पुण्यात एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर उध्दव ठाकरे शिवसेनेच्या भुरट्या कार्यकर्त्यांकडून झालेला हल्ला अजिबात अनपेक्षीत नाही.
अशा राडेबाजीचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी चक्क मुख्यमंत्री असतानाही केवळ समर्थनच केले नव्हते तर संबंधीत फळकूट कार्यकर्त्यांचा सरकारी निवासस्थानावर जाहीर सन्मान केला होता.
खरं तर संजय राउत म्हणतो त्याचप्रमाणे गुंडगिरी हाच शिवसेनेचा डीएनए असल्यामुळे या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून शहाणपणाची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही.
आता फरक इतकाच आहे की दोन महिन्यांपुर्वीपर्यंत शिवसेनेचे हे स्वयंघोषित मावळे विरोधी भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांवर हल्ला करीत होते आता तेच लोक आपल्याच पक्षातून वेगळा सुभा मांडलेल्या सहकार्यांना खाउ की गिळू असे वर्तन करीत आहे.
गेल्या अडीच वर्षांत शिवसेनेच्या गुंडांनी राज्यभर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यांच्या पक्षाचाच मुख्यमंत्री असल्यामुळे पवार ठाकरे सरकारविरुध्द सोशल मिडियावर लिहणार्यांपासून अगदी भाजपच्या पदाधिकार्यांवरही शिवसैनिकांनी जीवघेणे हल्ले केले होते.
तीनच महिन्यांपुर्वी शिवसैनिकांच्याकडून मुंबईत भाजपच्या किरीट सोमय्या, मोहित कंबोज यांना जीवे मारण्याचे प्रयत्न झाले. त्याचवेळी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या मुंबईतील घरावरही चढाई करण्याचा प्रयत्न याच राडेबाजांकडून करण्यात आला होता.
परंतु त्यावेळी उध्दव ठाकरे मुख्यमंत्री आणि त्यांचा वफादार संजय पांडे मुंबईचा पोलीस आयुक्त असल्यामुळे कोणावरही कारवाईचा प्रश्नच उद्भवत नव्हता. आता मात्र दिवस फिरले आहेत हे शिवसेनेच्या गुंडांनी लक्षात घेण्याची गरज आहे.
पोलीस कारवाईपासून संरक्षण करणारे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत. त्यामुळे धमक्या, मारहाण, राडेबाजी करणार्यांवर तात्काळ खरीखुरी पोलीस कारवाई होणार. काल उदय सामंतांवरील हल्ल्यानंतर या गोष्टीचा प्रत्यय आला आहे.
बालिश भाषणांमधून गद्दारांना अद्दल घडवण्याची चिथावणी देणारे आता त्या गुंडांना कायद्यापासून वाचवण्यासाठी पुढे येणार नाहीत.
आधी शिवसेना स्टाईलने धडा शिकवू म्हणत चिथावणीखोर भाषणे करुन विरोधकांवर हल्ले करण्यास प्रवृत्त करायचे आणि प्रकरण अंगाशी आले की शिवसेनेला, महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा कांगावा आता चालणार नाही.
अशा उपद्रवी टोळक्यांवर पोलिसांनी गेल्या अडीच वर्षांत नियंत्रण ठेवले असते तर ते आज अजिबात डोईजड झाले नसते.
Deepak J. Patil
#deepakjpatil
#maharashtra