दृष्टिकोन मग कोणताही असो तो चांगला असावा ..असाच प्रयत्न करावा ..चला तर मग आपण ही शोधुयात आनंदी कसे राहता येईल .. जीवन तर दुःखासाठी पडलेलं आहे .. आपणच ठरवायचं की बदलाव स्वतःला आणि आपल्या परिस्थिती ला आणि त्याचबरोबर आपल्या मनस्थिती ला ही ...मग बरोबर आहे ना वाक्य आपल्या आयुष्याशी निगडीत आहे ना ?मग ठरुया ना आयुष्यातला प्रत्येक क्षण हा परिस्थिती नुसार मनस्थिती बदलणारा ......कसा वाटला लेख जरूर कळवा ...

183 

Share


p
Written by
pratiksha Dhanawale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad