शेक्सपिअरनं एकदा 'नावात काय आहे; असा प्रश्न केला. आणि आपण जणू तोच प्रमाण मानून संधी मिळेल तिथे त्याचा पुनरुच्चार करत असतो;पण खरंच ते किती खरं आहे?नावात काय आहे, या ऐवजी नावात काय नाही, असा प्रश्न खरं तर विचारला पाहिजे. केवळ जित्याजागत्या व्यक्ती च नव्हे,तर साहित्य-चित्रपटातील अनेक व्यक्तिरेकखा अशा आहेत.ज्यांच्या'नाम'चं काळाच्या ओघात'सर्वनाम' झाले आहे ज्यांचं केवळ नाव जरी घेतले,तरी ती व्यक्तिरेखा तिच्या सर्व गुणांसह आपल्यासमोर साकार होते.अशा अनेक'व्यक्ती आणि वल्ली' आपल्याला सापडतील. अगदी स्थळांच्या नावापासून ते व्यक्तींच्या नावापर्यंत अशी अनेक उदाहरणे भेटतील. की ती पाहिल्यावर 'नावात काय आहे'?हा प्रश्नच निरर्थक ठरेल. कुणी उगाच गप्पांचं चरहाट लावलं,की आपल्याला 'चिमणराव' आठवतो.उगाचच भोळसाटपणे भक्ती करणारा थोड्या प्रतिभेच्या दर्शनाने दिपून जाणारा साहित्यप्रेमी असा पुढ्यात आला की 'सखाराम गटणे' असाच असावा, अस वाटू लागते. पायजमा-झब्बा घालणारा, जाड भिंगाचा चष्मा घालणारा, हातातील पुस्तकं सावरणारा, काहीसा धांदरट व डोळ्यांत 'छप्पन्न सशांची व्याकुळता' एकत्र साठलेला मनुष्य विशेष डोळयांसमोर येतो.मद्यशाळेतून लटपट पायांनी बाहेर पडणाऱ्या, रोज ठराविक वेळी ज्याची तहान अनावर होते, अशा मद्यप्रेमीला पाहताच त्याला आपण 'तळीराम'म्हणून संबोधतो.कुठल्याही शंकास्पद प्रकरणी गायब झालेली व्यक्ती आपल्याला 'मारुती कांबळे' वाटते.त्या त्या लेखकांनी ती ती व्यक्तिरेखा त्यांच्या नावासकट जिवंत केलीआहे. 'फास्टर फेणे' म्हंटलं की एक किडकिडीत उंचपुरा, चपळ , चष्मीस, आणि स्मार्ट मुलगा डोळ्यासमोर उभा राहतो.ही सर्व त्या त्या लेखकांच्या प्रतिभेची जादू आहेचं; शिवाय या नावांनी आपल्या मनात निर्माण केलेल्या प्रतिमेचीही जादू आहे. आपल्या भावविश्वात ठाण मांडून बसलेली अशी काही 'खास नावं'......तर मग आपण शेक्सपिअर लाच हा प्रश्न विचारायला हवा अरे बाबा नावात काय आहे असं म्हणतोस? अरे बाबा नावातच बरंच काही आहे!
नावात काय आहे......हे सांगणारा शेक्सपिअर सुध्दा त्या खाली त्याच नावं लिहितो....म्हणजे नावात काहितरी असेल चं ना.......😊