Bluepad | Bluepad
Bluepad
खरच बंदी आहे ??
saru pawar
saru pawar
4th Aug, 2022

Share

खरच बंदी आहे ??
परवाच्या सकाळ मधली बातमी ,हि बातमी कि आपल्याला माहित असलेलच पण पेपरचा फक्त ऐक काँलम भरावा म्हणुन आलेल?? मला पडलेला प्रश्न. बरयाच गोष्टी बंदी असुन सर्रास उघडपणे विकल्या जातात काहि बाबतित त्या बंदिच फक्त नाटक आणि अधुन मधुन धाड सत्र वगैरे वगैरे. आमच्या भागात थोड्या थोड्या दिवसात अमुक तमुक लाखाचा गुटका पकडला अश्या बातम्या काहि पोलिस अधिकारी नी संबधित गाडी चालकाच्या फोटो सोबत झळकतात. माझ्या सारख्या वेड्यांचच अस काहि म्हणन असाव अस कुठे तरी वाटुन जात.करता काहीच येत नाही पण दिसत ते चुकिच आहे हे जगाला ओरडुन सांगायचा नुसताच खटाटोप. खरतर आजही थोड तेच करायच होत 😒 पण सकाळीच ऐका रिक्षाचालकाच्या टि-शर्टवर आमच्या कडच्या आमदाराच्या फोटो सकट ऐक टँग लाईन वा त्या आमदार भक्ताच्या भक्तिच ध्योतक अस काहितरी लिहिलेल होत त्यात व्यसन मुक्त ,-----,-- अस बरीच तरूण पिढी अस काहीस. खरच का ??आमदार असलेल्या माणसाला तरूण व्यसन मुक्त ठेवण किंवा त्या भागातल्या काहि गोष्टिंवर नियंत्रण आणुन त्या पासुन तरूणांनच रक्षण करण कठिण असत ?मला उत्तर न मिळालेला प्रश्न .अजुन मांडायच झालच तर पोलिस चौकिच्या आवारतल्या टपरिवर गुटक्याच्या लांबच्या लांब माळा लटकलेल्या असतात.हो सगळेच पोलिस पुस्तकात असलेल्या कायद्याच पालन करतात अस माझ म्हणन नाही.शिवाय ति हि माणसच ,सगळ कायद्याच रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यीच म्हणुन सामान्य माणसाला हात नाही झटकता येणार.आपण किती कायदयांच ,नियमांच पालन करतो हे अंतर्मुख होऊन पाहण गरजेचच.
खरच बंदी आहे ??
वाटतयन बघुन घाण ?
खरच बंदी आहे ??
हे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत असलेल्या तालुक्याच्या गावातल ,तरूणांची जास्त वर्दळ असलेल्या ठिकाणच चित्र.भयानक ,किळसवाण असच.खरतर मोठ व्यापारी संकुल ,सेकंड हँड मोबाईल पासुन अँपल च्या महागड्या मोबाईलचे शोरूम,मोबाईल दुरूस्ती व अँसेसरीजची ढिगभर दुकान .येणारी ग्राहक मंडळी सर्वच स्थरातली तरूण ,मग कुणालाच हे बदलावस वाटल नाही/वाटत नाही. मला इथे जायला अजिबात आवडत नाहीच खरच पण कधि कधि पर्याय नसतो.पण त्या रंगवलेल्या भिंती ,जिन्यांन वरून चालतानां थुकायला सोईच म्हणून मधल्या पँसेज मधे असा उकिरडा नि चिखल.नको नको होत.त्यात टाँयलेट,"मुतारी" अस नावाच काही तरी असणार ज्याच्या स्वच्छतेचा उल्लेख न केलेलाच बरा.कारण या सगळ्यात या वासाचा त्रास सहन करणारे किंवा त्याची सवय झालेली मंडळी सहनशिलतेचे पुतळेच जणु. असो मनात खदखदत होत,ऐका पत्रकारला यावर बातमी दयावी वाटली नि माझ्या जवळ त्याचा ताजाच अनुभव होता म्हणुन हा खटाटोप.बघा कुणा पर्यंत पोहचतय का?? हा प्रकार तुमच्या शहरात असेल तर थांबवा ,तरूणानां आवाहन आणि तुमच शहर खरोखरीच स्वच्छ !सुंदर असेल तर अभिनंदन !!

177 

Share


saru pawar
Written by
saru pawar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad