Bluepad | Bluepad
Bluepad
विघ्नहर्ता -17
Radhika  Kulkarni
Radhika Kulkarni
4th Aug, 2022

Share

विघ्नहर्ता....17
©राधिका कुलकर्णी.
पहाटे केव्हातरी आभाला जाग आली.किती वाजलेत बघायला ऊशाशी फोन चाचपडला पण काही केल्या सापडेना.तेव्हा तिला आठवले काल दूपार पासुन तिने फोन हातातही घेतला नव्हता.
चटकन ऊठुन तिने पर्समधुन फोन काढला.चार्जिंग संपल्यामुळे निर्जीवावस्थेत पडला होता बिचारा संजिवनीच्या प्रतिक्षेत.फोनला चार्जिंगला लावुन आभाने फोन ऑन केला.
फटाक्यांची आतषबाजी व्हावी तसे तडतडत मेसेजेस आणि मिस्डकॉल्स नोटिफीकेशन्स यायला लागले.जवळपास शंभराहून अधिक मेसेजेस आणि फोन्स आणि सगळे एकाच व्यक्तीचे.ती व्यक्ती कोण हे वेगळे सांगायची गरजच नव्हती,तेजसचेच होते.
पण आभाने तेजसबरोबरचे सर्व संबंध तोडायचा निर्णयच घेऊन टाकला होता त्यामुळे उदासपणे डिलिटचे एक बटन दाबून ती पुन्हा अंथरूणावर लवंडली.
आजपासुन सकाळचे जिम जाणेही बंद करायचे ठरवले होते तिने.
जिथे जिथे तेजसची भेट होऊ शकेल अशा सगळ्या ठिकाणांना तिने वर्जित करायचे मनोमन ठरवले होते.
इकडे रात्रभर बिछान्यावर अस्वस्थ पडलेला, पहाट व्हायची वाट पहात असलेला तेजस झोप झालेली नसुनही फक्त आभाची भेट होईल ह्या एकाच आशेने जिममधे आला.रोजचेच वर्कआऊट करायला आज मात्र मन तयार नव्हते.सतत लक्ष दरवाजावर.कधी आभा येईल आणि मी तिच्याशी बोलेन.
पण जसजसा वेळ पुढे जात होता त्याची निराशा होत होती.मन उदास झाले तरी वेडी आशा... कदाचित उशिरा का होईना ती येईल पण आभा आलीच नाही.
मुलांच्या शाळेची वेळ म्हणजे आता काही ही येत नाही अशी खात्री पटल्यावर उदास मनानेच तेजस घरी परतला.त्यालाही त्याच्या क्लासेसला वेळेत जाणे भाग होते.
नाईलाजानेच तो जिम मधुन बाहेर पडला.
पटकन आवरून गेटवर जाऊन थांबला.
मुलांना  सोडायला तरी येईलच.तेव्हा बघु संधी मिळाली तर बोलू.
आभालाही एव्हाना माहित झाले होते की तेजसला तिचे सगळे टाईमटेबल पाठ झालेय.त्यामुळेच तिही ठरवुनच त्या त्या वेळा टाळत होती.
आजपासुन ऑफीच्याच जिमला थोडे लवकर जाऊन तिकडेच वर्कआऊट करायचे तिने ठरवले होते.त्यासाठी  तिलाही लवकर जायला लागणार होते.मुलांना सोडायला खाली उतरली आणि दुरूनच तेजसची गाडी गेटवर थांबलेली तिने बघितली.
मुलांसमोर तो बोलला तर तिला टाळता आले नसते म्हणुन तिने पटकन मुलांना सांगितले,"अरेच्याऽऽ मी गॅसवर दूध ठेवुन तशीच आले की खाली.मुलांनो तुम्ही पूढे व्हा मी आलेच."
ती तशीच लिफ्टकडे वळली.
तेजसने दुरूनच तिला पुन्हा लिफ्टकडे जाताना बघितले.
होती नव्हती तीही आशा संपली होती संवादाची.मुलांना बाय करतच तो तिकडून निघाला.
गाडी चालवता चालवता पुन्हा तेजसने फोन केले पण आभाने त्याचे फोन घेतले नाही.
आज ऑफीसला लवकर जायचे होते,दोन कारणांसाठी.
एक ऑफीसमधेच जिम करायचे ठरले होते आणि दुसरे तेजसची भेट टाळणे,कारण
त्याची परत यायची वेळ तिलाही माहितीची होती.रोजच पार्किंगमधे ती ऑफीस निघायला तो परत यायचा आणि पहिली भेटही तशीच झालेली त्यांची.तिला आता कोणत्याच मोहपाशात अडकायचे नव्हते.
त्यामुळेच त्याआधी तिला बाहेर पडायचे होते.
ठरवल्याप्रमाणे सगळे पार पडत होते.
दिवसभर पाऊस पडावा तसे तेजसच्या मेसेजेस आणि फोनकॉल्सची रिपरीप चालूच होती.
दोन दिवस होऊन गेले होते.जवळपास पाचशेहून अधिक मेसेजेस केले होते तेजसने आणि तितकेच मिस्डकॉल्सही.
"काय करावे ह्या मुलाचे?" आभाला खरच प्रश्न पडला होता.
ह्या सगळ्यात त्याचा दोष होता का खरच? हेही जाणून होती आभा.
पण तिलाच आता त्याचा सामना करायची धास्ती वाटत होती.तो समोर आल्यावर कदाचित ती मोडून गळुन पडेल त्याच्यापुढे हिच भीती तिला सतावत होती.
विचारांच्या तंद्रीतच ती ऑफीसला पोहोचली.कामाचा ढिग पुढ्यात.जिमबिम विसरून ती डायरेक्ट कामाला लागली.
ऑफीसमधे गेली की ती सगळे विसरून जात असे.कारण काम तिची आवड होती.पॅशन होते.
आज रॅम्प टेस्ट होती.आपले डिझाईन्स योग्य पद्धतीने कसे प्रमोट होतील ह्यावर सगळे यश अवलंबुन होते.त्यामुळे आता कामात कोणतीही कसुर राहता उपयोगी नव्हती.
दिवस कामात कुणीकडे सरला कळलेही नाही.
निघताना पुन्हा त्याच विचारांनी मनात थैमान घालायला सुरवात केली.
सहज फोनवर नजर टाकली तर त्याचेच मेसेजेस ब्लिंक होत.जणू ती आता त्याचे मेसेजेस येणेही गृहित धरू लागली होती.
दर मि.नी नविन मेसेज.प्रत्येक मेसेजमधे सॉरी.
तेजस चांगला मुलगा आहे हे आभाला अमान्य नव्हतेच.पण त्याच्या सहवासात होणारी पार्थची अनुभूती मात्र तिला शहारा आणणारी होती.
पार्थच्या सहवासाची ओढ तिला पुन:पुन्हा तेजसच्या जवळ घेऊन जाईल ह्याच भीतीने ती स्वत:ला तेजस पासुन दूर ठेवत होती.पण हे सत्य कबुल करण्याचे धाडस मात्र तिच्यात नव्हते.
समाजासाठी आजही ती एक विधवाच होती.तिचे सर्व आय़ुष्य आता फक्त मुलांचे भविष्य घडवण्यासाठी वाहून टाकले होते तिने.
स्वत:साठी विचार करायला तिला वेळच नव्हता.पण नियतीने आज एक नविन तिढा तिच्या पुढ्यात टाकला होता.
मन एक वेगळेच संकेत देत होते तर मेंदू दुसरेच काहीतरी सुचवत होता.
मन की बुद्धी ह्या द्वंद्वात आभा गुदमरून गेली होती.तेजसचे सततचे मेसेजेस त्यात तेलाचे काम करत होते.आग विझण्याएेवजी भडकतच होती.
विचार करतच दरवाजात पोहचली तर समोर तेजस ऊभा.विचारांच्या नादात तिलासमोर ऊभा असलेला तेजस दिसलाच नव्हता.
अचानक त्याला समोर बघुन आभा भांबावली.
ती त्याला टाळून दुसऱ्या बाजून दरवाजाकडे जाऊ पहात होती पण तेजसने तिला दोन्ही हात पसरून दारातच अडवले.त्याचा पवित्रा बघुन आभा घाबरली.पॅसेजमधे अचानक कोणी आले तर नसता तमाशा झाला असता.लोोक काय चर्चेला विषयच शोधत असतात त्यात असे विषय तर चवीचवीने चघळले जातात.तिला हे सगळे व्हायला नको होते म्हणुनच ती तेजसशी बोलणे टाळत होती रस्त्यात.
आभाने स्वत:ला सावरले आणि म्हणाली,"तेजस यहाँ तमाशा मत करो.किसीने देख लिया तो प्रॉब्लेम हो जाएगी.प्लिज मुझे जाने दो."
"नहीऽऽ.आज मै बिना बात किए जाऊंगा नही यहाँ से."
"तेजस प्लिज ...मै ऑफीस से थक कर आयी हुँ.मेरा रास्ता छोडो.मुझे तुमसे कोई बात नही करनी हैै."
तुम्हे नही करनी होगी लेकीन मुझे करनी है.और जब तक तुम मेरी बात नही सुनोगी मै यहाँ से हटुंगा नही."
तेजस हट्टालाच पेटला होता.
"देखो,मै अभी कोई भी बात करने के मुड मे नही हुँ.बहोत थकी हुई हुँ.हम बाद मे बात करेंगे."
समजावणीच्या सूरात तेजसला कटवण्यासाठी आभा तसे बोलली.
पण तेजसही तिला ओळखून होता.
"बाद मे मतलब कब?"
"तुम ना तो मेरे फोन उठाती हो ना मेरे मेसेजेस पढती हो."
"तुम कब आैर कैसे बात करोगी बताओ मुझे?"
"मेरे यहाँ से जाते ही तुम मुझे ब्लॉक कर दोगी तो मतलब मै तो गया ना."
"मै अभी यही बात करना चाहता हुँ."
तेजस खूप उद्विग्नतेने बोलत होता.आभाने त्याला दुसरा मार्गच सोडला नव्हता मग तो तरी काय करणार होता.
"देखो तेजस हम पॅसेज मे खडे है.यहाँ इस तरह से बात करना ठिक नही होगा,बात को समझो."
"नही आजतक मैने हर बार सबको समझ लिया इसलिए मेरा ये हाल है लेकिन अब नही आभा."
"तूम एकऽऽबार सिर्फ एकबार मेरी गलती क्या है बताओ फिर मै दोबारा तुम्हे तकलिफ नही दुंगा."
आभा ह्यावर नि:शब्द झाली.तिच्याजवळ काही उत्तर असेल तर ती देणार ना.
"तेजस प्लिज मेरा रास्ता छोडो.मुझे तुमसे कोई बात नही करनी है."
"ठिक है.तुम यही चाहती हो तो यही सही.मै सिर्फ एक चीज कहना चाहता हुँ."
पिछले कुछ दिनों से मै खुष था बहोत.लगने लगा था की मेरा भी कोई अपना इस दुनिया मे है जिसके साथ मेरी जिंदगी आराम से कट जाएगी.लगने लगा था की इस अन्जान शहर मे कोई अपनी फॅमिली है.
मन ही मन तुम्हे चाहने लगा था आभा.पसंद करने लगा था.यही वजह होंगी शायद की मै तुम्हारे करिब आ सका.लेकीन भगवान जानता है उसमे वासना का अंश तक नही था.हम दोनो एकदुसरे का सहारा धुंड रहे थे.तुम्हे भी महसुस हुँआ होंगा ये.
लेकिन फिर भी अगर तुम्हे लगता है की मै गलत हुँ तो अभी इसी क्षण से तुमसे कोई वास्ता नही रखुंगा मै.
अबसे ना मेरा फोन आयेगा ना मेसेज.
जिस वक्त तुम्हे लगे की मै गलत नही था तब तुम खूद चलकर मेरे पास आओगी.अब मेरी वजह से तुम्हे कोई तकलिफ नही होगी  मेरे दोस्त..वादा है मेरा."
एवढे बोलुन तेजस त्याच्या घरात निघुन गेला.
निस्तब्द्ध पुतळा होऊन आभा फक्त त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती.
एक संजीवनी आपल्यातून जणू निघुन चाललीय असा भास होत होता आभाला..
       ~~~~~~
खरचच त्यानंतर तेजसचा एकही मेसेज आला नाही आभाला.आता अस्वस्थ,बेचैन व्हायची पाळी आभावर आली होती.
कालपर्यंत तेजसचे येणारे मेसेजेस मनोमन तिला सुखावुन जात होते.कोणीतरी आहे ज्याला माझ्या त्याच्यासोबत असण्याची किंमत आहे.नकळत तिचा इगो सुखावत होता.
परंतु त्याला दिलेल्या तुच्छ वागणुकीने तोही दुखावला होता.प्रत्येकाला स्वत:चा असा स्वाभिमान,आत्मसन्मान असतोच.आणि जर चूक दोन्ही बाजूने घडली असेल तर शिक्षा कुणा एकाला का मिळावी.परंतु इकडे आभाने एकतर्फी न्यायनिवाडा करून तेजसला आरोपी घोषीतच करून टाकले होते.वर त्याला त्याची बाजू मांडायची एकही संधी तिने दिली नाही.मग ह्या परिस्थितीत जे व्हायचे तेच झाले.जास्त ताणले की तुटते ही म्हण इकडे सार्थ ठरली होती.
यंत्रवत सगळी कामे उरकत असली तरी आभाच्या मनामधे मात्र विचारांचे काहूर माजले होते.
तेजसवर आपण अन्यायच केला तसे पाहिले तर.
"माझ्या संमती शिवाय तो असे वागूच शकला नसता.मी ही चुकलेच ना त्या बेसावध क्षणी.मग मी घेतलेला निर्णय कितपत योग्य होता तेजस बाबत?"
स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारून बेजार झाली होती आभा.
रात्र फार झाली होती.झोपेची तिला प्रचंड गरज
विघ्नहर्ता -17
होती.
तसेही जास्त विचार करण्यात अर्थच नव्हता.
कारण प्रश्नही तिचेच होते आणि त्यावरचे उत्तरही तिच होती.मग उपाय कोणाकडे मागणार?"
आजचे मरण उद्यावर ढकलत आभाने अंथरूण जवळ केले.
~~~~~~~(क्रमश:)~~~~~~~~~~~~
विघ्नहर्ता......17
©राधिका कुलकर्णी.

171 

Share


Radhika  Kulkarni
Written by
Radhika Kulkarni

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad