रामायणात युध्द जन्या परीस्थिती निर्माण झाली तेंव्हा,
रामाला मदत करनारी वानरसेना व त्यांच्यातील
काही प्रमुखांनी युद्ध करण्यासाठी समुद्रापलीकडे पलीकडे जाऊन युध्द
करण्यासाठी एक समुद्रावर सेतु बनवायचे ठरविले व जाबुवंत, रामभक्त हानुमान व कही प्रमुखाच्या उपस्थीतीत
ते हा प्रस्ताव घेऊन गेले.
राम व लक्ष्मणाने साऱ्याच गोष्टीचा वीचार करुण होकार दीला व कामाला लवकरात लवकर सुरवात करुन काम सुरळीतपणे कसे पार फाडता येईल ते निर्देश दीले.
यावर युध्दसाठी अधीर असलेली सेना,
व राम भक्त हनुमान, व जाबुवंत व काही प्रमुखांच्या उपस्थितीतीत समुद्राची पहाणी केली व जीथुन योग्य जागा वाटली ती जागा नीछीत करुन व आखणी करुन कामाला लगेच सुरुवातही झाली. प्रतेकाने एक गोटा घ्यायचा पाण्यात टाकण्यात आगोदर त्या वर" राम" लीहायचे
व नंतरच पण्यात टकायचे
असे काम करनाऱ्या प्रतेकाने करायचे
असे रामभक्त हनुमानाने निर्देशच सर्वच वनर सेनेला दीले होते.
रामाच्या भक्तीरसात बुडालेली वानर सेना व काही प्रमुख
एकाग्रतेने आपले काम नीमुट पणे करत होते हळुहळु सेतु आकर घेत होता...
राम लक्ष्मणाला हे पाहुण खुप समाधान वाटत होते. वानर
सेने बरोबर जांबुवंत श्रीराम भक्त हनुमान व काही प्रमुख सेनापती मण लावुन दीशानीरदेस बरोबरच कामहि करत होते.
दीवस भर काम व रात्रीला थोडा आराम या बसेसवर राम सेतुचे काम चालु होते. इथुन ते तीथपर्यंत सर्वा चे योगदान चांगले असल्याने मुळे अल्पवधीतच काम पुरणतवाकडे जाण्याच्या मार्गी लागले.
प्रतेक दीवस उजाडला की, कामाला नविन ऊर्जा घेऊन सुरवात व्हायची ,
आता काम आटोक्यात आले होते. सेतुचे काम पुढील काही दीवसातच कम पुर्ण होणार होते...
राम लक्ष्मणानही आता कामाची पहाणी दरोजच करीत होते.
काम करणाऱ्या पेक्षा काम पाहणाऱ्याला कींवा कामाची देखरेख करणाऱ्यानाला कामा व्यतिरिक्त बरेच काही दीसत असते.... कोण मण लावुन काम करत आहे. कोण जास्त,
करत आहे,.
कोण कमी. काम कसे होत आहे.... वैगेरे आणी ते तर रामयुगहोते, सतीयुग होते, सत्या शीवाय काहीही चालणार नव्हते. रामाची ख्याती त्याने आपल्या जन्मा पासुन केलेले ऊतुंग कर्य हे सर्वांना महीत होते....
म्हणुन रामाचे कोणतेही कर्य म्हणजे आपल्याला लाभलेले पुण्य म्हणून वानरशेने व्यतिरिक्त इतरही छोटे मोठे क र जीव जंतु जंतु काम करत होते.
हे कामाच्या व्यापात व रामाच्या असीम भक्ती रसात बुडालेल्या वानर सेनेला दीसत नव्हते. पण कामाचे नीरक्षण
करणाऱ्या रामलक्षमणाला ते दिसत होते
मोठ्या तन्मयतेने, आतुरतेने,
काम करणारी एक छोटीसी "खारुताई छोटे छोटे दगड वानर सेनेने टाकलेल्या दोन दगडाच्या सामटीत छोटे छोटे दगड भरत होती त्यामुळे खालुन पाया व वरपर्यंत काम मजबुत होत होते..... पण ती खार असे करीत असतांना बार बार वानर सेनेच्या वानरांच्या पायत येत होती. यामुळे कही वानर त्रस्त होत होते. एका वानराने तर तीला उचलुन पार रामलक्षमण उभे होते त्या दीशेने पार भिरकावून फेकले....
ती खार प्रभु रामचंद्र च्या पायाजवळ येऊन पडली तील तेवढ्या दुरुन फेकल्या मुळे थोडी चक्कर आल्या सारखे झाले होते..
हे पाहुन प्रभु रामचंद्रांनी तीला आपल्या हातात अलगद उचलले व तीला आपल्या तोडांने फुंकर मारु लागले...
खारुताई आता शुद्धीवर आलि होती.. तरीपण राम आताही तीला कुरवाळत होता व तोडांने फुंकर मारत होता.
हा प्रकार काम थाबंवुन सर्व वानर सेना व कही प्रमुख पहात होते.
रमाने त्या सर्वांना आपल्या जवळ बोलावले व ते जवळ आल्यावर त्यांना उद्देशून "राम" म्हणाले, "कोणतेही काम छोटे कींवा मोठे नसते, ते काम करणाऱ्याची भुमीका लक्षात
घ्यावी लागते. तुम्ही केलेले मोठे काम टीकवण्याचे काम ती खारुताई करत होती.
तुमच्या कामात राहीलेले खाच खळगे भरण्यासाठी तीने अहोरात्र मेहनत घेऊन पडद्याआड राहुन केलेले हे कार्य कदापी लाहान नही. तुम्ही केलेला सेतु तीने कसा बजबुत बनेल ह्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करत नकळत एक महान काम केलेले आहे. त्याकरता मी तीला असा आशीर्वाद दतो की पुढे हा सेतु" रामसेतु" ह्या नावाने प्रसिद्ध होईल व सुष्टी,
अस्तित्वात राहील तो पर्यंत सेतुचे जेव्हा - जेव्हा नाव नीघेल व बांधणाऱ्याचे जेंव्हा कधी गुणगान होईल त्या त्या वेळेस या खार ताईच्या महान कामाचे गुणगान जरुर होईल....
आसा मी तीला आशीर्वाद देतो म्हणत. "रामाने" तीच्या पाठीवरून हात फिरवला व काय चमत्कार तीच्या पाठीवर बक्षीस स्वरुपात रामाच्या बोटाचे ठसे उमटले आणि त्या बोटांच्या लांब रेषा खारुताईच्या पाठीवर उमटल्या त्या "रेषा"
आजही आपन खारुताईच्या पाठीवर आपन पहातो ते दुसरे तीसरे कही नसुन आशीर्वाद स्वरुपात तीला मळलेले वरदान आहे.
हे सर्व पाहुन आश्चर्य चकीत झालेली वानर सेना रामाकडे
आपुलकीने पाहु लागली रामाने अलगद तीला जमीनीवर सोडले.....
परत ती आपल्या कमात मग्न झाली... पुढे रामसेतु तयर झाला. व आजही कधीकाळी रामायणाचा व सेतुचा जेव्हा कधी उल्लेख होतो तेव्हा या छोट्या खारुताईचा विंषय नीघतोच............ जय श्रीराम
याही पुढे जाऊन आत्मज्ञानी असलेले रुषी, वाल्मिकी यांनी
याचा उल्लेख रामायण घडवण्याच्या आधी करणे. व त्याची नोंद रामायणात होणे म्हणजे यला कीती पुण्याई लागते
हेच या कथेवरुन लक्षात यते....
=== = = = = = = = = = = = = =
लेखक-सुधीर बी. पिंपळे 🤞🤞💐💐