Bluepad | Bluepad
Bluepad
आठवणी
Mysterious vision
Mysterious vision
4th Aug, 2022

Share

डोळ्यात साठवलेले क्षण विसरता येतात का
हृदयात जपलेली भावना अचानक नाहीशी होते का
कधी पाहिलेलं जरा कधी ऐकलेले जरा
असं विसरत पन
मनापासून जपलेली गोष्ट अशी कशी दुरावते
आठवत काहीतरी उगा काहीतरी जाणवत
गर्दीत ही कधी कधी आभास होतो तर
एकांतात मन भारदस्त होऊन जातं...
नजरेत आड असली तरीही ती जपली जाते
लुप्त झाली असं भासवलं जरी तरीही
तीच अस्तित्व कायम ठाम असत..
वाईटाहून अगदी वाईट असो .. . किंवा
खूप चांगली असो... लक्षात मात्र नक्की असते
कधी अश्रू वाटे रीत होते तर कधी मनसोक्त जगलं जात
काही त्रासदायक तर काही सुखमय अशा
कर्मा च तें सार्थ असत भलेही वाईट असो कि चांगल
मनापासून अनुभवलेली जगलेली भावना असते
कशीही असो प्रिय असते...
काहीतरी गमावलं असणार काहीतरी कमावलं असणार
नक्कीच अमूल्य असा ठेवा जपलेला अन जगलेला
असणार.... म्हणूनच आठवणी मौल्यवान असतात ❣️✨️

186 

Share


Mysterious vision
Written by
Mysterious vision

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad