Bluepad | Bluepad
Bluepad
Title

आविनाश ढळे
आविनाश ढळे
4th Aug, 2022

Share

ऑफिसमधली मैत्रीण....
( आमचे ऑफिस वेगळे असले तरी मैत्री जीव लावणारी आहे)
दैनंदिन जीवनातली एक महत्वाची व्यक्ती म्हणजे आपल्या ऑफिस मधली सहकारी..... !
ति माझ्या सोबत ऑफिस ला नाही पण घरातून निघालो की ती सोबत असावी आई वाटत...
मैत्रीण आणि साथ देणारी जिवाभावाची लोक आपण कुठे तरी शोधतोच नाही का?
आणि या धकाधकीच्या जगण्यात विश्रांतीचा क्षण आपण शोधत असतो, आणि मग तेच जगणे जर मुंबई च्या लोकल ट्रेन चे असेल तर काही विचारूच नका.
अगदी घडाळाच्या काट्यावर आपले ये जा ठरलेली असते.
आणि यातून वेळ काढून मित्र किंवा मैत्रिणाला प्रत्येक्ष न भेटता कॉल करून ती/तो सोबत असण्याची जाणीव काही वेगळीच असते
ऑफिसला निघताना जिला भेटायला आतुर असतो अशी व्यक्ती.... नातं ना रक्ताचं असतं ना घट्ट मैत्रीचं तरीही तिचं रोज भेटणं महत्वाचं असतं.... तिच्याशी अनेक गप्पा रंगतात....कधी विनोदांची मैफिल तर कधी विचारांची मैफिल रंगते सुख दुःखाची देवाण घेवाण सुरू असते.... आठ तासाच्या कालावधीत आपल्या अवती भवती असलेली ती सावली सतत हवीहवीशी असते.... चुकलं तर सावरून घेणारी मनातलं जाणणारी.... खचले तर धीर देणारी.... खिसा रिकामी असला तर स्वतः काहीतरी खायला घेऊन येणारी.... 'आज नाही ग जमत तू बघशील ना' असं म्हणताच हसत सगळं सांभाळणारी..... घरी निघताना थोडं मन उदास होतं उद्या भेटायचं आहे तरी मनाला हुरहूर लावून जातं.... तिच्यासोबत वेळ कधी निघून जातो हे कळत नाही.... जी एक दिवस नाही भेटली तर दिवस संपता संपत नाही.... दिवसभरातली आपली हक्कची अशी व्यक्ती म्हणजे असते आपली ऑफिसमधली मैत्रीण......

0 

Share


आविनाश ढळे
Written by
आविनाश ढळे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad