पाण्याचा अवखळपणा माणसाच्या नात्याप्रमाणेच भासतो. कधी चढ ,उतार , कधी खाच खळगे, कधी पुढे जाण्यासाठी स्वताचा रस्ता स्वता तयार करावा लागतो. वाहणाऱ्या पाण्याला सर्व काही पोटात घ्याव लागत. कुठे घाण आहे कुठे स्वच्छ आहे हे काही पाहता येत नाही किंवा भेदभाव करता येत नाही.
सर्वाना सोबत घेऊन चालाव लागत तसच माणसाच्या मनाच आणि नात्याच पण सारखच आहे. काही नाती अशी घट्ट बांधून ठेवलेली असतात, कितीही राग आला कितीही भांडण झाल तरी त्याला सोडून जावसं वाटत नाही ते म्हणजे पहिले आई वडील आणि दुसर म्हणजे नवरा बायको.
आई वडिलांपासून दूर जाऊ नाही वाटत, पण काय करणार मुलगी म्हणल्यावर एक ना एक दिवस मुलीला सासरी जावच लागत. कारण जस तिला जाव लागत तस तिच्या आई बाबा च्या घरीही कोणी तरी नवीन येणारच असत.