नात्यातील गोडवा वाढवणारे दोन महिने
जुलै महिना संपत येण्याच्या अगोदर पावसाळा चालू झालेला असतो. वृक्षांना नवीन पालवी येते.मच्छि या दिवसात अंडी आणि मुलांना जन्म द्यायला नदी किंव्हा खाडी किनारी येते. शेतकरी हा शेतीच्या कामात दंग असतो.पशू आणि पक्षी आनंदीत असतात. निसर्ग हिरवी शाल अंगावर घेऊन सौंदर्याने नटलेला असतो. हे सर्व घडत असताना चाहुल लागते. श्रावण महिन्याची
श्रावण महिन्यातील निसर्ग सौंदर्य पाहन्यासाठी परदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने भारतात येतात. अनेक लेखकांनी वेगवेगळ्या प्रकारे वर्णन आपल्या लिखातून केले आहे. नद्या , धबधबे ओसाडून वाहू लागतात. डोंगर दऱ्यातून वाट काढत नदी सागराला येऊन भेटे. निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी त्याच्या सानिध्यात गेलं की खूप छान वाट. धकवा , काळजी आणि विचार दूर होऊ जातात आपण रमून जातो निसर्गाच्या कुशीत निवांत पणे मग tv , मोबाईल आणि इतर मनोरंजन माध्यम नको होतात. कारण live निसर्गाच तेजस्वी रूप पाहून आपण त्याच्या मध्ये गुंतून जातो. पशू - पक्षी चा आवाज , नदीच्या पाण्याचा आवाज आणि वाऱ्या सोबत ढोलणारी ती झाडे त्याचा तो आवाज हे सर्व दरदरोज च्या संगीता पेक्षा ही खूप छान असत. या महिन्यांमध्ये निसर्गाशी घट एक नात निर्माण होत.
आषाढी एकादशी पासून सण आणि उपवास सुरू होतात. या महिन्यात शेतकरी आपल्या बैलांची आणि निसर्गाची पूजा करतो. या महिन्यामध्ये नागपंचमी , रक्षाबंधन , गोकुळअष्टमी आणि गणेशोत्सव या सारखे अनेक सण साजरे होतात. कोकणातील गणेशोत्सव तर पाहण्यासारखा असतो. काम आणि धंद्यासाठी बाहेरगावी राहणारे चाकरमानी कोकणात गणपतीच्या सणाला गावच्या घरी येतात. या महिन्यान मध्ये माणसाच्या नात्यातील गोडवा वाढतो. सर्वजण एकत्र येऊन सर्व सण साजरे करतात. गरीबाच्या घरात पण गोड पदार्थ बनवले जातात. गरीब माणसं नैराश्य दूर करून हे सण साजरे करतात. खूप लिहिण्या सारख आहे. निर्सगाशी नात जोडणारे हे महिने आहेत.
लेखन . प्रसाद शांताराम मेस्त्री