Bluepad | Bluepad
Bluepad
प्रेमात स्वातंत्र्य हवे ,बंधन नको..
Nidhi sanjay sabale
Nidhi sanjay sabale
4th Aug, 2022

Share

'. 'प्रेम' या शब्दामध्ये जग सामावलेलं आहे. त्यामुळेच आपले अस्तित्वही टिकून आहे.आणि आपल्या जगण्याला अर्थ येतो तो फक्त 'प्रेम' या शब्दामुळेच. प्रेमामुळेच जग सुंदर वाटायला लागतं .अगदी हवहवसं .'प्रेम' जगण्यात जिवंतपणा निर्माण करतं, चेहऱ्यावरील सौंदर्यात भर पाडतं, शालीन मनाने मदतीचा हात पुढे करतं,भक्तिमय होऊन अंतर्मनाला आवाज देतं,स्वप्नांच्या सोनेरी दुनियेची सफर करवतं, अपूर्णाला पूर्ण करतं. दृष्टीला तृप्त करतं, क्रोधाच्या आगेला शमवत, सांगता न होणारं ते प्रेम असतं .प्रेम हे स्वच्छंद असतं. देण्याघेण्याची परिभाषा त्यात उरत नाही. सुखी नैनांचं दिव्य वलय आतम्याला समाधान देऊन जातं.त्याला खऱ्या श्रीमंतीची अनुभूती होते.मिळवणं म्हणजे प्रेम नसतच, प्रेमात असणाऱ्याला फक्त देणे माहीती असतं.प्रेमाची चव तोच घेऊ शकतो ज्याला प्रेम कळलं ,अनुभवलं, समजलं असेल. प्रेम होणं सहज सोपं नव्हे.प्रेमाविषयी वेगवेगळे विचार प्रवाह समाजात असतात.प्रत्येकाची मते ही आपापली असू शकतात. प्रेमाचे पैल्लू जरी वेगवेगळे असले, तरी अर्थ मात्र तोच राहतो. भूतलावरील संपूर्ण सजीव सृष्टीचं निरीक्षण जर केलं,तर इथल्या प्रत्येक घटकात ओझरत्या प्रेमाचं दर्शन आपणास देता येईल. प्रेम होणं म्हणजे भक्तीची परम सीमा गाठण्यासारखं आहे.
शुभ सकाळ😊🙏

184 

Share


Nidhi sanjay sabale
Written by
Nidhi sanjay sabale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad