पाऊस म्हटलं की, "रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन'' या गाण्याची धून मनात वाजू लागते. पावसाचं आकर्षण हे बालपणापासूनच अंगी भिनलेलं . चेहऱ्यावर हास्य फुलवणारा ,बरसणाऱ्या सरींनी स्वतःला भिजवताना अंगं चिंब चिंब होऊन, मनी गाणे गुणगुणत जावे.थोडी हलकी हलकी वाऱ्याची झुळूक आणि त्याचबरोबर बरसणाऱ्या सरी, अंगाला हवाहवासा वाटणारा तो गारवा, वृक्षवेलींना असलेली पावसाची आतुरता,सर्वत्र दृश्य चिंब चिंब दिसताना स्वतःही त्यात भिजुनी जावे .असे जेव्हा वाटते.तो म्हणजे पावसाळा.