आज त्या कृष्णा ला हि त्रास होत असेन आजच्या युगातलं प्रेमाचं विदारक रूप बघून
कुठे त्याने अवतार घेतला प्रेमाचा संदेश देण्यासाठी आणि लोकांनी त्याचा काय अर्थ घेतला हे पाहून रडला असेल बिचारा श्री हरी
का नाही आज सुदर्शन निघत तुझं यांचे इगो आणि विचार मोडायला आज कुठेयस तू द्वारकाधीश जेव्हा निष्पाप मुलीच्या आत्म्याचे उघडपणे बिनदास्त चीरहरण होताना
तुमच्या सोईनुसार ,तुमच्या आनंदासाठी , तुमच्या मड नुसार तुमच्या गरजेनुसार तुमच्या च वेळेनुसार प्रेम करा हे कधी शिकवलं रे तू या पुरुषना
सगळ्यांवर प्रेम करतात आजकाल लोक कोणी ५ तर कोणी १० सगळ्यांनाच आय लव्ह यू बोलतात आजकालचे पुरुष या पैकी जी त्यांच्या सोयीनुसार वागत असेल ती जास्त दिवस टिकत असेन प्रेम मी खूप करतो पण माझे हे प्रॉब्लेम माझे ते प्रॉब्लेम उघडपणे कारण देऊन खेळतात साधी इतकी समज नसावी या पुरुषांना कि जी सारखी तुमच्या मनानुसार वागते ती काय तुमच्यावर प्रेम करत असणारे थोडेसे वाद झाले कि नातं तोडतात त्या पासून पळतात जी मानसारखं गोड बोलते मग तिथे मन रमवतात
साधं इतकं कळू नये जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या चांगल्यासाठी बोलते भांडणाऱ्या व्यक्ती त्या नात्यासाठी भांडतात ते नातं टिकवण्यासाठी बोलतात
तुझ्यात त तर काळीज होत ना कृष्णा मग यांच्यात दगड कसे रे भरेलेस प्रॅक्टिकलनेस चा पाठ करणारे हे दगड अशेच फेकायचे ना धरतीवर यांना तू आईचा गर्भ दिलाच कसा याना तू भरभरून प्रेम करणारी नाती देतोच कशी
हा कोणता न्याय तुझा का तू हि दगड झालास
हे तुझे कोणते अंश तू पाठवले तुझ्याच राधेच्या अंशाला तू कसा दुखवू शकतोस उत्तर दे भगवंता आज उत्तरच दे
हा तुझा न्याय मला मान्य नाही
राधेला त्रास देणारा कृष्ण मी पुजला नाही शक्ती ला यातना देणारा शिव मी पहिला नाही
आज जगत्जननी हि रडत असेन आणि तुला विचारेन आपला अवतार तर वाया गेला श्री हरी तुझा हा न्याय मला मजुंर नाही
आधी तू मला दगड बनवायला पाहिजे होते मग तू दगड झाला असता तरी चालले असते
तुझी हि रीत मला मंजूर नाही राधा नाही बदलली तर कृष्ण कसा बदलला
त्रास राधे ला तर कृष्ण कसा सुखावला
उत्तर दे भगवंता तू उत्तर दे
तू शिव आहेस तर मी हि शक्ती आहे माझं अस्तित्व तू तुडवू शकत नाहीस माझा अपमान शिवाकडून होणं हे शक्य नाही त्रास माझा हा फक्त माझा असूच शकत नाही