Bluepad | Bluepad
Bluepad
शांत शांत रहा मना शांत रहा
प्रतिभा
4th Aug, 2022

Share

मन हे चंचल सैराट धावते आणि थाऱ्यावर काही राहत नाही. पण कुणी अरे केलं की त्याला लगेच कारे करायची हुक्की येते.
काही म्हणतात त्याला शांत राहायला शिकवा काही म्हणतात संयम ठेवा काही म्हणतात मनात आकडे मोजा .राग आला की काही म्हणतात नाम जप करा पण ती खळबळ मनामध्ये स्वस्थ बसू देत नाही .कोणावर तरी कोणावर आग पाखडणे चालू होतं.
जनी निंद्य देते सर्व सोडून द्यावे
जनी वंद्य ते सर्व भावे करावे
समर्थांनी म्हटले की अशा नींद्य गोष्टींना मनात थारा नको
फक्त जिथे मन भक्ती भावाने पूजलं जाईल तीच गोष्ट मनात आणा .
पण तरीही या बापड्या मनाला कोण समजावणार परवा रस्त्यामध्ये एक बाई भाजीवाली बरोबर हुज्जत घालीत बसली होती. पन्नास रुपयाची तिने भाजी चाळीस रुपयाला घेतली आणि नंतर तिला पन्नास रुपयाची नोट दिली .त्या तिच्या भांडणामुळे ती जाताना तिला पन्नास रुपयाची नोट दिली हे विसरून गेली आणि ती बाई निघून गेली .इथे भाजीवाली म्हणाली बघितलं ना एवढी भांड भांड भांडली.पण शेवटी पन्नास रुपये देऊन गेली.विसरली ती.. स्वतःचे मन अशांत आणि दुसऱ्यांचेही विचलित करून गेली.
ऑफिस मध्ये कामे करताना आपण कधी कधी खूप वैतागले असलो तर इमारतीच्याभोवती जलद चालणे फायदेशीर ठरते. हा एक ब्रेक आपल्या मनात ऊर्जा निर्माण करतो आणि मन शांत करुन ताण खंडित होतो. लक्ष वेगळीकडे वळवल्याने मन शांत होईल आणि हलके वाटेल. शरीराला आणि मनाला बदल मिळेल.
एकाचवेळी अनेक गोष्टी केल्याने कोणतेही काम नीट होत नाही हे लक्षात ठेवा. एक काम पूर्ण झालं की मग दुसरं काम हाती घ्या. कठीण प्रसंगी हा नियम पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे. एकाचवेळी अनेक गोष्टींमध्ये मन गुंतवल्यास कोणत्याही एका कामावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकणार नाही. म्हणजे आधीच वाईट असलेली परिस्थिती अधिकच वाईट होईल.
विशेषता स्त्रियांना सवय असते मल्टी टस्किंग करायची त्याच्यामुळेच त्यांची गडबड जास्त होते पुरुषांचा तस नसत. एका वेळी बहुतेक पुरुष एकच काम करतात म्हणून त्यांची कामे जबाबदारीने पूर्ण होतात काही स्त्रिया सर्व स्तरावरच्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडतात पण स्थिर मन असेल तरच.
कठीण प्रसंगात आपण सामान्यत: आपले ध्येय विसरून जातो. आपण ही गोष्ट नेमकी का करत आहोत याबद्दल आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो. एकदा का तुम्ही ध्येयापासून भटकलात की तुमचे मन एकाग्र होणार नाही. तुम्हाला निर्णय घेण्यात अडचण होईल. सर्वप्रथम मनाला विचारा की आपले ध्येय काय आहे? ते उत्तर मिळाले की त्यानुसार कठीण प्रसंगाशी कसे लढावे या संदर्भात निर्णय घ्या.
जेव्हा कधीही एखादा कठीण प्रसंग तुमच्यासमोर उभा राहील तेव्हा दोन मिनिटे शांत चित्ताने विचार करा आणि ती गोष्ट केल्याने आणि न केल्याने काय परिणाम होतील याची कल्पना करा.
नको ते वाद
नको ते संवाद
मनाची ती घालमेल
शब्दांना चढते धार
काळीज होते आरपार
म्हणूनच सांगते मना
शांत रहा
बा.....मना शांत रहा
शांत रहा
प्रतिभा बोर्डे
शांत शांत रहा मना  शांत रहा

163 

Share


Written by
प्रतिभा

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad