"मी नव्या युगाचा मतदार"
मी नव्या युगाचा मतदार!
योग्य तो करून विचार!!
जो करेल राष्ट्राचा उध्दार!
त्यास करेल मी उद्याचा उमेदवार!1!
भेटवस्तूचा मोह, पैशांची लालच देऊन !
विकला नाही जाणार मी यास बळी जाऊन!!
नाहीतर भ्रष्ट प्रतिनिधि येईल उद्या निवडून!
अन् हक्क माझा मोलाचा घेतील हिरावून!2!
डॉ. बाबासाहेबांनी दिलेले संविधान ते महान!
मतदानाच्या अधिकाराची,कर्तव्याचे लिहलेले त्यात प्रमाण!!
डॉ बाबासाहेबांच्या संविधानाची ठेऊन जाणीव!
मतदान करून योग्य प्रतिनिधी निवडून भरून काडील उणीव!3!
भेदभाव न करता धर्म, वंश,जातीचा!
बुध्दी-विवेक-ज्ञानानी निर्णय घेईल टोकाचा!!
अन् ताई बाई अक्का न विसरता करा तुम्ही ही मतदान!
कारण एक मत देशाची घाण साफ करण्यास आहे मौल्यवान!4!
꧁कवी-धनंजय(धनु)देविदास परदेशी꧂
अतिशय सुंदर हृदयाला स्पर्श करणारी मतदानाच्या मूल्याची जाणीव करणारी माझी "मी नव्या युगाचा मतदार" ही कविता .
"मी नव्या युगाचा मतदार"
अधिक नक्कीच visit kara👍👍👍
https://youtube.com/channel/UCQOd_rcrpDZYvpOkkhMt89w