पुन्हा एक तशीच घटना वाचली खूप जनांच्या व्हाँट्स अप स्टेटस ला,आज पुन्हा एक निरपराध चिमुकली एका मानव रूपी जनावराच्या वासनेला बळी पडली .मी जनावर लिहिले कारण अशी लोक माणूस म्हणण्याच्या लायकच नसतात. मावळ तालुक्यातील कोथुर्णे(पवनानगर) गावातील एका सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तीला मारुन टाकले अजून किती काळ हे अस चालू राहणार काय दोष होता त्या मुलीचा ? मुलगी म्हणून जन्माला आली हा???? बरेच जण म्हणतात मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्या त्यांना वाघीण बनवा पण त्या सात वर्षाच्या मुलीने त्या बावीस वर्षाच्या जनावरा पासून स्वतः चे रक्षण कसे करावे तीची मानसिक ताकद कीतीही तीव्र असली तरी शारीरिक ताकद कमीच पडणार कशी ती स्वतः च संरक्षण करेल मुळात बलात्कार या शब्दाचा अर्थ तरी तिला माहिती असेल का?? आपल्या सोबत काय घडणार आहे याची जाणीव तरी त्या कोवळ्या जिवाला असेल?? नाही . त्या नराधमाला आपल्या कायद्याच्या रक्षकांनी पकडले सलाम त्यांच्या कामगीरीला पण कायद्याच्या रक्षकांचे हात कायद्यानेच बांधलेत त्या मुळे त्याला केव्हा शिक्षा दिली जाईल काय माहित. या बाबतीत आपले कायदे केव्हा कठोर होतील , लोकांना कायद्याची भिती च नाही राहिली असंख्य पळवाटा आहेत त्यात पण हे जर असच चालत राहिले तर स्त्रीयांचा पुरुषांवर विश्वास च राहनार नाही सगळे पुरुष सारखे नसतात पण शंभरांमध्ये दहा जण अशा खालच्या पातळीचे विचार करनारे असतात आणि त्या दहा जनां मुळे राहिलेल्या नव्वद जनांना हि त्याच द्रुष्टीने पाहिले जाते .हे सगळ थांबले पाहिजे आणि त्यासाठी कायदे बदलण्याची वाट कशाला पाहायची आपणच हा बदल केला पाहिजे आपल्या आजूबाजूला असे प्रकार घडत असतील तर त्या विरोधात आवाज उठवला च पाहिजे मुला मुलींना जी वेगवेगळ्या प्रकारची वागणूक दिली जाते ती थांबवली पाहिजे मुलगी म्हणजे संधी नाही तीचा आदर करा ही शिकवण आपल्या पुढील पिढीला देणे गरजेचे आहे दुसऱ्या मध्ये बदल व्हावा असे वाटत असेल तर आधी आपल्या विचारात ही बदल केला पाहिजे.
ही बातमी वाचल्यावर याबद्दल काही लिहण्याची मला खरतर इच्छा नव्हती पण घरात एखादी मुलगी असेल शाळा, काँलेज,किंवा नोकरी या निमित्ताने ती घराबाहेर जाते पण ती पुन्हा सुखरूप घरी येई पर्यंत तिच्या आई वडिलांची कती घालमेल होत असते त्यात अस काही ऐकल तर अजून च भर पडते मग तीने काय करावे स्वतः ला घरात बंदिस्त करून घ्याव ? आणि का ? तर या समाजातील पुरुषांच्या वाईट नजरे पासून स्वतः च रक्षण करण्यासाठी , का तीला स्वतंत्र पणे जगता येत नाही मोकळे पणाने बाहेर वावरता येत नाही ? या जगातील प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत अशा घटना लहान मोठ्या प्रमाणात घडतच असतात घरा बाहेर पडल्या नंतर एखादा तरी पुरुष तिच्याकडे वासनेच्या नजरेने पाहतो च समाज बदलतोय अस म्हणतात पण हे अस काही ऐकून प्रश्न पडतो खरच समाज बदलतोय❓विचार करा एकदा .........