जगातल सगळ्यात सुंदर नातं म्हणजे मैत्री आणि मित्रत्वाची जाण असणाऱ्यालाच मैत्री कळत असते. त्यामुळे
"दुःख अडवायला उंबऱ्यासारखा
मित्र वणव्यामध्ये गाराव्यासारखा"
" का उगा हिंडतो देव शोधायला
मित्र आहे जवळ मंदिरासारखा"
" दृष्ट लागू नये वेदनेची मना
मित्र डोळ्यामध्ये काजळासारखा"
"जाळताना मला देह ठेवा असा
हात खांद्यावरी टाकल्यासारखा"
✍🏻प्रा.अनंत राऊत
जगातल्या सर्वतोपारी नात्यांपेक्षा सगळ्यात जवळच, आपलंस, हक्काच वाटणार नातं म्हणजे मैत्री. वरील राऊत सरांच्या कवितेच्या काही ओळी हेच स्पष्ट करतात. त्यांच्या मते जन्म एका टिंबासारखं असतो, आयुष्य हे एका ओळीसारखं असते आणि प्रेम हे त्रिकोणासारखं असत. पण मैत्री मात्र वर्तुळसारखी असते ज्याचा काही अंत नाही.
प्रत्येकाच्या आयुष्यात एक मित्र असा असतोच कि, काहीही झालं तरी आपल्या माघे हक्काने उभा राहतो, आपल्या दुःखात सहभागी होतो, आपल्या वेदना जाणून घेतो, आपल्याला दुःख मुक्त करण्याचा प्रयत्न करत असतो.भलेही तो स्वतः दुःखात असला तरीसुद्धा. असे मोजकेच मित्र असतात. आणि ज्यांच्या जवळ असे मित्र असतात तो सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे अस मलातरी वाटते. जग फार सुंदर आहे हो पण तितकंच सुंदर आपला कुणी मित्रच नसेल तर मात्र आपल्या जीवनाला अर्थ नाही असेही मला वाटते.
मैत्री ही कुणालाही कुणाशीही होऊ शकते, मैत्रीला वयाची मर्यादा नसावी. मैत्री निथळ पाण्यासारखी निर्मळ असावी. मैत्री कुणाशीही होऊ शकते फक्त अंगी अहंकार नसावा लागतो. मैत्रीमध्ये वाद विवाद, भांडण, आणि खालीवर पणा बिलकुल नसावा, असे काही झाल्यास मैत्री टिकत नसते. मैत्री टिकवण्यासाठीच मित्राला माफ करणे तितकेच गरजेचे आहे. गौतम बुद्ध असे म्हणतात
"चूरगाळल्या नंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा" त्यामुळे आपण क्षमा करत राहिले पाहिजे.
गजलकार आबेद शेख अस म्हणतात,
"यारहो क्षमा करत चला
माणसे जमा करत चला"
मित्रत्वामध्ये गैरसमज नेहमीच होत असतात पण त्याचा फायदा इतर घेतात, त्यामुळे क्षमा करत चला आणि माणसे जमा करत चला..!
एका ठिकाणी राऊत सर परत म्हणतात,
"सोबतीने संपवू अंधार मित्रा
वेदनेचाही करू शृंगार मित्रा
घर कसे मजबूत असते मैत्रीचे
गैरसमजाचे नको बंद दार मित्रा
तू दगा केलास आता चलं असुदे
मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा
वेगळे सावज नको लावू गळाला
तोच गळ घे मी पुन्हा फसणार मित्रा"
✍🏻प्रा. अंनत राऊत
म्हणून म्हणतो मित्रहो... मैत्री ही हात आणि डोळ्याप्रमाणे असते, जेंव्हा हाताला त्रास होतो तेव्हा डोळे रडतात आणि डोळ्यात पाणी आले कि तेच हात डोळे देखील पुसतातरक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीत ओढ असते आणि म्हणूनच यारहो मैत्री खूप गोड असते.
खरंच मैत्री ही पिंपळाच्या पानासारखे असते कितीही जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटते.
शशांक खंदारे, पुसद