Bluepadसमाधान
Bluepad

समाधान

भरत टोणपे
भरत टोणपे
15th Jun, 2020

Share

लघुकथा
*समाधान*
लाॅकडावून च्या परिस्थितीत ती दोन माणसं मला समाधानान हसताना दिसली,त्याला गेल्या दोन महिन्यांपासून रोजगार नव्हता , घरातल सगळं च रेशन संपत आल होत, तो पिशवी घेवून तडक निघाला आज मोफत पाच किलो तांदूळ मिळणार होते, ऊन वाढत होत ,तब्बल तीन तास ऊन्हात ऊभे राह्यल्यावर त्याचा नंबर आला आंणि पाच किलो तांदूळा नी भरलेला तराजूतील घमेल त्याच्या पिशवी त रिकामं झाल तसा त्याचा चेहरा समाधानाने उजळून निघाला, झपझप पावल टाकत तो घरि परतला ,घरातले त्या भरलेल्या पिशवी कडे पाहून आनंदित झाले होते,
आलीशान फ्लॅट च्या सोसायटी त त्याच वर्क फ्राॅम होम चालू होत पगार हि वेळ च्या वेळी बॅकेत येत होता, कामाचं टेन्शन होत ,आता मात्र रात्री दोन पेग लावले कि टेन्शन गायब, कालच त्याचा दारू चा स्टाॅक संपला होता, मात्र त्याला दारू आणण्यासाठी बाहेर जायची गरज नव्हती, त्यानं ऑनलाईन वाईन्स बुकिंग केल होत, आणि तितक्याच दारू घेवून आलेल्या डिलीव्हरी बाॅय चा फोन वाजला, तो सोसायटी च्या गेट पाशी गेला आंणि ऑनलाईन पॅकिंग मधे आलेल्या वाईन्स च खोक हातात पडताच त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
©️ भरत टोणपे

0 

Share


भरत टोणपे
Written by
भरत टोणपे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad