सुप्रीम कोर्टाने"ईडी" ला हिरवी झेंडी दिली नी ईडी ची गाडी सुसाट निघाली. सर्व विरोधी पक्षांनी ईडी ला मर्यादित करण्यासाठी याचिका दाखल केली आणि स्वतः च्या पायांवर धोंडा नाही तर अगणित धोंडे पाडून घेतले असे म्हणता येईल. आता ईडी स्वतः च्या हद्दीत अमर्याद आहे. त्याला खुले आसमान मिळाले आहे आणि भाजपा ची साथ पण आहे. "न खाऊंगा न खाने दुंगा!" मोदी दिलाचा सच्चा नी वचनाचा पक्का! सत्याचा विजय होतो हे ब्रम्हवाक्य साधून कर्तव्य निभवणारा पंतप्रधान. खरे म्हणजे ईडी ईडी ईडी नावाची बिडी विरोधक का सुलगावताहेत! कारण त्यांना रस्ताच सापडत नाहीए शह द्यायला. भाजपा ने शोधून काढलेले ब्रह्मास्त्र. ज्याचा तोड विरोधकांपाशी नाही आणि न्यायालनाने सांगितले आहे की ईडी सबसे बडी! तुम अपने पे अडी तो जेल मे सडी! गोल साधारण टकलाच्या डोक्यावरून ते वाढलेल्या पांढऱ्या दाढी मिशांच्या आणि बोलताना दात न दिसणाऱ्या ! दात न दिसणाऱ्या वरून आठवले, बोलताना ज्यांच्या दाताचे दर्शन होत नाही असे लोक अतिशय आतल्या गाठीचे असतात. ओठात काय, पोटात काय आणि मेंदू तिसऱ्या कामात कार्यरत. अशी ही मंडळी असते. ही मंडळी बिलकुल भरवशाची नसते, असे म्हणतात, त्यातला हा पांढरी दाढी मिशा धारी, बोलताना दात न दिसणारे छगन भुजबळ म्हणतात की ईडी मध्ये "जमानत" चे प्रयोजन नाही. गुन्हेगार म्हणून ज्याला अटक केली आहे त्याचे म्हणणे कोर्ट ऐकून घेत नाही. म्हणजे भाजपा ने जे काही ससेमिरा विरोधकांच्या मागे लावला तो अगदी चपखल बसला.
बरे! विरोधकांचा एक सूर भाजपामध्ये गेलेले सर्व स्वच्छ होतात. त्यांच्यावर ईडी कारवाई का करीत नाही? तर उत्तर सरळ आहे. तुम्हीच बघा. मोठ मोठे घोटाळे झाले ते २००४-२०१४ कॉंग्रेस चे सरकार होते. निरव मोदी, माल्या, मेहुल चौकसी सारखे छोटे घोटाळे तर पी. चिदंबरम नी केलेले मोठमोठे घोटाळे ज्याची धग नोटबंदी च्या कारणा पर्यंत येवून ठेपते. आता उघड होणारे राऊतांचा घोटाळा अशी सगळी घोटाळ्यांची आदर्श मालिका. पण ह्या काळात नउ दहा वर्षाच्या कालावधीत ११२ धाडी टाकण्यात आले नी ५३४६.१६ करोड रुपये जप्त करण्यात आले. आणि एका ही अपराध्याला शिक्षा झाली नाही. ह्याचा अर्थ काय? भरपूर बॅकलॉग शिल्लक आहेत. आता केंद्र सरकार बॅकलॉग भरून काढणार की आपल्या कार्यकर्त्यांवर धाडी टाकणार. त्यातील काही तर भाजपात आले नी सरकार पडले. असे काही आमदारांनी म्हटले आहे की भाजपात आल्यावर ईडी ची दहशत नाही. आणि आपल्या भाजपा कार्यकर्त्यांवर ईडी करायला खुळे नाही हे विरोधक सुद्धा समजतात. दोन फायदे ! एक तर भाजपा त आलेला मुसाफिर परत भाजपा सोडत नाही आणि विरोधकांना सांगतो कि तुम्ही पण या. आपण सगळे स्वच्छ होवू. अगदी स्वच्छ राजकारणी मिळणे अशक्य आहे. असे केले तर संसदेत १० -१५ संसद उरतील बाकी ईडी चरणी रममाण होतील. पण ही आपल्या देशाची शोकांतिका म्हणावी लागेल. भाजपाला अशी मंडळी जमा करावी लागते कारण सत्तेत राहिल्याशिवाय मोठमोठे धुरंधर भ्रष्टाचारी जगासमोर उघड करता येणार नाही. त्यामुळे ह्या विषयावर भाजपाला दोष देण्यात तथ्य नाही. बाहेरचे जग स्वच्छ झाल्यावर मग कदाचित घर स्वच्छ करायला भाजपा निघेल.
मात्र २०१४-२०२२ ईडी ३०१० धाडी टाकल्या आहेत आणि आतापर्यंत ९९,३५६ करोड रुपये सरकारी खात्यात जमा केले आहेत. गुन्हेगार वर्गाला कायद्यान्वये दंड शिक्षा देखील निश्चित होईल अशी आशा करूया. स्विस बँकेपेक्षा तर भारतातच् पैसा निघतोय.
आजपर्यंत जो राजकारणी वर्ग स्वतः शहेनशहा समजत होता. आपल्याला कोण हात लावणार? वगैरे वगैरे मनाचे, अकलेचे तारे तोडत होता त्यांना ईडी चा गळफास बसला आहे.
ज्यावेळी कारवाई करण्याची वेळ राहुल गांधी आणि सोनिया गांधीवर आली त्यावेळी सर्वांच्या भ्रमाचा भोपळा फुटला. माझा कटाक्ष दोन दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे ह्यांनी एक वक्तव्य केले. सुप्रिया ताई सध्या महाराष्ट्राला संस्कृती चे धडे देत आहेत. नंतर त्या हिंदुत्ववादी आहेत हे दाखविण्यासाठी त्यांनी कपाळाला मोठे कुंकु फासून महाराष्ट्राला टिकली ऐवजी भल्या मोठ्या कुंकवाने भरल्या कपाळाने महाराष्ट्राला संस्कृती, सभ्यता ह्याचे पाठ गिरविणे सुरू केले होते. मग त्या वारकरी बरोबर व्यंजन बनविण्याचा इव्हेंट केला, लहान कर्मचाऱ्यांसोबत फोटो काढले आणि आपली प्रतिमा सुधरविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवला. बरे! परिस्थिती बदलली की राकॉं, कॉंग्रेस ह्यांचे शब्द पण बदलतात. आतापर्यंत सभ्यता, संस्कृती, महाराष्ट्राची अस्मिता, लोकांनी कसे वागावे ह्यावर सुपर ज्ञान पेलणाऱ्या, सुप्रिया ताई आणि जसे राऊताची उचलबांगडी झाली तर जसे अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत हे ईडी चे अपराधी म्हणून आत गेलेले. काही मर्दुमकी केली देशासाठी नाव केले म्हणून आत ईडी ने बंदिस्त केले अशातला भाग नाही तर अनिल कोटींनी शे-कोटी पेटवली, नवाब मलिकांवर देशद्रोह सम गुन्हा दाखल आहे तर फत्रुट तोंडाचा राऊत पत्राचाळ रहिवाशांचा शापित. व्वॉ! काय काय मर्दुमकी!
तर अशा थोर ईडीच्या अटकेतील अपराध्यांच्या मुलींखातर त्यांनी एक वाक्य उद्गारले! कुठले तर, ह्या तिघींच्या मुली ज्या धैर्याने समस्यांना तोंड देत लढताहेत त्याला तोड नाही"! असा अर्थ होता त्या वाक्याचा.
वाचक मित्रांनो! काही मागमूस लागतोय ह्या वाक्याचा. काय रोख कळतोय त्यांच्या म्हणण्याचा?
ज्या पद्धतीनी ईडी निर्भीड, निर्भय बनून कारवाई करीत आहे की दणका तर ममता बॅनर्जी ला पण बसला. ५१ कोटीची रोख घरात निघाल्यावर तर सगळेच म्हणतात की पैसा माझा नाही. उप पंतप्रधानांच्या निवडणूकीतून तिने अंग काढून घेतलेले. ईडी च्या कारवाईने धास्तावलेली. त्याच धास्तीने ती परत पवारांच्या मिटींगला हजर राहण्यासाठी तिने होकार दर्शविला.
ईडी ने म्हणजे पर्यायाने भाजपाने दाखवून दिले की कायद्यासमोर सर्व समान. मग सोनियाला ईडी ने कार्यालयात हजर केले आणि सर्व अपराध्यांचे धाबे दणाणले.
आजपर्यंत महाराष्ट्राचे कर्ता धर्ता समजणारे एक काका देखील ह्याच कॅटेगरी मधले. आपल्याला कोण हात लावू शकत नाही. पण सोनिया गांधी समोर काका कुछ भी नही. आणि एक सहकार क्षेत्रातील केसमध्ये त्यांचे नाव सतत येत आहे तो म्हणजे ११०० कोटी चा नोटबंदीचे वेळचा घोटाळा. मित्रांनो! आता समजले चार तासाच्या सवलतीवर ऑफिस बंद झाल्यावर केलेल्या नोटबंदीचे फायदे काय? मुल्ला मुलायम तर रडला म्हणाला कम से कम दस दिन देते, नोटबंदीसे पहले!
पण मोदी मनाचा सच्चा माणूस भारताच्या अस्मितेसाठी कुठलीही तडजोड नाही.
आणि ह्या अशा ईडी ने खरे अपराधी गजाआड पाठविले. जिथे सोनिया गांधी ची वेळ येवू शकते तिच्या समोर तर इतर कुठलीही व्यक्ती क्षुल्लक. परत सहकार क्षेत्रातील एका केस ची टांगती तलवार, पवार कुटुंबियांच्या नातेवाइकांवर घरावर धाडी. हे सर्व दाखवताहेत की ईडी केव्हाही कोणालाही उचलायला सक्षम आहे. आणि त्याच् परिप्रेक्षात कदाचित सुप्रिया ताई म्हणाल्या असाव्यात की तिघांच्याही मुली ज्या धैर्याने समस्यांना तोंड देताहेत त्याला तोड नाही. म्हणजे वेळ आली तर मी चौथी मुलगी पण परिस्थितीला धैर्याने सामोरी जाईन आणि समस्यांना तोंड देईन!
©️भाई देवघरे
sadetod08@gmail.com
Twitter @sadetod
Login to http://sadetod.com