Bluepad | Bluepad
Bluepad
संस्कार असावेत प्रत्येकात ...
p
pratiksha Dhanawale
3rd Aug, 2022

Share

आपण पाहतो आत्ताच्या जगात संस्कार विलोप होत चालले आहे . असे आपल्या निदर्शनास येते की प्रत्येक मुलाला संस्कार म्हणजे त्याला चुकीचा पणा वाटतो .. अर्थात ते संस्काराला मान्यता देतच नाहीत . असं न करता आपण आपल्या घरातलं वातावरण खूप चांगल्या पद्धतीने सकारात्मक ठेवलं पाहिजे . संस्कारच महत्व पटवता आल पाहिजे . संस्कार म्हणजे मी पण बाजूला ठेऊन आपण सर्व असा उच्चार करतो काय वागतो ही तसे . हा एक महत्वाचा संस्काराचा भाग आहे ..संस्कार आपल्या जीवनावर प्रभुत्व करण्याचं काम हे आपल्यावर झालेले संस्कार करतात ..आता आपण पाहतो की अगोदरच्या काळात संस्करावर किती मान्यता होती आणि ती आजही आहे ..त्यांनी टिकून ठेवली आहे .. पण जरा विचार केला तर आजच्या काळात काय चाललंय .. हे आपण स्वतः अनुभवता आहात ... संस्कार म्हणजे काय ?हे कळायला हवं प्रत्येकाला ..अगदी शाळेत शिक्षकांसोबत बोलण्याची भिती वाटत असे .. एवढा वर्ज्य होता कारण वही पूर्ण नाही म्हंटल्यावर शिक्षकाचे बोलणे त्यावर छड्या .. आज असे निदर्शनास येते की शिक्षक बोलायचं उशीर की लगेच विद्यार्थी च उत्तर तयार असत .. आजचा विद्यार्थी बोलणे एकायला तयार नसतो ..अगोदर शिक्षकांना गुरु मानत होते . मला तर त्याबद्दल खूप अप्रूप वाटतं आहे किती आदर , किती सन्मान आणि ते विद्यार्थी कितीही उंच शिखरावर पोहोचले की त्यांच्यातली नम्रता कधीच आणि कुठेच कमी पडत नसते . आपण ही जरा विचार करायला हवा अर्थात विचार करणारच भाग आहे आदर्श जीवन कसं जगावं हे प्रत्येकाने शिकले पाहिजे . प्रयत्न करायला हवे आजच राहणीमान आणि अगोदरच राहणीमान यात किती फरक आहे . आणि हा फरक मिटवायला हवा . उगाच नको त्या गोष्टीत आपण वेळ घालवतो त्यापेक्षा नवीन काही तरी शिकण्यात घालावा . उलट बोलणे ,मोठ्यानाचा आदर न करणे ,बोलण्याची पद्धत ,राहण्याची पद्धत हे सगळं संस्कार नसण्याची लक्षण आहेत . एकदा प्रत्येकाने पहावे आपण कसे वागतो याकडे लक्ष द्यावे .. "आपण किती जगलो यापेक्षा ते कसे जगलो हे महत्वाचं ". संस्कार हे प्रत्येकाच्या मनात कोरून घेतले पाहिजे . काहींची अशी ही मनस्थिती असते की ह्याला संस्कार नाही आपण संस्काराने न वागलो कुठे काय भिघडल ..असा गैरसमजामुळे त्याचं नुकसान करून घेतात ..आपण आपली मानसिकता ठेवली पाहिजे .. कोणी कसं ही वागेना आपण आपलं चांगलं वागणं सोडू न देता शेवटपर्यंत ठीकवण ही संस्काराची खरी ओळख आहे .. कोणी किती काही बोलू द्या आपण प्रतेकासाठी चांगले शब्द आणि आशीर्वाद आपल्या मुखातून काढायचे . तर कायम स्वरुपी करण्याचं ठरवलं ना ..नक्की प्रत्येकजण करेल . मनात चांगले विचार असले की तुम्ही तुमच्या मार्गावर एकटे जरी असाल तर तुम्ही आत्मविश्वास ठेऊन प्रत्येकासाठी एक आदर्श असेल उद्याचे भावी आधास्तंभ असाल.. त्यामुळे चांगले विचार आणि संस्कार आपल्याला कधी डगमगू देत नाहीत ...ते चांगले विचार तुमच्या सवयीत आपोआप जडतील .. त्यासाठी चांगलं वाचन हवं वाचनातून माणूस प्रगल्भ होतो . एक नवीन माणूस तयार होतो ..सकारात्मक पद्धतीने आपण तसे बनतो ..संस्कार प्रत्येकालाच माहीत असतात . पण आचरणात आणताना तुम्हाला कधी त्याचा त्रास होतो .. असं न करता एक कायम लक्षात ठेवा ."संस्काराच्या जोरावर आपण सगळी माणसं काय . जग ही जिंकू शकतो .. तर प्रत्येकाने प्रत्येकात इतरांबद्दल आदर , नम्रता,सन्मान ठेवायला हवा . तरच तुम्ही माणूस म्हणून अस्तित्वातील घटक असाल ... आदर्श जीवनाची त्रिसूत्री तुम्हाला एकटे पडू देणार नाही ..कधी खजील होऊ देणार नाही त्यामुळे प्रत्येकाने एक संकल्प नक्की करावा मी उत्तम माणूस बनण्याचा ..मला विश्वास आहे नक्कीच बनाल ...
आपल्याला विषय माहीत असून सुद्धा नव्याने सांगण्याचा विचार केला ..."आशा आहे सर्वच बदल करतील संस्काराची परिभाषा ..घडेल पुन्हा एकदा नव्याने माणसाची अभिलाषा '!..छोट्या छोट्या गोष्टीत माणसाचं जीवन बदलून टाकतात .त्यामुळे सवयी बदलता येऊ शकतात ..मनात आणलं ना तर तुम्ही बदलू शकता सवयीचं गुलाम होणे शक्य आहे ..पण ते बदलावता येणं त्यापेक्षा खूप महत्वाचं आहे .. आपल्या लक्षात आल असेल .. आपल्याला माहीत असून सुद्धा सवयी न बदल करन हा निव्वळ मूर्खपणा आहे तो वेळीच बदलायला हवा .. तर मग संस्कार असायला हवेत ना प्रत्येकामध्ये ... कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ...आजच्या युगात कशाला जास्त महत्व आहे जरूर कळवा ..

178 

Share


p
Written by
pratiksha Dhanawale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad