Bluepad | Bluepad
Bluepad
आमचा प्रवास
मयुरेश गीता नाडकर्णी
मयुरेश गीता नाडकर्णी
4th Aug, 2022

Share

२४ ला सकाळी दादर वरून आमचा प्रवास झाला सुरू ।
भुसावळ होत पाहिलं डेस्टिनेशन मनाला आला हुरूप ।।
भेटीगाठी झाल्या गुळगुळे कुटुंबाशी गप्पा झाल्या मस्त ।
चहापाणी सर्व झाले, नाही म्हणता म्हणता आम्ही खारी पण केली फस्त ।।
संध्याकाळी त्यांचा निरोप घेऊन सुरू झाला पुढचा प्रवास ।
दुसरं डेस्टिनेशन शेगाव होत मनी गजानन भेटीची आस ।।
शेगाव येता येता रात्र झाली धर्मशाळेच नाव होतं विसावा ।
लगेच जेवून निद्रिस्त झालो मनात एकच भाव आपला गजानन सकाळी लवकरात लवकर दिसावा ।।
स्नान विधी आटोपून आम्ही निघालो मंदिरात, लाईन न लावताच आम्हाला मिळालं महाराजांचं दर्शन ।
दत्तरूपी मूर्ती मला जाणवली जैसे चतुर्भुज घेऊनि शंख पदम गदा आणि सुदर्शन ।।
नवसाच्या निमित्ताने आरसांच्या मुली भेटल्या, रात्रभर संपतच नव्हत्या गप्पा
या बायका इतका वेळ कश्या काय बडबड करतात तूच सांग देव बाप्पा ।।
तिसरं डेस्टिनेशन बुलढाणा होत दोन दिवसांचा होता वेळ
निसर्ग ही कदाचित मज्जा बघत होता करून ऊन पावसाचा खेळ।।
दोन दिवस हसत खेळत गेले चौथ डेस्टिनेशन होत संभाजी नगर
खूप दिवसांपासून मनी इछा होती म्हणून पाहून घेतलं लोणार सरोवर ।।
एक एक दिवस करता करता
आमचा प्रवास
आठवडा सरत चाललाय येऊन ठेपलीय परतीची वेळ
मिश्र भावना मनी दाटल्या आणी भावनांचा खेळ ।।

185 

Share


मयुरेश गीता नाडकर्णी
Written by
मयुरेश गीता नाडकर्णी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad