Bluepad | Bluepad
Bluepad
चीन-तैवान संघर्ष आणि अमेरिका
Mangesh Acharya
Mangesh Acharya
4th Aug, 2022

Share

चीन-तैवान संघर्ष आणि अमेरिका
डॉ. मंगेश गोविंदराव आचार्य
८५५०९७१३१०
चीन तैवान संघर्षाच्या परिस्थितीत अमेरिकन काँग्रेसच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी या तैवानच्या भेटीला गेल्या आहेत. तैवान प्रकरणावरून अमेरिका-चीन यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. २५ वर्षाच्या दीर्घ काळानंतर अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी या तैवानला भेट देत आहेत. स्वाभाविकच चीनने या भेटीला विरोध दर्शवला असून अमेरिकेचे तैवान संदर्भातील धोरण पसंत नसल्याचे स्पष्ट केले. चीनचे उप परराष्ट्र मंत्री शी फेंग यांनी तर अमेरिकेला या बाबत खडे बोल सुनावत गंभीर परिणामाला सामोरे जाण्यास तयार राहा अशाप्रकारचे वक्त्यव्य करत आपली तैवाननीती जाहीर केलेली आहे. चीन या सर्वाचे सडेतोड उत्तर देईल असेही त्यानी म्हटले आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी नॅन्सी पेलोसी यांचा दौरा चीनच्या एक-चायना धोरणाशी सुसंगत असून यात काही गैर नसल्याचे म्हटले आहे.
तैवानला काबीज करण्याची चीनची महत्वाकांक्षा जगापासून लपून राहिलेली नाही. एक दिवस चीनचे स्वप्न पूर्ण होईल असे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना वाटते. तैवानला मिळविण्यासाठी चीन कोणत्याही थराला जावू शकतो असे चीनने वारंवार दाखवून दिलेले आहे. मात्र तैवानवर चीनच्या दबावतंत्राचा प्रभाव होताना दिसून येत नाही. तैवान एक सार्वभौम देश असून तिथे संविधानानुसार चालणारे शासन आहे.
तैवान हे एक बेट आहे जे चीनच्या आग्नेय किनार्‍यापासून सुमारे 100 मैल अंतरावर आहे. "फर्स्ट आयलँड चेन" नावाच्या बेटांमध्ये त्याची गणना केली जाते, ज्यामध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या अमेरिकेच्या जवळच्या भागांचा समावेश होतो. तैवानला स्वतःचा प्रांत समजून चीन तैवानच्या लालसेपोटी आपल्या कुरघोड्या सुरु ठेवतो सध्या याच कारणावरून अमेरिक-चीनमध्ये बिनसलेले आहे.
ही सर्व बेटे अमेरिकेला सुद्धा हितकारक आहे . पश्चिम पॅसिफिक महासागरात चीनचे वर्चस्व अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला धोका पोहचवणारे असल्यामुळे अमेरिका सक्रीय झालेला आहे. तैवाननंतर ग्वाम आणि हवाई बेटांवरील अमेरिकेच्या लष्करी तळालाही धोका निर्माण होऊ शकतो याचे जाणीव अमेरिकेला व्हायला लागली आहे.
दुस-या महायुद्धानंतर तैवान चीन विभक्त झाले होते. तत्कालीन चीनची कम्युनिस्ट पार्टी तेथील सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाशी (कुओमिंतांग) लढत होती. माओ झेडोंगच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना 1949 मध्ये जिंकली आणि त्यांनी बीजिंगवर ताबा मिळवला. त्यानंतर, कुओमिंतांग लोक मुख्य भूभाग सोडून तैवानच्या नैऋत्य बेटावर वर स्थायिक झाले . तेव्हापासून, कुओमिंतांग हा तैवानचा सर्वात महत्त्वाचा पक्ष राहिला आहे. तैवानवर अनेकदा कुओमिंतांग पक्षाने राज्य केले आहे.
तैवानला स्वतंत्र आणि सार्वभौम देश म्हणून केवळ 13 देशांनी मान्यता दिलेली आहे. तैवानला अधिक समर्थन मिळू नये यासाठी अनेक देशांवर चीन राजनैतिक दबाव आणतो. तैवानला इतर देशांची मान्यता मिळत तर नाही, बाबत चीनचे बारकाईने लक्ष असते. तैवानचे संरक्षण मंत्री मतानुसार चैन-तैवान संबंधातील हा सर्वात वाईट काळ आहे.
चीनला तैवान हस्तगत करायचा असले तर केवळ लष्करी आक्रमण हा एकच मार्ग त्याच्याकडे आहे असेही नाही. दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध मजबूत करून सुधा चीनची अपेक्षा पूर्ण होऊ शकते. तसे न करता दोन्ही देशांत युद्धाचा प्रसंग उभा राहिला तरमात्र तैवानची लष्करी ताकद चीनसमोर कमी पडू शकते. अमेरिका वगळता लष्करावर जगात सर्वाधिक खर्च चीन करतो. वैविध्यपूर्ण आणि विशाललष्कर चीनकडे आहे. क्षेपणास्त्र, तंत्रज्ञान, नौदल, हवाई दल या सर्वच क्षेत्रात चीन भक्कम असल्याचे दिसून येते. सायबर हल्ले वर्तमानातील चीनचे मोठे अस्त्र आहे.
चीन जवळ 20.35 लाख सक्रिय सैनिक आहे. तैवानमध्ये केवळ 1.63 लाख सक्रिय सैनिक आहेत. चीनची शक्ती तैवान पेक्षा 12 पट जास्त होती. चीनमध्ये 9.65 लाख सैन्य सैनिक आहेत, तर तैवानमध्ये केवळ 88 हजार, जी चीनपेक्षा 11 पट कमी आहेत. त्याचबरोबर चीनच्या नौदलात 2.60 लाख आणि तैवानमध्ये फक्त 40 हजार जवान आहेत. चीनच्या हवाई दलात सुमारे 400,000 लोक आहेत, परंतु तैवानमध्ये फक्त 35,000 कर्मचारी आहेत. या सगळ्याशिवाय चीनकडे आणखी ४.१५ लाख सैनिक आहेत. आणि तैवानच्या बाबतीत असे नाही. अशाप्रकारची माहिती इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज (आयआयएसएस) च्या अहवालातून पुढे आलेली आहे.
अमेरिका तैवानला शस्त्राची मदत करू शकते . याही ठिकाणी अमेरिकेची नीती स्पष्ट नसल्याचे दिसून येते. हल्ला झाल्यास तैवानला काय आणि कशी मदत करणार याबाबत अमेरिका आपले धोरण जाणूनबुजून स्पष्ट करत नाही. राजनैतिकदृष्ट्या अमेरिका सध्या ‘एक चीन धोरणाला’ पाठिंबा देत आहे. त्याचे औपचारिक संबंध तैवान पेक्षा चीनशी जास्त आहेत.
चीन लढाऊ विमाने पाठवून तैवान वर दबाव आणतो आहे. तैवानने २०२० मध्ये विमानांच्या घुसखोरीचा डेटा सार्वजनिक केला. त्यानुसार गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अशी घुसखोरी वाढली होती. ऑक्टोबर 2021 मध्ये, एकाच दिवसात 56 चिनी विमानांनी तैवानच्या हद्दीत प्रवेश केल्याची नोंद आहे.
तैवान-चीन संघर्ष जगासाठी चिंता वाढवीत आहे कारण तैवानची अर्थव्यवस्था जगासाठी खूप महत्त्वाची आहे. जगातील इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स ,फोन, लॅपटॉप, घड्याळे आणि गेमिंग उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्‍या बहुतेक चिप्स तैवानमध्ये बनवल्या जातात. तैवान संपूर्ण जगाला अशाप्रकारच्या चिप्सचा पुरवठा करतो. 2021 मध्ये जगातील चिप उद्योगाची किंमत सुमारे $100 अब्ज होती आणि त्यात तैवानचे वर्चस्व आहे.
चीन आणि तैवानमधील तणावाचे पडसाद अजून पर्यंत तैवानच्या जनजीवनावर पडत नसल्याचे अनेक संशोधनावरून दिसून येते. हे युद्धझालेतर ते फार काळ चालेल असे तैवानच्या जनतेला वाटत नाही. चीनच्या वर्चस्वापासून दूर असलेल्या तैवानी जनतेला आपला चीनशी काही संबंध आहे असेही वाटत नाही. तैवानी जनतेने स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले असून या संघर्षामुळे ते अधिक कणखर बनतील असे वाटते.
चीन-तैवान संघर्ष आणि अमेरिका

245 

Share


Mangesh Acharya
Written by
Mangesh Acharya

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad