कसोटी
कसोटीच असते ना आयुष्याची........
की ......
आयुष्य हे कसोटी बनल जातं,
जगवल जरी रोपट एखादं तरी कसोटीत ते निराधार ठरलं जातं.....
दिसत नाही पण आधार असतो पतंगाला,
मोठ्या शानाने उडतो, आकाशाला गवसणी घालत ,
आधार मात्र बारीक दोऱ्याचा
ठरतो....
आणि म्हणूनच तर ......
तो डगमगत नसतो
असच असत, ......अगदी असच
असत
कुणी आधार म्हणून
असत आपल्याच आयुष्यात.....
आणि आपल आयुष्य फुलवत जात
हे जिवन जगतना आपण
मात्र आपल्याच तोऱ्यात
आपल शहाणपण मिरवत जातो.......
कधी कुणावाचून कुणाचं अडून जाईल सांगता येत नाही,......: इवलिशी पाखरं ही वाट दाखवतील कधी सांगता येत नाही