Bluepad | Bluepad
Bluepad
शेतकरी बाप
Akash Lagad
Akash Lagad
4th Aug, 2022

Share

.... शेतकरी बाप....
जवा उभ पीक करपायला लागत, तवा माज्या बा ची पाण्यातून बाहेर काढलेल्या माश्या सारखी घालमेल चालु होती, ll
पण बा पाण्यावाणी घाम गाळून कसबस पीक वाचवतो, अन वाचवलेलं पीक बाजारात विक्री ला नेतो. ll
बा तिथं बाजूला उभा असतो, अन त्याच्या घामाची किंमत एखादा दलाल ठरवतो .ll
रातीचा दिवस करून सुद्धा, बा तिथं कात्रीत उभा केलेला कैदी असतो.ll
त्याला परवडेल का ह्यापेक्षा, आपल्या खिशात काय पडेल का?? ह्याचा बाजारात विचार होतो, अन कष्टl ने केलेल्या अट्टाहासाचा सौदा सगळा तोट्यात जातो, तवा शेतकरी बाप माझा हातभार पोटाला खड्डा पडून घरी येतो.ll
बा घरी आल्याचं बघताच, लहान पिल्लू पळत आडवं जातll
तवा बा त्याला खांद्यावर घेऊन घरात येतो, अन वीस रुपयाची आणलेली भेळ त्यांच्या पुढ ठेवतो.ll
आलेलं चार पैसे बा एका डब्यात टाकतो, अन माय अन बा सांजच्या वेळी उपास धरतो,अन दाताचं पाणी गिळत तसाच झोपी जातो.ll
... ✍️आकाश संजय लगड.
शेतकरी बाप

178 

Share


Akash Lagad
Written by
Akash Lagad

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad