Bluepad | Bluepad
Bluepad
अण्णाभाऊस..
Shashank Khandare
Shashank Khandare
3rd Aug, 2022

Share

१-ऑगस्ट, लोकशाहीर, शिवशाहीर, लोकसाहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त...!
अण्णाभाऊंस....!
प्रिय अण्णा तू..
ना शिक्षित होता ना अशिक्षित होता
मिळवलय तू हे ज्ञान रसत्यावरच्या
पाट्या वाचून
झालास मग वाचन्या-लिहन्यास सक्षम
अन पेटून उठलास तूही या व्यवस्थेवर
शोषित पीढित समाजाच्या व्यथा घेऊन
तू..
प्रस्थापितांच्या राजवटीत मांडली व्यथा
इथल्या बेकसूर शोषित समाजाची
तू..
आखलाय इतिहास माहित नसलेल्या
जगाचा, लोकांचा, कितपत पडलेल्या समाजाचा
तू..
पेरला शिवाजी राशियाच्या मातीत जाऊन
अन मांडला जगाच्या वेशिवर सर्वप्रथम
पोवाड्यातून..
तू..
केली "फकिरा" सारखी प्रबळ कादंबरी
बाबासाहेबांच्या झुंजार लेखनीस अर्पण
तू..
केलीस तुझी मैना बोलकी
सयुंक्त महारष्ट्राच्या चळवळीत
अन दिल योगदान या महाराष्ट्राला
स्वतःच्याच जीवनाच..
तू..
छाती ठोकुन सांगायचा जगाला
"पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही"
त्यांनी तुला मान्यच केल नाही आजही..!
तू..
होता प्रस्थापितांच्या मुस्क्या
आवळणारा शाहीर,
वास्तविक वेदनेची जान करुण
देणारा साहित्यरत्न..
कामगारांच्या हक्कासाठी लढनारा
एक सच्चा कम्युनिस्ट..
हे सगळ माहित असून,
तुला तुझ्या विचाराना विसरत आहेत
तुझ्याच खांडातील तुझीच गुरं
स्वतःला कट्टर म्हंणवून घेणारे
तुझे अंधभक्त उगवत आहेत नव्याने
अन करत आहेत जातीच्या वाटन्या
हलक्या-भारी गोष्टीतून
तुला उपेक्षित असलेला समाज
खरच निर्माण झाला का
हा प्रश्न मला पडला आहे..?
✍🏻
अण्णाभाऊस..
शशांक खंदारे, पुसद
८३७८९२००९२

189 

Share


Shashank Khandare
Written by
Shashank Khandare

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad