Bluepad | Bluepad
Bluepad
YouTube वरील बेभान youtubers
अंजना भिवा भांगे
4th Aug, 2022

Share

आजच्या काळात youtube न वापरणारा व्यक्ती विरळाच. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि त्यात बाय डिफॉल्ट 'युट्युब' हे ॲप असतं. युट्युब तर एक सर्वांना मिळालेलं वरदानच म्हणावं लागेल.
YouTube वरील बेभान youtubers
youtube सारख्या माध्यमातून कोणीही आपली कला मग ते काहीही असो गायन, सुप्त विचार व्यक्त करणं, वैयक्तिक जीवनात घडणाऱ्या घडामोडी दाखवणं, वेगवेगळ्या पाककला, विणकाम, रांगोळ्या, मेहंद्या दाखवणं, कोणत्याही अभ्यासक्रमातील शिकवण्या देणं, मोटिवेशनल व्हिडिओज, वेगवेगळी ठिकाणे फिरवून त्याचा व्हिडिओ तयार करून youtube वर टाकणं, डान्स व्हिडिओज, गाणी, चित्रपट दाखवणे. सगळं काही आपण पाहू शकतो. हे तर सर्वांना माहित आहे, एखादा व्हिडिओ जर वायरल झालाच तर तो जगभरातला कोणीही पाहू शकतो.
यामुळे आपल्या देशातल्या गोष्टी इतर देशातल्या लोकांना पाहता येतात, समजून घेता येतात. आणि आपल्याला देखील इतर देशांतील माहिती मिळवता येते. मुख्य म्हणजे youtube कोणीही उघडू शकतं आणि पैसे देखील कमवू शकतं. लोकांना आपल्या व्हिडिओज मधून प्रेरित करणाऱ्या, निरनिराळ्या कला शिकवणाऱ्या, कॉमेडी व्हिडिओज मधून हसवणाऱ्या आणि चांगले व्हिडिओज बनवून पॉझिटिव्हिटी पसरवणाऱ्या youtubers च नक्कीच कौतुक करायला हवं. कारण अशा लोकांच्या व्हिडिओज मुळे आपण एखाद्या समस्येत असू तर त्याचं निवारण यांच्या व्हिडिओज मधून करता येतं. बँकेचा फॉर्म कसा भरायचा, एखाद्या वर्षाचा सिलॅबस, शिकवण्या न जाणे अशा बऱ्याच व्हिडिओज मधून जगभरातल्या अनेक विद्यार्थ्यांना आणि लोकांना मदत मिळत असते. आणि अशा बऱ्याच कला जे आपले भारतीय youtubers आपल्या videos मध्ये दाखवतात त्या इतर देशातल्या लोकांनी पाहिल्यावर त्यांना कुतूहल आणि कौतुक वाटतं आपल्या माणसांविषयी आपल्या देशाविषयी!
पण असेही काही लोक आहेत त्यांच्या videos मधून नको त्या गोष्टी दाखवल्या जातात. YouTube सारख्या विस्तारित माध्यमावर शिवीगाळ, भांडणं, मारामारी यांसारख्या विकृती, अहिंसा पाहायला मिळतात. हनिमून नाईट, माझ्या नवऱ्याने मला मारलं, आमच्याकडे लाईट गेली असल्या आणि यांसारख्या वायफळ गोष्टी दाखवल्या जातात. अश्लीलतेकडे झुकणारे व्हिडिओ, विकृत prank create करून दाखवले जातात. लोक तुम्हाला follow करतात, तुमचे videos पाहतात आणि फक्त आपल्याच देशात नाही तर इतर देशातही तुमचे video पाहिले जातात. तुमचे शब्द इतर भाषिक google वर search करून अर्थ पाहतात. जागतिक पातळीवर आपल्या देशाचं नाव खराब होईल असले नकारात्मकता पसरवणारे videos बनवू नका. चांगली वर्तवणूक करून स्वतःलाच नाही तर देशाला ही प्रशंसा मिळवून द्या.
" अहिंसा आणि नकारात्मकता दाखवून
होणार नाही पापक्षालन, कारण
कला आणि सकारात्मकता दर्शवण्याचं
YouTube आहे दालन".

164 

Share


Written by
अंजना भिवा भांगे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad