हॅलो नमस्कार मित्रहो!
कसे आहात?.. सहाजीकच बुचकाळ्यात पडले असाल. असो, मस्तच म्हणायचे. 😊
बर, तर मग आज खुप दिवसानंतर तुमच्याशी संवाद साधताना खुप आनंद होतो आहे. काही अडचणींमुळे जरा लिखान थांबवले होते. पण, आज म्हटल कोणत्या विषयाने आपला संवाद सुरु करावा. तर, 'कोणता प्रवाह निवडावा?' या विषया वर बोलु.
एक गमंत सांगुका, मा या लिखानाच एक बर असत की, आपल्या मनातल्या - डोक्यातल्या विचारांना येथे भरकन मोकळे करायचे आणि मग वाचक वाचोत किंवा त्यातुन त्यांना काही मिळो किंवा त्रुटी काढो हा नंतरचा प्रश्न. पण, रसिक वाचक मित्रहो खरच मनापासुन आपले आभार की आपण माझ्या लिखानावर मनापासुन प्रेम करता. छानसा प्रतीसाद देताय. आणि दिवसेंदिवस वाचक संख्या ही वाढते आहे. असेच प्रेम, आशिर्वाद & शुभेच्छा राहुद्यात!...
चला तर मग वळुया आपल्या आजच्या विषयाकडे. शिर्षक वाचुन किती उतरे डोळ्यासमोर उभी राहिली?.. माझ्या मनात तर, बघा हां ' पैस्याचा, अभ्यासाचा, कामाचा, धैर्याचा, सुखाचा, प्रगतीचा, शहाराचा , खेड्याचा, देशाचा, परदेशाचा, प्रेमाचा, समाधानाचा... किंवा अस बरच काही. बरं, हे झाली उत्तरे किंवा पर्याय. पण, तो निवडतांना तो किती डोळसपणे निवडतोय हे फार महत्वाचे आहे मित्रांनो. नाहीतर त्याच्या चांगल्या वाईट परिणामांना सामोरे जावे लागते. किंबहुना या परिणामांची कल्पना असायला हवी.
सर्व साधारणपणे सर्वच यशाच्या शिखरावर पोहचण्याचा प्रयत्न करत असतात. पण, नेमक यश म्हणजे काय?.. किंवा प्रगती म्हणजे काय?.. सुख म्हणजे नक्की काय?.. हा प्रश्न जर स्वतःला विचारून पाहीला तर नक्कीच गप्प व्हायला होत. त्यासाठी आपण कोणत्या प्रवाहात आहोत किंवा कोणत्या प्रवाहात असायला हवे याचा जरा जास्तच बारकाईने चिकीत्सकतेने विचार करायला हवा. मी म्हणतोय म्हणुन नव्हे तर, स्वतः पडताळुन बघा.
मला तर हे समाधानी माणसे सोडली तर कोणता प्रवाह निवडावा याच परफेक्ट उतर कुणीच सांगु शकणार नाही. (लादणारे सल्लेदार सोडून.☺️ ) ना अनुभवी ना तरणारे. असो.. तसे पाहता हा माझा स्वनुभवच आहे. पण, आपण जो प्रवाह निवडाल किंवा ज्या प्रवाहात असाल तो प्रवाह आपणास सुख, शांती समाधान यश मिळउन देवो ह्या शुभेच्छा!..
- प्रदीप