Bluepad | Bluepad
Bluepad
"पाऊसाची धमाल "
s
shweta murkute
4th Aug, 2022

Share

पहिले काळे ढग, पहिली वीज ,पहिला ढगांचा गडगडाट, पहिला पाऊस ,पहिला मातीतून येणारा सुगंध ,याबरोबर एक गरमा गरम चहा. सरसर पडतो पाऊस,टपटप पडतात गारा,वीजा चमकतात फार , ढग म्हणतात सुसाट चाललाय वारा वारा म्हणतोय चला करुया मजा, पाऊस म्हणतोय होईल आम्हाला सजा, पाऊस जातोय तेव्हा करतात पावसाला खूप मिस, जेव्हा पाऊस येतोय तेव्हा सगळे नाचतात खूप , मोराच्या थुईथुई नाचण्याने ढगांच्या गडगडाचा आवाज झाला चुप, पावसाने निसर्गाला दिले सुंदर रुप, सगळी सजीव सृष्टी आनंदाने गायला लागते खूप , निसर्गाने सुंदर रुप प्राप्त केले , सजीवांनी निसर्गाला बघितले तेव्हा मन झाले तृप्त, सुंदर सुंदर अक्षरांनी झाली पावसाची कविता मस्त , आम्ही सगळे बोलू चहा झाला फस्त , मी दुसऱ्या दिवसाची पाहते वाट, उगवला दुसरा दिवस उटा आता नऊ वाजायच्या आत, घडयाळाचा काटा पुढं पुढं सरकतोय, शेतकरी पाऊस पडेल याची वाट पाहतोय, शेतकरी जाता जाता पाऊस आला खूप , आनंदाने शेतकरी पावसाला म्हणाले सुंदर तुझे रुप, माझ्या कवितेत यमक जुळत नाहीत फार, पावसाची कविता बनवता-बनवता चहा झाला गार .
"पाऊसाची धमाल "

0 

Share


s
Written by
shweta murkute

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad