Bluepad | Bluepad
Bluepad
मौन
Rajani Nikalje
Rajani Nikalje
3rd Aug, 2022

Share

*मौन*
माझ्या मौनास तू निर्थक
समजू नकोस
मनाच्या निःशब्दतेत
माझ्या अंतरीचे
अनाहत सूर आहेत
ह्रदयातून येणारे प्रेम
आता उरले नाही
व्यवहार प्रेमाचा झालाय
प्रेमात चालतांना
तुला होत असेल त्रास
जरा तुझ्या पावलाखाली
निरखून बघ
माझ ह्रदय असेल.......
नकोन इतका अहंकार करू
तू आणि मी एकाच
नाण्यांच्या दोन बाजू
खुशाल जाळ तू माझे मन,ह्रदय
संवेदना मेल्यात माझ्या
वेदनांशी जुळवून घेतलयं मी
एक सवय झाली मला
तुझ्या प्रेमात जळण्यांची........
रजनी निकाळजे
(शब्द रजनी)
मौन

188 

Share


Rajani Nikalje
Written by
Rajani Nikalje

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad